महाराष्ट्र

maharashtra

Qatar Indian Navy Veterans : कतारमध्ये शिक्षा सुनावलेल्या 8 माजी नौदल अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांची जयशंकर यांनी घेतली भेट, केलं मोठं वक्तव्य

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 30, 2023, 12:11 PM IST

Jaishankar Meets Families of 8 Indians : कातरमध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या 8 माजी नौदल अधिऱ्यांच्या कुटुंबीयांची परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी आज भेट घेतली. परराष्ट्रमंत्र्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत ही माहिती दिलीय.

Jaishankar Meets Families of 8 Indians
Jaishankar Meets Families of 8 Indians

नवी दिल्ली Jaishankar Meets Families of 8 Indians : परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी कतारमध्ये मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आलेल्या आठ माजी नौदल अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. सोशल मीडियावर त्यांनी ही माहिती दिली. यासंगर्भात त्यांनी X (पूर्वीचं ट्विटर) वर एक पोस्ट केलीय.

पोस्टमध्ये काय म्हणाले एस जयशंकर : पोस्टमध्ये परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर म्हणाले की, कतारमध्ये अटकेत असलेल्या 8 भारतीयांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. या लोकांच्या सुटकेसाठी केंद्र सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचं ते म्हणाले. एस जयशंकर यांनी पुढं लिहिलं की, या बैठकीत भारत सरकार हा मुद्दा गांभीर्याने घेत आहे. याला प्राधान्य देण्यात आलंय. पीडितांच्या कुटुंबीयांचं दु:ख सरकारला समजतं, असंही त्यांनी लिहिलंय. तसंच नौदलातील अधिकाऱ्यांच्या सुटकेसाठी केंद्रातील मोदी सरकार प्रयत्नशील असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी सर्व कुटुंबीयांना दिली.

कतारमधील न्यायालयानं सुनावली फाशिची शिक्षा : मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय नौदलाचे 8 माजी अधिकारी ऑगस्ट 2022 पासून कतार तुरुंगात कैद आहेत. या सर्व अधिकाऱ्यांवर हेरगिरीचा आरोप आहे. कतारमधील न्यायालयानं या सर्वांना फाशीची शिक्षा सुनावलीय. कतारमधील आठ माजी नौदल अधिकाऱ्यांमध्ये कमांडर पूर्णांदू तिवारी (आर) यांचाही समावेश आहे. 2019 मध्ये राष्ट्रपती कोविंद यांच्या हस्ते त्यांचा सन्मानही करण्यात आला होता.

कतारनं आरोप केलेले आठ अधिकारी आहेत कोण? :

  • कॅप्टन नवतेज सिंग गिल
  • कॅप्टन बिरेंद्र कुमार वर्मा
  • कॅप्टन सौरभ वशिष्ठ
  • कमांडर अमित नागपाल
  • कमांडर पूर्णेंदू तिवारी
  • सेनापती सुगुणाकर पाकला
  • कमांडर संजीव गुप्ता
  • रागेश

कतारी अधिकार्‍यांकडे निर्णय मांडू : परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलंय की, ते भारतीयांना सर्व राजनैतिक सल्ला आणि कायदेशीर सहाय्य देत राहतील. आम्ही या प्रकरणाला खूप महत्त्व देतो आणि त्याचं बारकाईनं पालनही करत आहोत. आम्ही सर्व राजनैतिक आणि कायदेशीर सहाय्य देत राहणार आहोत. आम्ही कतारी अधिकार्‍यांकडे निर्णय मांडू, असं परराष्ट्र मंत्रालयानं एका निवेदनात म्हटलंय. या प्रकरणातील कारवाईचं स्वरूप गोपनीय असल्यानं यावेळी अधिक भाष्य करणं योग्य होणार नाही, असंही सांगण्यात आलं. राजनैतिक प्रवेश मिळाल्यानंतर कतारमधील भारतीय राजदूतांनी 1 ऑक्टोबर रोजी तुरुंगात असलेल्या या भारतीयांची भेट घेतली होती.

हेही वाचा :

  1. Death Penalty Indian Navy Personnel In Qatar : कतारमध्ये आठ माजी नौदलाच्या अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा, सरकारला धक्का
  2. Qatar Death Sentence to Indians : कतारमध्ये आठ भारतीयांचा जीव टांगणीला, तरी कॅनडाप्रमाणे उत्तर का देत नाही भारत? जाणून घ्या सविस्तर

ABOUT THE AUTHOR

...view details