महाराष्ट्र

maharashtra

Wrestlers Protest : तर गंगेत आपली पदकांचे करणार अर्पण, कुस्तीपटूंचा निर्धार; दिल्लीगेटवर करणार प्राणांतिक आंदोलन

By

Published : May 30, 2023, 2:13 PM IST

Updated : May 30, 2023, 2:30 PM IST

कुस्तीपटूंवर पोलिसांनी गुन्हे दाखल करुन त्यांचे आंदोलन स्थळावरचे तंबू उखडले आहेत. त्यामुळे कुस्तीपटूंनी केंद्र सरकारचा निषेध नोंदवला आहे. आपली पदके गंगा नदीत अर्पण करणार असल्याचा पवित्रा कुस्तीपटूंनी घेतला आहे.

Wrestlers Protest
माहिती देताना आंदोलक कुस्तीपटू

नवी दिल्ली : कुस्ती परिषदेचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात आंदोलन केल्याने कुस्तीपटूंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे कुस्तीपटूंचे आंदोलन आणखीच चिघळले असून पोलिसांनी कुस्तीपटूंचे आंदोलनस्थळावरचे तंबू उखडून फेकले आहेत. मात्र आता कुस्तीपटूंनी आक्रमक पवित्रा घेत आपली पदके गंगा नदीत अर्पण करणार असल्याचा पवित्रा घेतला आहे. आज संध्याकाळी आंदोलक कुस्तीपटू हरिद्वारला जाणार आहेत.

सायंकाळी गंगा नदीत अर्पण करणार पदके :आंदोलन खेळाडूंनी आक्रमक पवित्रा घेत आपली पदके गंगा नदीत अर्पण करण्याचा पवित्रा घेतला आहे. हे खेळाडू आज सायंकाळी हरिद्वारला जाऊन ही पदके गंगा नदीत अर्पण करणार असल्याची माहिती या खेळाडूंनी दिली आहे. यात विनेश फोगट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांनी ते आज सायंकाळी हरिद्वारला जात असल्याचे स्पष्ट केले आहे. हरिद्वारला जाऊन संध्याकाळी 6 वाजता पवित्र गंगेला ही पदके अर्पण करणार असल्याचेीह त्यांनी यावेळी सांगितले. आम्ही ही पदके खूप मेहनत घेऊन मिळवली आहेत. ज्या पवित्रतेने आम्हाला ही पदके मिळाली आहेत, त्याच पवित्रतेने आम्ही त्यांना गंगेत अर्पण करणार असल्याचे कुस्तीपटू बजरंग पुनिया याने माहिती दिली आहे.

आत्मसन्मानासोबत तडजोड नाही :आम्ही शांततेत आंदोलन करत होतो. मात्र 28 फेब्रुवारीला पोलिसांनी आमच्यासोबत गैरवर्तन केले. त्यामुळे आमच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचली आहे. कुस्तीपटू मुलींवर अन्याय करणारा मोकाट फिरत आहे. दुसरीकडे आमच्या कुस्तीपटू मुली मात्र शेतात पोलिसांपासून लपून बसल्याचे चित्र निर्माण झाले. त्यामुळे हे सगळे पासून दुख होत असल्याचे विनेश फोगाटने पत्र ट्विट करत आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे.

सैनिकांसारखी त्यागाची भावना :देशासाठी शहीद होणाऱ्या सैनिकासारखी भावना घेऊन आम्ही खेळतो. आम्ही देशासाठी शहीद होणाऱ्या जवानांइतके पवित्र नाही, मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळताना सैनिकांसारखीच भावना घेऊन आम्ही देशासाठी खेळत आहोत. मात्र दुसरीकडे अपवित्र काम करण्यात येत असल्याचा आरोपही यावेळी विनेशने आपल्या पत्रात केला आहे.

हेही वाचा -

  1. FIR On Wrestlers : जंतरमंतरवर आखाडा; ब्रिजभूषण सिंह विरोधात आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंवर गुन्हा, आंदोलकांचे तंबूही उखडले
  2. AAP Protest Against Brijbhushan Singh : ब्रिजभूषण यांच्या विरोधात आम आदमी पक्षाचे 'चप्पल मारो आंदोलन'
  3. Wresters Protest : जंतरमंतरवरील कुस्तीपटुंचे आंदोलन चिरडल्यानंतर कुस्तीपंढरीत उमटल्या संतप्त प्रतिक्रिया, तीव्र आंदोलन छेडण्याचा पैलवानांचा इशारा
Last Updated : May 30, 2023, 2:30 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details