महाराष्ट्र

maharashtra

Death of farmer : शॉक लागून शेतकर्‍याचा मृत्यू

By

Published : Jul 16, 2022, 7:20 AM IST

Death of a farmer : राहुल सुरेश सुने ( वय - 36 ) रा. शहापुरा सुर्जी अंजनगाव या तरुण शेतकऱ्याचा ( farmer ) विजेचा धक्का लागून जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. शेतकऱ्याच्या मृत्यूला वीज वितरण कंपनी ( Electricity Distribution Company ) जबाबदार असल्याचा रोष नागरिकांनी व्यक्त केला आहे.

शेतकर्‍याचा मृत्यू
शेतकर्‍याचा मृत्यू

अमरावती -अंजनगाव तालुक्यात पांढरी शेत शिवारातील ऐवजपुर शेत सर्वे नं. 52 माजी नगराध्यक्ष कमलकांत लाडोळे यांच्या शेतात ( field ) असलेल्या डी.पी. जवळून जात असतांना विजेचा धक्का ( Electric shock ) लागून राहुल सुरेश सुने ( वय - 36 ) रा. शहापुरा सुर्जी अंजनगाव या तरुण शेतकऱ्याचा ( farmer ) विजेचा धक्का लागून जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. तरुण शेतकऱ्याच्या मृत्यूला वीज वितरण कंपनी ( Electricity Distribution Company ) जबाबदार असल्याचा रोष नागरिकांनी व्यक्त केला आहे.

अशी आहे घटना -अंजनगाव- परतवाडा महामार्गावर असलेल्या शेत सर्वे नं. 52 अॕड कमलकांत लाडोळे यांचे शेत असून, नेहमी प्रमाणे शेतात राहूल सूने हा डी.पी. जवळून जात असतांना वीजेचा जबरदस्त धक्का लागून तरूण शेतकरी जागीच मृत्यू पडला. राहूल हा कालपासून घरी न आल्यामुळे राहूलला शेतात शोधायला गेले असता. तो शेतातील डी.पी. जवळ मृतावस्थेत आढळून आला आहे. या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच नातेवाईक, मित्रमंडळी व सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी धावून आले. सदर डी.पी. मध्ये कुठलेच फेज नसून, डीपीचे वायर उघडे असल्यामुळे ही धक्कादायक घटना घडली असल्याचे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे.

गुन्हा दाखल करण्याची मागणी -मृतक कुटूंबीयाच्या नातेवाईकांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी विज वितरण कंपनीवर सदोष मृत्यूचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

शेतकर्‍याच्या कुटुंबाला कंपनीतर्फे मदत -वीज वितरण कंपनीचे उपविभागीय अभियंता सतीश नंदवशी, प्रसाद मैराळ, महिला पीएसआय मेश्रे, तलाठी प्रशांत गोंडवार यांनी घटनास्थळी भेट दिली. घटनेबद्दल उपविभागीय अभियंता यांना विचारणा केली असता त्यांनी उपविभागा अंतर्गत उघड्या असलेल्या डी.पी. ची तात्काळ दुरस्ती करून व घटनेतील तरुण शेतकर्‍याच्या कुटुंबाला कंपनीतर्फे मदत देण्याचा प्रयत्न करू, असे सांगितले. मृतकाच्या नातेवाईकांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी वीज वितरण कंपनीच्या जबाबदार अधिकार्‍यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून तात्काळ आर्थिक मदत मिळावी, तोपर्यंत प्रेत उचलू देणार नाही असा पवित्रा घेतला होता.

हेही वाचा -Sharad Pawar Criticized Shinde Government :...तर मी शिंदे सरकारचं अभिनंदन केलं असतं - शरद पवार

ABOUT THE AUTHOR

...view details