महाराष्ट्र

maharashtra

Odisha Train Accident : 51 तासानंतर बालासोर अपघातस्थळावरून रेल्वे रवाना, बेवारस मृतदेहाबाबत बोलताना रेल्वेमंत्र्यांना कोसळले रडू

By

Published : Jun 5, 2023, 9:03 AM IST

Updated : Jun 5, 2023, 10:23 AM IST

ओडिशातील बालासोर येथे झालेल्या भीषण रेल्वे अपघातानंतर ५१ तासांनी त्याच रेल्वे मार्गावरून पहिली रेल्वे धावली आहे. विशाखापट्टणम बंदर ते राउरकेला स्टील प्लांटपर्यंत पहिली मालगाडी रवाना झाली आहे.

Railway Minister Ashwini Vaishnaw News:
1 तासानंतर बालासोर अपघातस्थळावरून रेल्वे रवाना

विशाखापट्टणम बंदर ते राउरकेला रेल्वे रवाना

नवी दिल्ली:बारसोला येथे रेल्वेच्या भीषण अपघातानंतर रेल्वेचे डबे हलविण्याचे काम पूर्ण झाले आहे. रेल्वेची वाहतूक पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर काम करण्यात आले. अपघातानंतर तब्बल ५१ तासांनंतर रविवारी रात्री १०.४० वाजता ओडिशातील बालासोर येथील अपघातग्रस्त विभागातून पहिली रेल्वे रवाना झाली. यावेळी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी त्या मालगाडीला हिरवी झेंडा दाखवून रवाना केले. यावेळी अनेक रेल्वे अधिकारीही उपस्थित होते.

ज्या रुळावरून रेल्वे अपघात झाला, त्याच रेल्वे रुळावरून मालगाडी विशाखापट्टणम बंदरातून राउरकेला स्टील प्लांटच्या दिशेने रुळावरून धावली. याबाबत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ट्विट केले. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले, की खराब झालेली रेल्वेची डाऊन लाईन पूर्णपणे पूर्ववत झाली आहे. सेक्शनमधून पहिली रेल्वे धावली आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सर्वप्रथम हस्तांदोलन उपस्थितांचे स्वागत केले. रेल्वे सुखरुप रवाना झाल्यानंतर केंद्रीय मंत्र्यांनी हात जोडले.

सरकारची जबाबदारी अजून संपलेली नाही-अपघातामध्ये मृत्यू झाल्यानंतर सुमारे 200 प्रवाशांचे मृतदेह बेवारस पडून आहेत. अपघातानंतर विरोधी पक्षांनी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. रेल्वे सुरक्षेतील त्रुटीवरूनही तृणमुल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जींसह काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

अपघातात बेपत्ता झालेल्या सर्व व्यक्तींच्या कुटुंबीयांना लवकरात लवकर शोधून काढणे हे आमचे ध्येय आहे. सरकारची जबाबदारी अजून संपलेली नाही-रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव

केंद्रीय रेल्वेमंत्री रेल्वे सेवा पूर्ववत होण्यासाठी घटनास्थळी ठाण मांडून होते. याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केले आहे. याबाबत त्यांनी ट्विट करत आपले काम प्रेरणादायी व प्रशंसनीय असल्याचे म्हटले आहे.

माहितीनुसार अपघातात 275 जणांचा मृत्यू -कोरोमंडल एक्स्प्रेस शुक्रवारी संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास बालासोर येथील बहनगा बाजार रेल्वे स्थानकाजवळ मुख्य मार्गाऐवजी लूप लाइनमध्ये शिरल्यानंतर तिथे उभ्या असलेल्या मालगाडीला धडकली. या अपघातात बंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेसचाही अपघात झाला. सरकारच्या माहितीनुसार अपघातात 275 जणांचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी 288 जणांचा मृत्यू झाल्याचे सरकारने म्हटले होते. मात्र, काही मृतदेह दोनवेळा मोजण्यात आल्याने चूक झाल्याचे ओडिशाच्या वरिष्ठ नेत्यांनी रविवारी स्पष्ट केले.

हेही वाचा-

  1. Odisha train accident : ...तर टळला असता अपघात, रेल्वे अधिकाऱ्याने तीन महिन्यांपूर्वीच यंत्रणेतील त्रुटीबद्दल केले सावध
  2. Odisha Train Accident : ओडिशा रेल्वे अपघाताची सीबीआयमार्फत चौकशी; मृतांचा अधिकृत आकडा 275 वर
  3. Odisha Train Accident : ओडिशा रेल्वे अपघात; मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू, भुवनेश्वरमधील एम्समध्ये ठेवण्यात येणार 100 मृतदेह
Last Updated : Jun 5, 2023, 10:23 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details