महाराष्ट्र

maharashtra

व्हॉट्सअपला दणका; आयरीश देशाने ठोठावला 26.7 कोटी डॉलरचा दंड

By

Published : Sep 2, 2021, 8:40 PM IST

व्हॉट्सअप
व्हॉट्सअप ()

निकालाबात आम्ही असहमत आहोत. व्हॉट्सअप ही सुरक्षित आणि खासगी सेवेकरिता बांधील असल्याचे व्हॉट्सअपने म्हटले आहे.

लंडन - गोपनीयतेच्या धोरणावरून वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या व्हॉट्सअपला मोठाच फटका बसणार असल्याचे चिन्हे आहेत. आयरर्लंडच्या डाटा संरक्षण आयोगाने व्हॉट्सअपला 26.7 कोटी डॉलरचा दंड ठोठावला आहे. लोकांचा डाटा फेसबुक आणि इतर कंपन्यांशी सामाईक करताना पारदर्शकता दाखविली नसल्याने हा दंड ठोठावण्यात आला आहे.

आयरर्लंडच्या डाटा संरक्षण आयोगाने निकालात म्हटले, की व्हॉट्सअपने तत्काळ उपाय योजना कराव्यात. जेणेकरून युरोपीयन युनियनच्या कायद्याप्रमाणे वापरकर्त्यांच्या हक्कांचे संरक्षण होईल.

हेही वाचा-तालिबानबाबत भारताने आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे- असदुद्दीन ओवैसी

गतवर्षी सुरक्षेचा भंग केल्याने आयर्लंड वॉचडॉगने ट्विटरला 45 हजार युरोचा दंड ठोठावला होता. डाटा गोपनीयतेवरून आयर्लंडच्या वॉचडॉगने युरोपियन कायदा जीडीपीआरनुसार अॅमेझॉनला जुलैमध्ये 74.7 कोटी युरोचा दंड ठोठावला होता.

हेही वाचा-भारत-पाक सीमेवरून घुसखोरी करणाऱ्याला तस्कराला बीएसएफकडून अटक

व्हॉट्सअपचे जगभरात 2 अब्ज वापरकर्ते

निकालाबात आम्ही असहमत आहोत. व्हॉट्सअप ही सुरक्षित आणि खासगी सेवेकरिता बांधील असल्याचे व्हॉट्सअपने म्हटले आहे. पारदर्शकता आणि सर्वसमावेशकतेसाठी बांधील असल्याचेहीकंपनीने म्हटले आहे. याबाबत व्हॉट्सअपने ठोठावलेला दंड हा योग्य नसल्याचे सांगत अपील दाखल करणार असल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, व्हॉट्सअपचे जगभरात 2 अब्ज वापरकर्ते आहेत.

हेही वाचा-World War II : दुसऱ्या महायुद्धाला आज 76 वर्ष पूर्ण; आढावा घेणारी ही विशेष स्टोरी...

व्हॉट्सअप गोपनीयतेच्या धोरणावर जगभरात टीका

व्हॉट्सअपने गोपनीयतेच्या धोरणात बदल करण्याचे जाहीर केल्यावर भारतासह जगभरातून फेसबुक कंपनीवर टीका करण्यात आली होती. व्हॉट्सअपचा डाटा फेसबुकची मालकी असलेल्या इतर कंपन्यांकडे सामाई केला जाईल, अशी जगभरातील वापरकर्त्यांमध्ये भीती आहे. असे असले तरी व्हॉट्सअपवरील संदेश हे इन्ड-टू-इन्ड इन्क्रिप्टेड असल्याचे व्हॉट्सअपची मालकी असलेल्या फेसबुकने जाहीर केले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details