महाराष्ट्र

maharashtra

प्राप्तिकर विभागाकडून १.४० लाख कोटींचा ५९.६८ लाख कोटी करदात्यांना परतावा

By

Published : Dec 2, 2020, 8:15 PM IST

प्राप्तिकर विभाग
प्राप्तिकर विभाग

प्राप्तिकर विभागाने वैयक्तिक करावर ३८ हजार १०५ कोटींचा परतावा दिला आहे. तर कॉर्पोरेट कर परताव्यावर १.०२ लाख कोटींचा परतावा दिला आहे. ही माहिती प्राप्तिकर विभागाने ट्विट करून दिली आहे.

नवी दिल्ली- प्राप्तिकर विभागाने गेल्या आठ महिन्यांत १.४० लाख कोटी रुपयांचा कर परतावा दिला आहे. हा परतावा देशातील ५९.६८ लाख कोटी करदात्यांना १ डिसेंबरपर्यंत देण्यात आला आहे.

प्राप्तिकर विभागाने वैयक्तिक करावर ३८ हजार १०५ कोटींचा परतावा दिला आहे. तर कॉर्पोरेट कर परताव्यावर १.०२ लाख कोटींचा परतावा दिला आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) १ एप्रिल २०२० ते १ डिसेंबर २०२० पर्यंत ५९.६८ लाख कोटी करदात्यांना १ लाख ४० हजार २१० कोटी परतावा दिला आहे. तर प्राप्तिकर परताव्यापोटी ५७ लाख ६८ हजार ९२६ प्रकरणात ३८ हजार १०५ कोटी रुपयांचा परतावा दिला आहे. तर १ लाख ९९ हजार १६५ प्रकरणात १ लाख २ हजार १०५ कोटींचा परतावा दिला आहे. ही माहिती प्राप्तिकर विभागाने ट्विट करून दिली आहे.

हेही वाचा-सीमारेषेवर तणाव असतानाही चीन भारताकडून खरेदी करणार ५ हजार टन तांदूळ; दोन वर्षानंतर होणार आयात

दरम्यान, कोरोना महामारीच्या संकटात चालू आर्थिक वर्षात प्राप्तिकर विभागाने विवरणपत्र भरण्यासाठी सातत्याने वाढ दिली होती. दुसरीकडे केंद्र सरकारच्या प्रत्यक्ष कर संकलनात घट झाली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details