महाराष्ट्र

maharashtra

अमरावतीत विना परवानगी मिरवणूक, मेळावे घेण्यास बंदी - पोलीस आयुक्त आरती सिंह

By

Published : Nov 25, 2021, 9:09 PM IST

पोलीस आयुक्तालयाच्या ( Commissionerate of Police ) हद्दीत कलम 33 आणि 36 लागू करण्यात आले आहेत. यानुसार कोणत्याही संघटना, राजकीय पक्ष यांना विना परवानगी मिरवणूक आणि मेळावे घेण्यास बंदी करण्यात आली आहे. याबाबत आज ( गुरुवारी ) पोलीस आयुक्त आरती सिंह ( Commissioner of Police Aarti Singh ) यांनी आदेश काढला आहे.

पोलीस आयुक्त आरती सिंह
पोलीस आयुक्त आरती सिंह

अमरावती -शहरात 12 आणि 13 नोव्हेंबरला उसळलेल्या हिंसाचाराच्या ( Amravati Violence Case ) पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तालयाच्या ( Commissionerate of Police ) हद्दीत कलम 33 आणि 36 लागू करण्यात आले आहेत. यानुसार कोणत्याही संघटना, राजकीय पक्ष यांना विना परवानगी मिरवणूक आणि मेळावे घेण्यास बंदी करण्यात आली आहे. याबाबत आज ( गुरुवारी ) पोलीस आयुक्त आरती सिंह ( Commissioner of Police Aarti Singh ) यांनी आदेश काढला आहे.



आयोजनासाठी करावे लागतील अर्ज

अमरावती शहरात मोर्चे, मेळावे, मिरवणुका, धरणे आंदोलन, शोभा यात्रा, धार्मिक दिंडी, रास्ता रोको, क्रीडा स्पर्धा, मेळावे व इतर कोणत्याही प्रकारच्या जमावास बंदी घालण्यात आली आहे. जर कोणाला यापैकी काही करायचे असेल तर त्यासाठी पोलीस आयुक्तांकडे परवानगीसाठी अर्ज करावा लागणार आहे.

शहरातील तणाव निवळला

12 आणि 13 नोव्हेंबर रोजी उसळलेल्या हिंसाचारानंतर शहरात चार दिवस संचारबंदी घोषित करण्यात आली होती. ही संचारबंदी आता सकळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत शिथिल करण्यात आली आहे. संवेदनशील भागात पोलिसांचा बंदोबस्त कायम असला तरी शहरतील तणाव निवळला असून वातावरण शांत आहे.

पोलिसांनी केली होती कारवाई

शहरात बंदला हिंसक वळण लागले. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याने पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज करत पाण्याचा मारा केला होता. तसेच अश्रुधुरांचा मारा देखील करण्यात आला होता. त्यामुळे जमाव नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अमरावती शहरात संचारबंदी लागू करण्यात आली होती. त्यामुळे अमरावती शहर निर्मनुष्य झाले होते. रस्त्यावर शुकशुकाट पहायला मिळाला होता. हिंसाचार झाला यासाठी मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियाच्या माध्यमातून आक्षेपार्ह व चुकीच्या पोस्ट व्हायरल करण्यात आल्या होत्या. ज्याच्या माध्यमातून या हिंसाचाराला खतपाणी मिळाले. अशा अनेक पोस्ट पोलिसांनी तपासल्या असून त्याचा अहवालही गृहमंत्रालयाला पाठवला होता. दरम्यान अशा पोस्ट व्हायरल करणाऱ्यांवर आता पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे.अमरावती हिंसाचाराच्या नंतर पुन्हा असा प्रकार घडू नये. तसेच चुकीचे मेसेज, चुकीच्या बातम्या, धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल करू नये. यासाठी जवळपास सात दिवस अमरावती शहरातील इंटरनेट सेवा ही पोलिसांच्या वतीने बंद करण्यात आली होती.

हेही वाचा -Amravati Violence : संजय राऊतांनी अमरावती हिंसाचाराबद्दल बोलू नये - नवनीत राणा

ABOUT THE AUTHOR

...view details