महाराष्ट्र

maharashtra

राजकारणातील 'चाणक्य' शरद पवार यांचा आज ८३ वा वाढदिवस, पंतप्रधान मोदींसह 'या' नेत्यांनी दिल्या शुभेच्छा

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 12, 2023, 8:50 AM IST

Updated : Dec 12, 2023, 10:16 AM IST

Sharad Pawar birhday today पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना निरोगी आणि दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. शरद पवार वयाच्या ८३ व्या वर्षीदेखील राजकारणात सक्रिय आहेत. त्यांच्या राजकीय जीवनातील कार्याविषयी जाणून घेऊ.

Sharad Pawar birthday today
Sharad Pawar birthday today

नवी दिल्लीSharad Pawar birhday today -राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज ८३ वा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांना शुभेच्छा दिल्या आहेत. याबाबत त्यांनी 'एक्स' या सोशल मीडियात पोस्ट केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत राजकीय मतभेद असतानाही सर्वच पक्षातील नेता आदराने बोलतात. देशाचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हे शरद पवार यांची भेट घेऊन विविध विषयावर चर्चा करत. इतकंच नव्हे तर पंतप्रधान झाल्यानंतरही बारामतीमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात आपण शरद पवार यांचं बोट धरूनच राजकारणात आल्याचं वक्तव्य त्यांनी केलं होतं.

  • राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनीदेखील राष्ट्रवादीचे अध्यक्ष पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
  • वयाच्या ८३ व्या वर्षीही राजकारणात सक्रिय असणाऱ्या शरद पवार यांनी नाशिकमधील शेतकरी आंदोलनात मंगळवारी सहभाग घेतला. पत्रकार परिषदेत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून केंद्र सरकार व भाजपाचा समाचार घेतला. १२ डिसेंबरला कांदा निर्यातंबदीबाबत दिल्लीत जाणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं.
  • शरद पवार यांचे पुतणे अजित पवार हे महायुतीत सहभागी झाल्यानं राष्ट्रवादीत दोन गट पडले आहेत. अशा परिस्थितीत राष्ट्रवादीतील बंडखोरीनंतरही शरद पवार यांनी राज्यात नाशिकसह इतर जिल्ह्यात सभा घेत पुन्हा पक्ष उभारण्याची घोषणा केली. राष्ट्रवादीची पक्षाची मालकी व चिन्ह यावरून निवडणूक आयोगात अजित पवार गट व शरद पवार गटाची सुनावणी नुकतेच पूर्ण झाली आहे. त्याबाबत निवडणूक आयोग येत्या काळात निर्णय घेणार आहे.
  • सन १९६७ साली वयाच्या २६ वर्षी शरद पवार हे युवा काँग्रेसचे अध्यक्ष होते. त्यावेळेस ते आमदार म्हणून निवडून आले होते. राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे शरद पवार यांचे राजकीय गुरू मानले जातात. त्यांच्याच पुढाकारानं शरद पवार यांना आमदारकीचं तिकीट मिळाल होतं.
  • पुरोगामी विचारांचे शरद पवार यांची ८३ व्या वर्षीदेखील ऊर्जा तरुणांना लाजवणारी आहे. महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ५० टक्के आरक्षण, मराठवाडा विद्यापीठाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असा नामविस्तार, फळबाग लागवड योजना आणि किल्लारीच्या भूकंपात आपत्तीग्रस्त नागरिकांचे यशस्वी पुनर्वसन अशा अनेर कामांमधून त्यांनी राज्याच्या विकासात छाप पाडली.
  • शरद पवारांनी सूचविलेल्या हिंदू कोड बिलातील दुरुस्तीमुळे सर्व महिलांना वडलोपार्जित संपत्तीत वाटेकरी होता आले. पुरोगामी विचार असल्यामुळे शरद पवारांनी स्त्री-पुरुष समानता सर्व जातींना समान संधी यासाठी आजवर पुढाकार घेतला. महात्मा फुले, शाहू आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा पुढे चालविताना ते सामाजिक एकतेसाठी आग्रही असतात.

हेही वाचा-

  1. राष्ट्रवादी पक्षासह चिन्ह काकाचं की पुतण्याचं? निवडणूक आयोग दोन ते तीन आठवड्यात निकाल देण्याची शक्यता
  2. अदानी प्रकरणावरुन शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात मतभेद? शरद पवारांकडून अदानींची पाठराखण
  3. आजच्या आंदोलनामुळे सरकारची झोप उडाली, उद्या दिल्लीत जाणार- शरद पवार
Last Updated : Dec 12, 2023, 10:16 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details