महाराष्ट्र

maharashtra

SSB Jawan Died Bihar : बिहारमध्ये विजेचा शॉक लागून तीन जवानांचा मृत्यू; महाराष्ट्रातील एकाचा समावेश

By

Published : Jan 14, 2022, 5:27 PM IST

SSB Jawan Died Bihar

बिहार मध्ये हायवोल्टेज तारांच्या संपर्कात आल्याने तीन जवानांचा मृत्यू झाला ( Bihar SSB Three Jawan Died ) आहे. तर या अपघातात 9 जण भाजले असून, 4 जवानांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत ( Bihar SSB 9 Jawan Injured ) आहे. सर्व जखमींवर एलएन उपविभागीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

सपौल -बिहार मध्ये हायवोल्टेज तारांच्या संपर्कात आल्याने तीन जवानांचा मृत्यू ( Bihar SSB Three Jawan Died ) झाला आहे. तर या अपघातात 9 जण भाजले असून, 4 जवानांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत ( Bihar SSB 9 Jawan Injured ) आहे. सर्व जखमींवर एलएन उपविभागीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, SSB 45 बी बटालियन वीरपुर मुख्यालयात टेंट लावताना हा अपघात झाला आहे. मृत झालेल्या जवानांमध्ये महाराष्ट्रातील अतुल पाटील ( वय 30 ), महेंद्र चंद्र कुमार बोपचे ( वय 28 ) आणि परशुराम सबर ( वय 24 ) यांचा समावेश आहे. तर, जवान नरसिंह चौहान, सुकुमार वर्मा, के चंद्रशेखर, परितोष अधिकारी, सोना लाल यादव, मांडवे राजेंद्र मोहम्मद आणि आनंद किशोर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

SSB ने सांगितले की, वीज विभागाला प्रशिक्षण मैदानावरील हायव्होल्टेज तारा व खांब काढण्यासाठी पत्र दिले होते. मात्र, त्यावर त्यांनी कोणतेही कारवाई केली नाही. त्यामुळे तार तुटून पडल्याने तिच्या संपर्कात एसएसबीचे जवान आले आणि हा अपघात घडला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details