महाराष्ट्र

maharashtra

शिंदे गटातील अनेक आमदार आमच्या संपर्कात, महाराष्ट्रात पुन्हा सत्तापरिवर्तन होणार - संजय राऊत

By

Published : Jul 28, 2022, 9:59 AM IST

Updated : Jul 28, 2022, 10:30 AM IST

राज्याला नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागत असताना दिल्लीतून राज्य मंत्रिमंडळ विस्ताराला अद्याप ग्रीन सिग्नल मिळत नसल्याने पेच अद्याप कायम आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनाही मंत्रिमंडळ विस्तारासाठी सातत्याने दिल्लीवारी करावी लागत आहे. यावरून संजय राऊत ( Sanjay Raut slammed Eknath Shinde ) यांनी टीका केली आहे.

संजय राऊत
संजय राऊत

नवी दिल्ली- ईडीचा दबाव असल्याचे शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी मान्य केले आहे. त्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक आहे. महाराष्ट्रात पुन्हा सत्तापरिवर्तन होणार आहे. कोणीतीही कारवाई करा, मी गुडघे टेकविणार नाही. शिंदे गटातील अनेक आमदार आमच्या संपर्कात आहेत, असा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला.

शिवसेनेचे उपनेते आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर ( Former Minister Arjun Khotkar ) यांनी दिल्लीत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी यांच्या उपस्थितीत शिंदे गटात जाहीर प्रवेश केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. या बातमीमुळे जालना जिल्ह्यातील आणि मराठवाड्यातील शिवसेनेला जबर धक्का पोहचला आहे. निष्ठावंत असल्याने खोतकर यांना शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांनी काही दिवसांपूर्वीच शिवसेनेचे उपनेतेपद बहाल केले होते. मात्र, आज दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत खोतकर यांनी जाहीर प्रवेश केल्याचे बोलले जात आहे. यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले, की ईडी चौकशीमुळे अर्जुन खोतकर यांचे कुटुंब तणावात आहे.

राज्याला नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागत असताना दिल्लीतून राज्य मंत्रिमंडळ विस्ताराला अद्याप ग्रीन सिग्नल मिळत नसल्याने पेच अद्याप कायम आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनाही मंत्रिमंडळ विस्तारासाठी सातत्याने दिल्लीवारी करावी लागत आहे. बुधवारीदेखील मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्लीला ( CM Eknath Shindes Delhi visit ) जाण्याचे नियोजन केले. मात्र, दिल्लीतून अचानक आलेल्या निरोपामुळे हा दौरा पुढे ढकलण्यात ( Maharashtra cabinet expansion ) आला आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडणार असल्याचे बोलले जाते.



उद्धव ठाकरे लवकरच महाराष्ट्र दौऱ्यावर -सध्या माजी मंत्री व युवा सेनेचे प्रमुख आमदार आदित्य ठाकरे देखील महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यांच्या दौऱ्यांना राज्यात संमिश्र प्रतिसाद मिळताना दिसत आहे. यावर बोलताना नुकतेच संजय राऊत म्हणाले की, "या महाराष्ट्र दौऱ्यात संपूर्ण राज्य पिंजून काढण्याचं लक्ष सध्या त्यांच्यासमोर आहे. आदित्य ठाकरे यांनी ठाण्यातून त्यांची संवाद यात्रा सुरू केली आणि ठाण्यापासून ते पुढे गेले. ठाणे जिल्ह्यात त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळाला. आदित्य ठाकरे जिकडे जिकडे ते जातात तिथं तरुणांचा, लोकांचा त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शिवसेना जिंदाबाद चे नारे लावले जात आहेत. त्यामुळे सध्याचं वातावरण हे भविष्यात पूर्ण महाराष्ट्र शिवसेनामय झालेलं दिसेल. याची सुरुवात आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्या पासून झाले आहे. लवकरच उद्धव ठाकरे देखील राज्याच्या दौऱ्यावर जातील त्याची तयारी सुरू आहे.



मोठा लढा द्यावा लागेल -महाराष्ट्रात मागील काही दिवस सुरू असलेल्या सत्ता नाट्याच्या संघर्षाच्या वेळी काही शांत असलेल्या तपास यंत्रणा आता पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचं चित्र देशभर पाहायला मिळाले आहे. यात काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांची झालेली चौकशी असेल अथवा महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्यावर झालेले कारवाई असेल या तपास यंत्रणा पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. याबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले होते, की, "केंद्रीय तपास यंत्रणावरती राजकीय दबाव आहे जे सरकारच्या विरोधात आहेत. महाराष्ट्रासाठी महाराष्ट्रा लढत आहेत त्यांच्यावर दबाव आहे अशा प्रकारे. संविधानाच्या सत्य आणि न्यायव्यवस्थेसाठी आम्हाला मोठा लढा द्यावा लागणार आहे." अशी प्रतिक्रिया संजय राऊत ( Sanjay Rauts reaction )यांनी दिली आहे.

महिन्याचा कालावधी उलटूनही मंत्रिमंडळ रखडले-सुरत, गुवाहाटी आणि गोवा राज्यातून पर्यटन करत राज्यात सत्तांतर झाले. शिवसेनेच्या ४० बंडखोर आमदारांना सोबत घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Rebel leader Eknath Shinde ) यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केले. मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांचे आतापर्यंत पाच दिल्ली दौरे झाले आहेत. राज्यातील काही जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली असताना मुख्यमंत्र्यांच्या दिल्लीवारीवरून विरोधीपक्ष नेते अजित पवार यांच्यासह ( Ajit Pawar slammed gov ) अनेकांनी टीका केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन विरोधकांना प्रत्युत्तर दिले. सरकार स्थापन होऊन जवळपास महिन्याचा कालावधी उलटून गेला तरी मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघेच मंत्रिमंडळ बैठक घेत असल्याने शिंदे सरकारवर टीकेचे बाण सुटले आहेत.

हेही वाचा-VIRAL VIDEO : त्रास देणाऱ्या रोमिओला महिलेने घडवली अद्दल; चप्पलेनी रस्त्यावर हाणले

हेही वाचा-सरकारने बसून घोषणा करू नये, एकाही शेतकऱ्याला तातडीचा पंचनामा नाही- अजित पवार

हेही वाचा-Ajit Pawar Criticized : राज्याचा कारभार वाऱ्यावर सोडला; शेतकरी मदतीच्या प्रतिक्षेत : अजित पवारांची टीका

Last Updated :Jul 28, 2022, 10:30 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details