ETV Bharat / state

Lalbaug Murder Case : लालबागमधील वीणा जैन हत्येचे उत्तर प्रदेश कनेक्शन ; एकाला अटक, पाच ते सहा जणांची चौकशी

author img

By

Published : Mar 18, 2023, 9:25 AM IST

Updated : Mar 18, 2023, 9:52 AM IST

Lalbaug Crime
लालबाग हत्या

मुंबईच्या लालबागमध्ये झालेल्या महिलेच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी उत्तर प्रदेशातून एका संशयिताला अटक केली आहे. यासह पोलिसांनी पाच ते सहा व्यक्तींची चौकशी केली आहे. पोलिसांना या प्रकरणी खुनाचा संशय असून शवविच्छेदन अहवालाची प्रतिक्षा आहे.

आरोपी रिंपल जैन

मुंबई : मुंबईच्या लालबाग परिसरातील इस्माईल कासम चाळीत मंगळवारी मध्यरात्री एका 55 वर्षीय महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत मिळाल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी काळाचौकी पोलिसांनी आरोपी रिंपल जैन हिला अटक केली. त्यानंतर तिच्या चौकशीनंतर काल काळाचौकी पोलिसांचे पथक उत्तर प्रदेशला गेले आणि तेथून त्यांनी अमजद अली या युवकाला ताब्यात घेतले आहे.

उत्तर प्रदेशातून ताब्यात घेतले : अमजद अली उर्फ बॉबी हा लालबागमध्ये सँडविच विकण्याचे काम करायचा. रिंपल जैन आणि तिची आई त्याच्याकडून सँडविच घ्यायच्या. त्यावेळी तिची अमजद अलीशी ओळख झाली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. अमजद अलीने रिंपलला तिच्या आईची हत्या करण्यासाठी मदत केली असल्याचा पोलिसांना संशय असल्याने त्याला उत्तर प्रदेशातून ताब्यात घेऊन त्याची चौकशी करण्यात आली. गेले तीन महिने आरोपी रिंपल जैन हिच्या संपर्कात असलेल्या पाच ते सहा व्यक्तींची पोलिसांनी चौकशी केली आहे. या व्यक्तींमध्ये उत्तर प्रदेशातील अमजद अली याचा देखील सहभाग असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पहिल्या मजल्यावरून पडून मृत्यू? : लालबाग येथे मसाला कुटून देण्याच्या डंकी ज्या ठिकाणी आहेत, त्या ठिकाणी अमजद अली हा सँडविचचा स्टॉल लावायचा. 7 जानेवारीला तो सँडविच स्टॉल बंद करून उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये आपल्या मूळ गावी गेला होता. रिंपल जैन हिने तिच्या चाळीच्या खाली असलेल्या मेडिकलमधून फिनाईल आणि काही वस्तू मागवल्या होत्या. त्यामुळे मेडिकलवाल्याची देखील पोलिसांनी चौकशी केली आहे. त्याचप्रमाणे 27 डिसेंबरला आई वीणा जैन पहिल्या मजल्यावरून पडली होती, असे रिंपलने पोलिसांना चौकशीत सांगितले.

शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा : त्यावेळी या चाळीच्या खाली असलेल्या फ्लेवर्स ऑफ चायनीज या हॉटेलमध्ये काम करणाऱ्या हबीब आणि रोहित या दोन मुलांच्या मदतीने रिंपलने आईला आपल्या घरी आणले. त्याच दिवशी विना जैन यांचा मृत्यू झाला असावा असा पोलिसांचा अंदाज आहे. मात्र शवविच्छेदन अहवालाची पोलिसांना प्रतीक्षा असून शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच विणा जैन यांची हत्या झाली की त्या पहिल्या मजल्यावरून पडून मृत पावल्या, याबाबत ठोस माहिती समोर येईल.

नातेवाईकांना कल्पना नाही : रिंपल जैन हिची प्रेग्नेंसी टेस्ट देखील करण्यात आली असून ती निगेटिव्ह आली असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. त्याचप्रमाणे काल रात्री तिची सर्व वैद्यकीय तपासणी करण्यात आली. रिंपल जैनने पोलिसांना दिलेल्या माहितीत असे सांगितले की, 27 डिसेंबरला जेव्हा आई पहिल्या मजल्यावरून पडली, त्यावेळी तिचा मृत्यू झाला. मात्र नातेवाईकांना सांगितले तर त्यांना मीच आईला ठार मारले असल्याचे वाटेल या भीतीने मी नातेवाईकांना सांगितले नाही.

हेही वाचा : Andhra Crime : दुहेरी हत्याकांड! लग्नाला झाले अवघे 15 दिवस; 'या' कारणामुळे केली थेट पत्नी व सासूची हत्या

Last Updated :Mar 18, 2023, 9:52 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.