ETV Bharat / bharat

जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या हल्ल्यातील दहशतवाद्यांचे स्केच जारी, माहिती दिल्यास मिळणार 20 लाखांचं बक्षीस - Terrorists sketch

Jammu Kashmir Police Terrorists Sketch : जम्मू-काश्मीरमधील डोडा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील चार दहशतवाद्यांचे स्केच पोलिसांनी जारी केले आहेत. तसंच या दहशतवाद्यांबद्दल माहिती देणाऱ्याला 20 लाख रुपयांचं बक्षीसही दिलं जाईल, अशी घोषणाही करण्यात आली आहे.

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 13, 2024, 11:37 AM IST

jammu kashmir police terrorists sketch doda encounter announces reward of rs 20 lakh
जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या हल्ल्यातील दहशतवाद्यांचे स्केच जारी (Source ETV Bharat)

डोडा Jammu Kashmir Police Terrorists Sketch : जम्मू-काश्मीर पोलिसांनी डोडा येथील चकमकीनंतर चार दहशतवाद्यांचे स्केच जारी केले आहेत. जिल्ह्यातील भदेरवाह, थाथरी आणि गंडोह या भागात दहशतवादी असल्याचा पोलिसांना संशय आहे. या दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्याला 20 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलंय. दहशतवाद्याबाबत माहिती देण्यावर प्रत्येकी पाच लाख रुपये दिले जाणार आहेत.

जम्मू-काश्मीर पोलिसांनी एक्सवरील पोस्टमध्ये सांगितलंय की, दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्याची ओळख गुप्त ठेवली जाईल. जम्मू-काश्मीर पोलिसांनी सामान्य जनतेला संपर्क क्रमांकांवर या दहशतवाद्यांची उपस्थिती किंवा हालचालींची माहिती देण्याचं आवाहनही केलंय.

या क्रमांकांवर माहिती द्या आणि बक्षीस मिळवा : एसएसपी डोडा - 9469076014, डोडा एसपी मुख्यालय - 9797649362, एसपी भदरवाह - 9419105133, डोडा एसपी ऑप्स - 9419137999, एसडीपीओ भदरवाह - 7006069330, डोडा मुख्यालय डेप्युटी - 9419155521, गंडोह एसडीपीओ - 9419204751, भदरवाह एसएचओ - 9419163516, थाथरी एसएचओ- 9419132660, गंडोह एसएचओ - 9596728472, आईसी पीपी थानाला - 9906169941, पीसीआर डोडा - 7298923100, 9469365174, 9103317361, पीसीआर भद्रवाह - 9103317363.

दोडा जिल्ह्यातील गंडोह भागात चकमक सुरू झाल्यानंतर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. विविध नाक्यांवर तपासणी करण्यात येत आहे. पोलीस बंदोबस्त कडक करण्यात आला असून वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. तर जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी सांगितलंय की, 12 जून रोजी, 20:20 वाजता, कोटा टॉप, गंडोह, डोडा येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली. केरलू भालेसा येथील कारवाईदरम्यान एसओजी गंडोहचे कॉन्स्टेबल फरीद अहमद जखमी झाले.

हेही वाचा -

  1. जम्मू-काश्मीरच्या डोडामध्ये सैन्य दलाच्या चौकीवर दहशतवादी हल्ला; 5 जवान आणि 1 पोलीस अधिकारी जखमी - terrorist attack in Jammu Kashmir
  2. मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला; सुरक्षा कर्मचारी जखमी - Militants Attack on CM Convoy
  3. शिवखोडी यात्रेसाठी जाणाऱ्या प्रवासी बसवर दहशतवादी हल्ला, 10 जण ठार - TERRORIST ATTACK ON PASSENGER BUS

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.