महाराष्ट्र

maharashtra

Army Recruitment : खासदार केतकरांनी सैन्य भरतीच्या मुद्याला राज्यभेत घातला हात, हजारो अधिकाऱ्यांची पदे रिक्त, सरकारची कबुली

By

Published : Jul 24, 2023, 7:27 PM IST

भारतीय सैन्यात 2,094 मेजर आणि 4,734 कॅप्टनची कमतरता आहे. सरकारने राज्यसभेत ही माहिती दिली. तसेच राज्यमंत्र्यांनी संरक्षण सेवांमध्ये मीडिया कर्मचार्‍यांची देखील कमतरता असल्याचे सांगितले. काँग्रेस खासदार कुमार केतकर यांनी विचारलेल्या प्रश्नावर हे उत्तर सरकारने दिले. (shortage in Indian army).

Army
सैन्य

नवी दिल्ली : केंद्र सरकारने सोमवारी राज्यसभेत सांगितले की, सैन्यात 2,094 मेजर आणि 4,734 कॅप्टनची कमतरता आहे. संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली. लष्करात मेजर आणि कॅप्टनच्या पातळीवर अधिकाऱ्यांची मोठी कमतरता आहे का, असा सवाल काँग्रेसचे खासदार कुमार केतकर यांनी केला होता.

कोरोना काळात कमी भरती झाली : या प्रश्नाच्या उत्तरात, भट्ट यांनी कोविड -19 साथीच्या आजारादरम्यान सैन्यामध्ये कमी भरती झाल्याचे सांगितले. ते म्हणाले की, सरकार ही कमतरता भरून काढण्यासाठी शॉर्ट सर्व्हिस एंट्री अधिक आकर्षक करण्यास विचाराधीन आहे. त्याचप्रमाणे, राज्यमंत्र्यांनी यावेळी संरक्षण सेवांमध्ये मीडिया कर्मचार्‍यांची कमतरता असल्याचे सांगितले.

कुठे आणि किती जागा रिक्त :मंत्र्यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, आर्मी मेडिकल कॉर्प्समध्ये 630 जागा रिक्त आहेत. त्यापैकी 5698 जागा लष्करात, 20 नौदलात आणि 12 हवाई दलात आहेत. आर्मी डेंटल कॉर्प्ससाठी, लष्कराच्या 56, नौदलाच्या 11 आणि हवाई दलात 6 अशा 73 जागा रिक्त आहेत. मिलिटरी नर्सिंग सेवेसाठी लष्करातील 528, नौदलातील 86 आणि हवाई दलातील 87 अशा एकूण 701 जागा रिक्त आहेत. तर सशस्त्र दल वैद्यकीय सेवांमध्ये इतर वैद्यकीय कर्मचार्‍यांमध्ये (पॅरामेडिक्स) एकूण 1,969 जागा रिक्त आहेत. यात लष्करात 1,495, नौदलात 392 आणि हवाई दलात 73 जागा आहेत.

358 लीज्ड विमाने काढून टाकण्यात आली : सरकारने सोमवारी राज्यसभेत सांगितले की, जानेवारी 2018 पासून आतापर्यंत, एकूण 358 भाडेतत्त्वावरील विमाने भारतीय नागरी विमान नोंदणीतून काढून टाकण्यात आली आहेत. भाजप खासदार सुशील कुमार मोदी यांच्या, गेल्या पाच वर्षांत भाडेतत्त्वावरील विमानांची नोंदणी रद्द करून भाडेतत्त्वावर घेतलेल्या विमानांच्या संख्येबद्दल विचारलेल्या प्रश्नाला नागरी उड्डयन मंत्रालयाचे राज्यमंत्री जनरल डॉ. व्ही.के. सिंग (निवृत्त) यांनी उत्तर दिले. ते म्हणाले की, जानेवारी 2018 पासून आजपर्यंत सुमारे 358 भाडेतत्त्वावरील विमाने भारतीय नागरी विमान नोंदणीतून काढून टाकण्यात आली आहेत. यात इंडिगोची 123, जेट एअरवेजची 103, स्पाइसजेटची 55, एअर इंडियाची 26, GoFirst ची 21 विमाने शामिल आहेत.

हेही वाचा :

  1. Talathi Bharti 2023 : महाराष्ट्रमध्ये 4 हजार 625 जागांसाठी तलाठी पदांची मेगा भरती, जाणून घ्या पात्रता अन् महत्त्वाची तारीख
  2. Reservation for Ex Agniveers : अग्निवीरांना सरकारची भेट, BSF भरतीसाठी 10 टक्के आरक्षणाची घोषणा

ABOUT THE AUTHOR

...view details