महाराष्ट्र

maharashtra

Wrestlers Protest: कुस्तीपटुंनी अमित शाह यांची भेट घेऊनही तोडगा नाही, 9 जूनपर्यंत सरकारला दिला आहे अल्टीमेट

By

Published : Jun 5, 2023, 8:02 AM IST

लैंगिक शोषणाचा आरोप करणाऱ्या ब्रिजभूषण शरण सिंग यांच्या अटकेची मागणी करणाऱ्या आंदोलक कुस्तीपटूंनी शनिवारी रात्री उशिरा गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली.

कुस्तीपटुंनी अमित शाह भेट
Wrestlers met Amit Shah

नवी दिल्ली : जंतरमंतरवर आंदोलन करणारे ऑलिम्पिक विजेते कुस्तीपटू यांनी ब्रिजभूषण शरण सिंह यांची चारही बाजूंनी कोंडी केली आहे. ब्रिजभूषण यांच्यावर भाजपकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने कुस्तीपटुंनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची रात्री उशिरा भेट घेतली. सुमारे सव्वा तास चाललेल्या बैठकीत कुस्तीपटूंनी आपली व्यथा सांगितली. ब्रिजभूषण यांच्यावर कारवाई करा, अशी कुस्तीपटुंनी बैठकीत मागणी केली आहे. मात्र, या बैठकीत ठोस निर्णय झाला नाही.

कुस्तीपटुंनी १८ जानेवारीपासून जंतरमंतरवर धरणे आंदोलन सुरू केले. ब्रिजभूषण यांच्यावरील कारवाईच्या मागणीसाठी कुस्तीपटुंनी आक्रमक भूमिका घेतली आहे. १४० दिवसांच्या निदर्शनानंतर कुस्तीपटूंनी अखेर गृहमंत्र्यांची भेट घेतली आहे. कुस्तीपटूंना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमुलसह इतर विरोधी पक्षांच्या नेत्यांनी पाठिंबा दिला आहे. क्रीडाविश्वातील अनेक दिग्गज खेळाडू आणि अभिनेत्यांनी कुस्तीपटुंच्या मागणीला समर्थन दिले आहे.

गंगेत पदके करणार होते विसर्जित: २८ मे रोजी देशाच्या नवीन संसद भवनाचे उद्घाटन होत असतानाही कुस्तीपटुंनी आंदोलन सुरुच ठेवले होते. या दिवशी नवीन संसद भवनासमोर कुस्तीपटूंनी महापंचायतीचे आयोजन केले होते. मात्र, पोलिसांनी घटनास्थळी जाण्यास मज्जाव करत कुस्तीपटुंना ताब्यात घेतले. ब्रिजभूषण यांच्यावर कारवाई होत नसल्याने व्यथित झालेल्या कुस्तीपटुंनी २९ मे रोजी कुस्तीपटूंनी जिंकलेली पदके गंगेत टाकण्याचा निर्णय घेतला. किसान मोर्चाचे राकेश टिकैत यांनी पदके गंगेत विसर्जित करण्यास विरोध केल्यानंतर कुस्तीपटुंना निर्णय बदलला. दुसरीकडे केंद्र सरकारला ९ जुनपर्यंत कारवाई करण्यासाठी अल्टीमेटम दिला आहे.

आतापर्यंत काय घडले?जागतिक कुस्ती परिषदेने कुस्तीपटुंच्या आंदोलनाची दखल घेतली आहे. कारवाई करण्यात आली नाही तर भारतीय कुस्ती परिषदेवर कारवाई करण्याचा इशारादेखील दिला आहे. कुस्तीपटुंनी यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप ब्रिजभूषण शरण सिंह यांना अटक करण्याची मागणी लावून धरली आहे. या कुस्तीगिरांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पाठिंबा दिला आहे. दुसरीकडे केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी कुस्तीपटुंना संयम ठेवत विश्वास ठेवण्याचे आवाहन केले आहे. योग्य तपास झाल्यानंतर दोषींना शिक्षा देण्यात येईल, असे क्रीडामंत्र्यांनी आश्वासन दिले आहे.

हेही वाचा-

  1. Anurag Thakur on Wrestlers Protest : कुस्तीपटूंच्या आंदोलनावर केंद्रीय क्रीडामंत्र्यांचे भाष्य; म्हणाले, खेळाडूंनी संयम....
  2. Wrestler Protest : तर भारतीय कुस्ती परिषद निलंबित करू, कुस्तीपटूंना दिलेल्या वागणुकीची जागतिक कुस्ती संघटनेकडून दखल
  3. Wrestlers Candle March : कुस्तीपटूंचा कँडल मार्च, संसद भवनासमोर होणार महिलांची महापंचायत

ABOUT THE AUTHOR

...view details