ETV Bharat / state

Mumbai Crime : पीएफ अकाउंटमध्ये 11 कोटी रुपये जमा झाल्याची मारली थाप, 71 वर्षीय वृद्धेला चार कोटींचा गंडा

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 26, 2023, 9:50 AM IST

Mumbai Crime : तुमचे 11 कोटी रुपये ईपीएफओ (एम्प्लॉयर प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन) मध्ये जमा झाले आहेत. हे पैसे काढण्यासाठी तुम्हाला काही रुपये भरावे लागतील, अशी बतावणी करून सायबर गुन्हेगारांनी 71 वर्षीय महिलेला 4 कोटी 35 लाख रुपयांचा गंडा घातला आहे. दरम्यान, याप्रकरणी कफ परेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलायं.

Mumbai Crime
71 वर्षीय वृद्धेला चार कोटींचा गंडा

मुंबई Mumbai Crime : कफ परेड पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संध्या भागवत नावाच्या महिलेनं आबाज हिरजीकाका नावाच्या महिलेला फोन करून आपण ईपीएफओ कार्यालयातून बोलत असल्याचं सांगितलं. 20 वर्षांपूर्वी त्यांच्या पतीनं EPFO मध्ये 4 लाख रुपये जमा केले होते. ज्यावर आतापर्यंतच्या व्याजासह ते 11 कोटी रुपये झाले आहे, असं सांगून आमिष दाखवलं. तसंच जर पैसे हवे असतील तर काही पैसे टॅक्स म्हणून द्यावे लागतील. टॅक्स स्वरूपात पैसे भरल्यानंतर हे पीएफ अकाउंट मध्ये जमा झालेले 11 कोटी मिळतील, अशी आरोपी

4.35 कोटी करायला लावले जमा : संध्या भागवत हिनं ईपीएफओचे नाव घेऊन 11 कोटी रुपये मिळण्याची बतावणी केली. तेव्हा हिरजीकाका यांनी तिच्यावर विश्वास ठेवला. संध्याने हिरजीकाका यांच्या वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये अनेक हप्त्यांद्वारे एकूण 4.35 कोटी रुपये जमा करायला लावले. इतके पैसे दिल्यानंतर हिराजीकाका ही वृद्ध महिला संध्या भागवतकडे 11 कोटींची मागणी करू लागल्यावर संध्यानं तिचा मोबाईल नंबर बंद केला.



कफ परेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल : दरम्यान, संध्याचा मोबाईल क्रमांक बंद होताच, आपली फसवणूक झाल्याचं हिरजीकाका यांच्या लक्षात आलं. त्यानंतर त्यांनी कफ परेड पोलीस ठाण्यात याबाबत फसवणुकीची तक्रार दिली. हिरजीकाका यांच्या तक्रारीवरून कफ परेड पोलिसांनी याप्रकरणी भारतीय दंड संविधान कलम ३८४,४१९,४२० आणि माहिती व तंत्रज्ञान कायद्याच्या कलमांअन्वये गुन्हा नोंदवला आहे.

पोलीस अधिकाऱ्याची प्रतिक्रिया : यासंदर्भात कफ परेड पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, मे ते सप्टेंबर या कालावधीत विविध प्रकारचे कर भरण्याच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्यांनी हिरजीकाका यांच्याकडून 4.35 कोटी रुपये उकळले. पुढे पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार महिलेनं फोन करणार्‍याला पैसे देण्यास नकार दिला. तेव्हा तक्रारदार वृद्ध महिलेला धमकावत महिलेची आणि तिच्या पतीची सर्व बँक खाती जप्त करणार असल्याचं सांगितलं. तक्रारदार आबाज हिरजीकाका आणि त्यांचे पती फिरोज हे कुलाबा येथे राहतात. फिरोज हे एका मोठ्या कंपनीत कामाला होते.

हेही वाचा -

  1. Thane Crime: पेमेंट गेटवे कंपनीचे खाते हॅक करून 16,180 कोटी रुपयांना चुना; आरोपींचा शोध सुरू
  2. Dandia Fake Pass Case: 'फर्जी' वेब सिरीज पाहून बनवले दांडियाचे बनावट पास, चौघांना अटक
  3. Cyber Crime Pune : पुण्यात सायबर गुन्ह्यात वाढ, 8 महिन्यात विविध गुन्ह्यांमध्ये कोट्यवधींचा गंडा
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.