ETV Bharat / bharat

Odisha train accident : ...तर टळला असता अपघात, रेल्वे अधिकाऱ्याने तीन महिन्यांपूर्वीच यंत्रणेतील त्रुटीबद्दल केले सावध

author img

By

Published : Jun 5, 2023, 7:53 AM IST

Updated : Jun 5, 2023, 8:19 AM IST

Odisha train accident
तिहेरी रेल्वे अपघात ओडिसा

दक्षिण पश्चिम रेल्वे झोनच्या मुख्य कार्यकारी व्यवस्थापकाने यापूर्वी 9 फेब्रुवारी रोजी लिहिलेल्या पत्रात "सिस्टीममधील गंभीर त्रुटींबद्दल" चिंता व्यक्त केली होती ज्यात अधिकाऱ्याने एक्स्प्रेस ट्रेनमध्ये सिग्नल बिघाड झाल्याची घटना ठळकपणे दर्शविली होती.

हैदराबाद : ओडिसाच्या बालासोरमध्ये झालेल्या तिहेरी रेल्वे अपघातामागील कारण समोर आले आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी रविवारी याबाबत माहिती दिली. ईलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग यंत्रणेत झालेल्या बिघाडामुळे हा अपघात झाला. दरम्यान रेल्वे मंडळानेही याबाबतची माहिती पत्रकार परिषद घेऊन दिली. इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग यंत्रणेत फेरफार करून घातपात केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. यानुसार आता याची सखोल चौकशी केली जाणार आहे. पण या यंत्रणेतील बिघाडाविषयी आधीच कल्पना देण्यात आल्याचेही सांगण्यात येत आहे.यामुळे रेल्वे कर्माचाऱ्यांचा निष्काळजीपणा समोर आला आहे.

रेल्वे कर्माचाऱ्यांचा निष्काळजीपणा : ओडिसाच्या बालासोर जिल्ह्यातील बहानगा बाजार रेल्वे स्थानकाजवळ शुक्रवारी शालिमार-चेन्नई कोरोमंडल एक्स्प्रेस, बंगळुरू- हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस, मालगाडी या तीन रेल्वेगाड्यांचा भीषण अपघातात झाला. यात 288 प्रवाशांचा जणांचा मृत्यू झाला तर 1 हजारपेक्षा जास्त प्रवाशी हे जखमी झाले आहेत. हा अपघात का झाला याचे कारण रेल्वेमंत्र्यांनी सांगितले. इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग यंत्रणेत झालेल्या बिघाडामुळे हा अपघात झाला. या यंत्रणेत फेरफार केल्यानंतर घातपात केल्याचा संशय आता व्यक्त केला जात आहे. तसेच या अपघातास चालक किंवा सिग्नल यंत्रणा कारणीभूत नसल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान या यंत्रणेतील त्रुटीविषयीची कल्पना काही दिवासांपूर्वी पत्राद्वारे दक्षिण रेल्वेमधील अधिकाऱ्याने रेल्वे व्यवस्थापकाला कळवली होती. मात्र या इशाऱ्याकडे रेल्वे कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केले. रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने या वर्षाच्या सुरुवातीला "प्रणालीतील गंभीर त्रुटींबद्दल" चिंता व्यक्त केली होती. दक्षिण पश्चिम रेल्वे झोनच्या मुख्य कार्यकारी व्यवस्थापकाने यापूर्वी 9 फेब्रुवारी रोजी लिहिलेल्या पत्रात "सिस्टीममधील गंभीर त्रुटींबद्दल" चिंता व्यक्त केली होती. यात अधिकाऱ्याने एक्स्प्रेस ट्रेनमध्ये सिग्नल बिघाड झाल्याचे ठळकपणे सांगितले होते.

  • The Balasore train tragedy is a man-made disaster which took place because of the complete incompetence and misplaced priorities of the Union Government. The Prime Minister must take responsibility for this failure. The resignation of the Union Railway Minister is an… pic.twitter.com/QmuRNr7Y1W

    — K C Venugopal (@kcvenugopalmp) June 4, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

अनर्थ टळला : अधिकाऱ्याने यंत्रणेच्या बिघाडाविषयी लिहिलेल्या पत्रात एका घटनेची माहिती दिली आहे. 8 फेब्रुवारी 2023 रोजी सुमारे 17.45 वाजता एक अतिशय गंभीर घटना घडली होती. ज्यामध्ये अप ट्रेन क्रमांक: 12649 संपर्क क्रांती एक्स्प्रेस, रोड1 वरून, पेपर लाइन क्लिअर तिकीट (PLCT) सह सुरू झाली. कारण अ‍ॅडव्हान्स स्टार्टर बीपीएसी (ब्लॉक प्रोव्हिंग एक्सल काउंटर) नादुरुस्त झाले होते. दरम्यान हे स्टार्टर 17.45 तासांनी व्यवस्थीत काम करू लागले होते. 12649 संपर्क क्रांती एक्स्प्रेसच्या लोको-पायलटला काहीतरी गडबडीचा संशय आला त्याने पॉइंट क्रमांक: 65 A च्या आधी ट्रेन थांबवली. रेल्वे पॉइंट डाउन मेन लाइनवर म्हणजेच चुकीच्या रेल्वे रुळावर गेली होती. PLCT नुसार ही रेल्वे अप मेन लाइनवरून गेली पाहिजे होती.

रेल्वे अधिकाऱ्याने सांगितला बिघाड : सिग्नलवर रेल्वे जेव्हा प्रवास सुरू केल्याचे सांगितले जाते, तेव्हा मार्गावर अलर्ट पाठवला जातो. हा अलर्ट हा एसएमएस पॅनलवर योग्य मार्गावर रेल्वे असल्याचे दाखवले जाते. हे इंटरलॉकिगच्या कामाच्या विरोधात आहे. यात सुधारणा करण्याची सुचनाही या अधिकाऱ्याने दिली होती. दक्षिण पश्चिम रेल्वे (SWR) प्रदेशातील रेल्वे स्थानकांच्या सिग्नलिंग यंत्रणेतील त्रुटी दूर करण्यासाठी त्यांनी जबाबदार व्यक्तींविरुद्ध आवश्यक कारवाई करावी. यात तत्काळ सुधारात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याची शिफारसही या अधिकाऱ्याने केली. या यंत्रणेची तपासणी झाल्यानंतर यात काही सुधारणा झाली का? याची माहिती देण्यात यावी. तसेच ही सिस्टीम सुधारणे बाबत केलेल्या उपाय योजनांची माहिती द्यावी. यंत्रणेत काही बिघाड झाल्यास आवश्यक कृती काय करावी, यासाठी स्टेशन मास्टर्स, TI आणि वाहतूक अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात यावे, असेही अधिकाऱ्याने आपल्या पत्रात सांगितले होते.

अपघात होण्याचा दिला होता इशारा : सिग्नल मेंटेनन्स सिस्टिमबाबतही संबंधित अधिकाऱ्याने ताकीद दिली की, त्यावर तातडीने देखरेख आणि दुरुस्ती न केल्यास आणखी अपघात होऊ शकतात. सिग्नल मेंटेनरकडून योग्य प्रक्रिया का पाळल्या जात नाहीत, असा प्रश्न अधिकाऱ्याने आपल्या पत्रात केला होता. नॉन-इंटरलॉक्ड कामांमध्ये नियम आणि प्रक्रियांचे पालन करणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले होते.

शेवटी अनर्थ झाला : ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यात शुक्रवारी संध्याकाळी तीन रेल्वे गाड्यांचा भीषण अपघात झाला. बेंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस आणि शालीमार-चेन्नई सेंट्रल कोरोमंडल एक्स्प्रेस तसेच मालगाडीचा या अपघातात समावेश आहे. एक रेल्वे रुळावरु घसरल्यामुळे दुसऱ्या रेल्वेच्या डब्ब्यांवर आदळली. ज्यामुळे किमान 2 88 लोकांचा मृत्यू झाला आणि 1 हजार 100 हून अधिक लोक जखमी झाले. दरम्यान रेल्वे सुरक्षा आयुक्तांचा चौकशी अहवाल येणे बाकी आहे. इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगमध्ये झालेल्या बदलामुळे हा अपघात झाला. याला घटनेला जबाबदार व्यक्ती कोण असल्याचे शोधण्यात आल्याचे रेल्वेमंत्र्यांनी सांगितले.

मोदी सरकार जबाबदार : या पत्रावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसने मोदी सरकारवर टीका केली. बालासोर ट्रेन दुर्घटनेला "केंद्र सरकारच्या पूर्ण अक्षमतेमुळे आणि चुकीच्या प्राधान्यक्रमामुळे घडलेली मानवनिर्मित आपत्ती म्हटले. एका मोठ्या ट्विटमध्ये काँग्रेसचे सरचिटणीस आणि खासदार केसी वेणुगोपाल यांनी लिहिले की, "बालासोर ट्रेन दुर्घटना ही मानवनिर्मित आपत्ती आहे. जी केंद्र सरकारच्या पूर्ण अक्षमतेमुळे आणि चुकीच्या स्थानावर असलेल्या प्राधान्यांमुळे घडली.

इशाऱ्याकडे दुर्लक्ष : हा अपघात झाला याला मोदी सरकार जबाबदार असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात येत आहे. आपल्या ट्विटमध्ये केसी वेणुगोपाल पुढे म्हणाले की, या अपयशाची जबाबदारी पंतप्रधानांनी घेतली पाहिजे. केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी राजीनामा देणे हे आवश्यक आहे. मोदी सरकार आवश्यक सुरक्षा आणि देखभालीच्या उपाययोजना करण्यात अपयशी ठरल्यामुळे हा अनर्थ घडला. दक्षिण पश्चिम रेल्वेकडून 9 फेब्रुवारी 2023 रोजी सिग्नलिंग इन्फ्रास्ट्रक्चर सुधारण्याच्या गरजेकडे लक्ष वेधले होते, परंतु सरकारने त्याकडे लक्ष दिले नाही. ट्रॅक आणि सिग्नलच्या बिघाडांबद्दल अनेक पूर्व चेतावणींकडे मोदी सरकारने दुर्लक्ष केले, असल्याचे ते म्हणाले. पण पंतप्रधान मोदींचा जीव फक्त मोठं-मोठे इव्हेट करण्यात अडकले आहे. जे घडले त्याची सरकारला लाज वाटली पाहिजे. एवढी दुर्घटना घडली त्यावर पंतप्रधान मोदींनी देशाला उत्तर दिले पाहिजे, असेही वेणुगोपाल या ट्विटमध्ये म्हणाले आहेत.

हेही वाचा -

  1. Odisha Train Accident : ओडिशा रेल्वे अपघाताची सीबीआयमार्फत चौकशी; मृतांचा अधिकृत आकडा 275 वर
  2. Odisha Train Accident : रेल्वे रुळ दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर; पंतप्रधानांनी घेतला आढावा
Last Updated :Jun 5, 2023, 8:19 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.