महाराष्ट्र

maharashtra

राष्ट्रपती, पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यावेळी कानपूरमध्ये दोन समाजात दगडफेक; तणावाचे वातावरण

By

Published : Jun 3, 2022, 5:34 PM IST

Updated : Jun 3, 2022, 5:58 PM IST

kanpur

राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान मोदी हे आज कानपूर दौऱ्यावर आहेत. त्यांचे शहरात आगमन होण्याआधीच परेड आणि आसपासच्या परिसरात दोन गटात गोंधळ उडाला आहे. या गोंधळानंतर दोन्ही बाजूंनी जोरदार दगडफेक करण्यात आली.

कानपूर - राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान मोदी हे आज कानपूर दौऱ्यावर आहेत. त्यांचे शहरात आगमन होण्याआधीच परेड आणि आसपासच्या परिसरात दोन गटात गोंधळ उडाला आहे. या गोंधळानंतर दोन्ही बाजूंनी जोरदार दगडफेक करण्यात आली. यावेळी स्फोट आणि गोळीबार झाल्याची माहिती देखील समोर येत आहे. त्यामुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. हा वाद जातीय असल्याचे वृत्त आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रपती रामनाथ कोविंद सर्किट हाऊसवर पोहोचण्यापूर्वीच शहरात दगडफेकीचे वृत्त समोर आले.

कानपूरमध्ये दोन समाजात दगडफेक

दोन समाजात दगडफेक - पोलीस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, भाजप नेत्याच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे दोन समाजात मोठ्या प्रमाणात दगडफेक झाली आहे. यादरम्यान स्फोट आणि गोळीबार करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मोठा पोलीस बंदोबस्त तैनात - घटनेनंतर नवीन मार्केट, परेड, यतिमखाना, मेस्टन रोडसह लगतच्या परिसरातील सर्व दुकाने बंद करण्यात आली आहेत. मोठ्या संख्येने दोन्ही समाजातील नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. तसेच घोषणाबाजी देखील करण्यात येत आहे. या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

मोहम्मद पैगंबराबाबतचे वादग्रस्त वक्तव्य -जुम्म्याच्या नमाजावेळी मशिदींमध्ये झालेल्या संभाषणात मोहम्मद पैगंबराबाबतचे वादग्रस्त वक्तव्य सहन करणार नाही, असा इशारा देण्यात आला होता. यानंतर शहरात आंदोलन करण्यास पोलिसांनी परवानगी नाकारली होती. नमाजानंतर अनेक ठिकाणी, चौकांमध्ये गर्दी झाली होती. दरम्यान, यावेळीच दोन्ही बाजूंनी दगडफेक करण्यात आली. यात अनेकजण जखमी झाले आहेत.

Last Updated :Jun 3, 2022, 5:58 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details