महाराष्ट्र

maharashtra

WB Ration scam : 'रेशन घोटाळा' प्रकरणी ईडीकडून पश्चिम बंगालचे मंत्री ज्योतिप्रियो मल्लिक यांना केली अटक; ममता म्हणाल्या...

By ANI

Published : Oct 27, 2023, 7:53 AM IST

WB Ration scam : रेशन घोटाळ्याप्रकरणी पश्चिम बंगालचे मंत्री ज्योतिप्रियो मल्लिक यांच्या निवासस्थानावर गुरुवारी उशिरा रात्री ईडीकडून छापा टाकण्यात आला होता. या छाप्यात ईडीच्या आठ अधिकाऱ्यांचा सहभाग होता. अनेक तासांच्या तपासानंतर ईडीनं मंत्र्याला ताब्यात घेतलं.

वनमंत्री ज्योतिप्रियो मल्लिक
वनमंत्री ज्योतिप्रियो मल्लिक

पश्चिम बंगालचे मंत्री ज्योतिप्रियो मल्लिक यांना अटक

कोलकाता WB Ration scam : अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांनी गुरुवारी रात्री पश्चिम बंगालचे मंत्री ज्योतिप्रियो मल्लिक यांना त्यांच्या निवासस्थानी झडती घेतल्यानंतर अटक केलीय. कोट्यवधी रुपयांच्या कथित रेशन वितरण घोटाळ्याच्या चौकशीच्या अनुषंगानं हा छापा टाकण्यात आला होता. ईडीनं केंद्रीय पथकाच्या मदतीनं कोलकाता येथील सॉल्टलेक परिसरात राज्याचे वनमंत्री मल्लिक यांच्या दोन घरांवर छापे टाकले होते.

भाजपचा 'घाणेरडा राजकीय खेळ' : तपास यंत्रणेनं मध्य कोलकाता येथील एमहर्स्ट स्ट्रीट येथील ज्योतिप्रियो मल्लिक यांच्या वडिलोपार्जित घराचीही झडती घेतली. दरम्यान, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी दुपारी पत्रकार परिषदेत मल्लिक यांची तब्येत खराब असल्याचे सांगितलं होतं. तसंच त्यांच्या निवासस्थानांच्या झडतीदरम्यान मंत्र्याला काही झाल्यास भाजपा आणि ईडीविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची धमकीही दिली. विरोधी पक्षनेत्यांवर ईडीचे छापे म्हणजे भाजपाचा 'घाणेरडा राजकीय खेळ' असल्याचं बॅनर्जी यांनी म्हटलंय. हा घोटाळा सार्वजनिक वितरण प्रणाली (PDS) आणि कोविड-19 प्रेरित लॉकडाऊन दरम्यान अन्नधान्य वितरणातील कथित अनियमिततेशी संबंधित आहे.

ममता बॅनर्जी, मुख्यमंत्री, पश्चिम बंगाल

ईडीच्या छाप्यांमुळे ममता संतप्त: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी विरोधी नेत्यांवर अंमलबजावणी संचालनालयाच्या छाप्याला 'घाणेरडा राजकीय खेळ' म्हणून संबोधलंय. ममता बॅनर्जी यांनी केंद्रातील भाजप सरकारवर जोरदार टीकाही केली. त्या म्हणाल्या की, मला विचारायचं आहे की भाजपाच्या कोणत्याही नेत्याच्या घरावर ईडीनं छापा टाकलाय का? भाजपाच्या एकाही दरोडेखोराच्या घरावर ईडीचा एकही छापा पडलाय का? भाजपाच्या कोणत्याही मंत्र्याच्या घरावर ईडीचा एकही छापा पडला आहे का? असे प्रश्न त्यांनी उपस्थित करत भाजपावर निशाणा साधलाय. त्या पुढे म्हणाल्या की, नोटबंदी आणि जीएसटीच्या अंमलबजावणीसह अनेक चुकीचे निर्णय घेऊन भाजपा देशाचा इतिहास बदलण्याचा प्रयत्न करत आहे. भाजपाचे मंत्री परदेशात जातात तेव्हा ते सर्वांवर प्रेम करतात हे दाखवतात. भाजपाला 'सबका साथ, सबका विकास' हवाय, पण प्रत्यक्षात याचा अर्थ 'सर्वांचा आधार, सर्वांचा नाश' असा होत असल्याची टीका ममता बॅनर्जी यांनी केलीय.

हेही वाचा :

  1. Mumbai Crime : पीएफ अकाउंटमध्ये 11 कोटी रुपये जमा झाल्याची मारली थाप, 71 वर्षीय वृद्धेला चार कोटींचा गंडा
  2. ED Raid : राष्ट्रवादीच्या माजी खजिनदारावर ईडीची मोठी कारवाई! 315 कोटींच्या 70 मालमत्तेवर टाच
  3. AAP MP Sanjay Singh On ED Remand : आप खासदार संजय सिंह यांना पाच दिवसाची ईडी कोठडी

ABOUT THE AUTHOR

...view details