महाराष्ट्र

maharashtra

Khashaba Dadasaheb Jadhav : गुगलने डूडलवर साजरी केली खाशाबा दादासाहेब जाधवांची 97 वी जयंती

By

Published : Jan 15, 2023, 4:07 PM IST

आज 15 जानेवारी रोजी सर्च इंजिन गुगलने, भारताचे क्रीडापटू खाशाबा दादासाहेब जाधव यांच्या 97 व्या जयंतीनिमित्त डूडल तयार केले आहे. खाशाबा दादासाहेब जाधव म्हणजे केडी जाधव हे भारताचे दिग्गज कुस्तीपटू होते. त्यांनी स्वातंत्र्यानंतर ऑलिम्पिकमध्ये पहिले वैयक्तिक पदक जिंकले. कुस्तीसाठी प्रसिध्द असलेल्या केडी जाधव यांचा जन्म 15 जानेवारी 1926 रोजी महाराष्ट्र राज्यातील गोळेश्वर गावात झाला होता.

Khashaba Dadasaheb Jadhav
खाशाबा दादासाहेब जाधवांची 97 वी जयंती

सर्च इंजिन गूगल ने आज, 15 जानेवारी 2023 रोजी ज्येष्ठ पैलवान खाशाबा दादासाहेब जाधव यांच्या 97 व्या जयंतीनिमित्त एक विशेष डूडल तयार केले. देशाच्या स्वातंत्र्यानंतर केडी जाधव हे ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक पदक जिंकणारे पहिले व्यक्ती होते. कुस्तीवीर म्हणुन प्रसिध्द असणारे केडी जाधव यांचा जन्म 15 जानेवारी 1926 रोजी महाराष्ट्र राज्यातील गोळेश्वर गावात झाला होता. आखाडा आणि कुस्तीची आवड असलेल्या केडी जाधव यांनी हेलसिंकी येथे 1952 च्या उन्हाळी ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले.

कुस्तीच्या सगळ्याच हातखंड्याची जाण : केडी जाधव हे अगदी लहान वयापासुन म्हणजे वयाच्या 10 व्या वर्षापासुनच कुस्तीचा सराव करीत असे. त्यांनी कुस्ती मध्ये आपली प्रचंड आवड निर्माण केली. ते त्यांच्या वडीलांबरोबर दररोज सराव करत असे. कुस्तीच्या सगळ्याच हातखंड्याची जाण असल्याने, ते स्पर्धकाला उचलून जमिनीवर फेकायचे. त्यांची कुस्ती खेळायची स्टाईल फार जबरदस्त होती. पहिल्या ऑलिम्पिकमध्ये के.डी. जाधवची कुस्तीतील माहिर, फ्लायवेट कुस्तीपटूशी लढत होती. या दरम्यान के. डी. जाधव यांना सहावे स्थान मिळाले, ही एक मोठी गोष्ट होती.

मूर्ती लहान किर्ती महान : के.डी. जाधव यांची एक खास गोष्ट म्हणजे ते इतर पैलवानांसारखे उंच आणि तगडे नव्हते, तरीही त्यांच्याशी कुस्ती खेळली की सगळ्यात मोठा पैलवान उत्साही व्हायचा. केडी जाधव फक्त 5 फूट 5 इंच होते. असे असतानाही त्यांनी कुस्तीत आपल्यापेक्षा मोठ्या पैलवानांना धुळ चारली आहे.

शारिरीक दुखापतीमुळे सोडले करिअर :केडी जाधव यांचे शारिरीक दुखापतीमुळे सुवर्ण पदक हुकले, मात्र त्याही परिस्थितीत त्याने कांस्य पदक जिंकले. ऑलिम्पिक पूर्वी त्यांचा गुडघ्याला तीव्र दुखापत झाल्याने त्यांना क्रिडा क्षेत्रातील आपली कारकीर्द संपवावी लागली. आणि त्यानंतर ते पोलिस विभागात दाखल झाले.

अर्जुन पुरस्काराने सन्मानित :केडी जाधव यांना जिवंत असे पर्यंत एकही पुरस्कार मिळाला नाही. 14 ऑगस्ट 1984 रोजी त्याचे निधन झाले. त्यानंतर त्यांना त्यांनी दिलेल्या कुस्तीतील योगदानाबद्दल 2000 साली अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

ABOUT THE AUTHOR

...view details