महाराष्ट्र

maharashtra

43 ARRESTS IN CHILD PORNOGRAPY : बाल पोर्नोग्राफीविरुद्ध तेलंगाणा सीआयडीची मोहीम, 43 जणांच्या मुसक्या आवळल्या

By

Published : Mar 18, 2023, 2:14 PM IST

तेलंगाणा सीआयडी विभागाने मोठी कारवाई केली आहे. बाल पोर्नोग्राफी विरुद्ध मोहीम राबवून 43 जणांना अटक केली आहे. यासंदर्भातील सर्व प्रकरणामध्ये जलद गतीने कारवाई करण्याच्या सूचना तेलंगाणा सीआयडीचे प्रमुख अतिरिक्त पोलीस महासंचालक महेश भागवत यांनी दिले आहेत.

Etv Bharat43 जणांच्या मुसक्या आवळल्या
Etv Bharat43 जणांच्या मुसक्या आवळल्या

हैदराबाद - तेलंगणातील वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये टिपलाईनच्या आधारे नोंदवलेल्या सायबर गुन्ह्यांच्या प्रकरणांची राज्यस्तरीय आढावा बैठक अलीकडेच आयोजित करण्यात आली होती. प्रामुख्याने बाल लैंगिक शोषण सामग्री (CSAM) अपलोड करणे आणि विस्तृत प्रसार करणे या प्रकरणांचा समावेश त्यामध्ये होता.

एकूण 31 प्रकरणांचा या बैठकीत आढावा घेण्यात आला जी तपासाच्या विविध टप्प्यांवर होती. आतापर्यंत एकूण 43 जणांना या प्रकरणांमध्ये अटक करण्यात आली आहे, अशी माहिती तेलंगाणा सीआयडीचे अतिरिक्त पोलीस महासंचालकमहेश भागवत यांनी दिली. एकूणच यातील प्रकरणांचा आढावा घेण्यात आल्यानंतर 10 प्रकरणांमध्ये एकूण 21 जणांना अटक करण्यात आली. तसेच 16 प्रकरणांमध्ये 22 जणांना अटक करण्यात आली.

पुनरावलोकनानंतर चाईल्ड पोर्नोग्राफीची एकूण 13 नवीन प्रकरणे नोंदविण्यात आली. आजपर्यंत एकूण 44 प्रकरणे TIPLINES च्या आधारे नोंदवण्यात आली आहेत. त्यापैकी 34 प्रकरणांचा तपास सुरू आहेत. आणि 8 प्रकरणांमध्ये आरोप ठेवण्यात आले आहेत आणि त्यांची सुनावणी सुरू आहे. भागवत यांनी सर्व तपास अधिकाऱ्यांनना तपास जलद गतीने तपास करण्यास सांगितले. तसेच सर्व प्रकरणे तडीस नेऊन सर्वोच्च प्राधान्य देण्याचे आणि दोषी ठरविण्याच्या सूचना दिल्या आहेत. ज्या तपास अधिकाऱ्यांनी या प्रकरणांमध्ये त्वरीत अटक आणि आरोपपत्र दाखल केले, त्यांचे त्यानी कौतुक केले.

टिपलाईन्स या CSAM/(बाल लैंगिक शोषण साहित्य) च्या प्रसाराविषयीच्या ऑनलाइन माहिती आहेत, ज्या राष्ट्रीय गुन्हे रेकॉर्ड ब्युरो (NCRB) द्वारे राज्य CID ला दिल्या जातात. सीआयडी या टिपलाइन्सचे विश्लेषण करते आणि एफआयआर नोंदवण्यासाठी त्या अधिकारक्षेत्रीय पोलिसांकडे पाठवते. अशा प्रकरणांचा त्यांच्या तपासातील प्रगतीचा सीआयडीकडून नियमितपणे आढावा घेतला जातो.

सोशल मीडियावर पोर्नोग्राफी सामग्री अपलोड करणे आणि त्याचे प्रसार हे कलम IT कायदा कलम 66 (E), 67 (A), 67 (B), IT कायदा 2000 – 2008 आणि कलम 13 r/w POSCO कायदा 2012, IPC 354 (C) अंतर्गत शिक्षेस पात्र ठरते. तसेच 1 ते 3 वर्षांपर्यंतची शिक्षा + पहिल्या दोषीसाठी दंड त्याचबरोबर 3 ते 7 वर्षे + दुसऱ्यांदा किंवा त्यानंतरच्या दोषींसाठी दंड अशी यामध्ये शिक्षेची तरतूद आहे.

यावेळी असे गुन्हे करणाऱ्यांना अशा बेकायदेशीर कामांपासून दूर राहण्याचा इशारा देण्यात आला. अन्यथा योग्य ती कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

बैठकीला स्नेहा मेहरा, IPS, DCP, CCPS, हैदराबाद, श्री. टी.व्ही. हनुमंत राव, अतिरिक्त एसपी, सायबर गुन्हे, सीआयडी, टीएस, हैदराबाद, के. गुणा शेखर, डीएसपी, सायबर गुन्हे, सीआयडी, टीएस, हैदराबाद, श्री. एम. प्रसाद, निरीक्षक, सायबर गुन्हे, सीआयडी, टीएस, हैदराबाद, श्री. डी. रामा कृष्णा रेड्डी, निरीक्षक, सायबर गुन्हे, सीआयडी, टीएस, हैदराबाद, तेलंगणातील विविध युनिट्समधील टिप लाइन प्रकरणांचे सर्व तपास अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा - Lalbaug Murder Case : लालबागमधील वीणा जैन हत्येचे उत्तर प्रदेश कनेक्शन ; एकाला अटक, पाच ते सहा जणांची चौकशी

ABOUT THE AUTHOR

...view details