महाराष्ट्र

maharashtra

औरंगाबादचे एसीपी डॉ. नागनाथ कोडे राष्ट्रपती पोलीस पदकाने सन्मानित

By

Published : Jul 26, 2019, 10:25 AM IST

औरंगाबादचे सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. नागनाथ कोडे गेल्या 31 वर्षापासून पोलीस सेवेत कार्यरत आहेत. त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर करण्यात आले.

डॉ. नागनाथ कोडे

औरंगाबाद- मुंबई पोलीस महासंचालक कार्यालयात गुरुवारी पोलीस पदक अलंकार सोहळ्यात औरंगाबादचे सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. नागनाथ कोडे यांना राज्यपाल विद्यासागर राव यांच्या हस्ते राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान करण्यात आले. डॉक्टर कोडे यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत सन 2017 मध्ये या पदकाची घोषणा झाली होती.

डॉ. नागनाथ कोडे यांना राष्ट्रपती पोलीस पदक

औरंगाबादचे सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. नागनाथ कोडे गेल्या 31 वर्षापासून पोलीस सेवेत कार्यरत आहेत. त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर करण्यात आले. राज्यपाल विद्यासागर राव यांच्या हस्ते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांच्या उपस्थितीमध्ये कोडे यांना या पदकाने सन्मानित करण्यात आले.

डॉ. कोडे यांनी सेवेदरम्यान अनेक तपासामध्ये महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. त्यांचा जनतेशी दांडगा संपर्क राहिला आहे. त्यांच्या यशाबद्दल पोलीस आयुक्तालयातील सर्वच अधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले.

Intro:



मुंबई येथील पोलिस महासंचालक कार्यालयात गुरुवारी पोलीस पदक अलंकार सोहळ्यात औरंगाबादचे सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. नागनाथ कोडे यांना राज्यपाल विद्यासागर राव यांच्या हस्ते राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान करण्यात आले. डॉक्टर कोडे यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत सन 2017 मध्ये या पदाची घोषणा झाली होती.


Body:औरंगाबाद चे साह्ययक पोलीस आयुक्त डॉ. नागनाथ कोडे गेल्या 31 वर्षापासून पोलीस सेवेत कार्यरत आहेत, त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर करण्यात आले, राज्यपाल विद्यासागर राव यांच्या हस्ते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांच्या उपस्थितीमध्ये कोडे यांना या पदकाने सन्मानित करण्यात आले, सेवे दरम्यान त्यांनी अनेक तपासामध्ये एनडीपीएस च्या गुन्ह्यात सर्वच गुन्हेगाराला शिक्षा झालेली आहे, जनतेशी दांडगा संपर्क असून कायदा आणि सुव्यवस्था व इतर बाबतीत त्यांची महत्त्वाची भूमिका असते या यशाबद्दल पोलिस आयुक्तालयातील सर्वच अधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले.Conclusion:

ABOUT THE AUTHOR

...view details