महाराष्ट्र

maharashtra

Anant Chaturdashi 2022: ..म्हणून अनंत चतुर्दशीला महाविष्णूच्या अनंत रूपाची करतात पूजा

By

Published : Sep 10, 2022, 11:18 AM IST

अनंत चतुर्दशी (Anant Chaturdashi 2022) हा सण भाद्रपद शुक्ल पक्षाच्या (Bhadrapada Shukla Paksha) चतुर्दशी तिथीला साजरा केला जातो. या सणाच्या दिवशी सागरातील शेषनागाच्या शय्येवर झोपलेल्या भगवान विष्णूची (Lord Vishnu puja) नियमानुसार पूजा केली जाते.या व्रताचा कालावधी चौदा वर्षांचा आहे. या व्रताचा प्रारंभ कोणी सांगितल्यास किंवा अनंताचा दोरा सहजपणे सापडल्यास करतात. व्रता बद्दल श्रीगुरु चरित्रात (Biography of Shri Guru) सांगितले आहे.

Worship of the infinite form of Lord Vishnu
महाविष्णूच्या अनंत रूपाची पूजा

वाराणसी :भारतीय संस्कृतीत ( Indian culture ) सर्व धर्मांचे सण विशिष्ट देवतांशी संबंधित आहेत. देशात सण पूर्ण श्रद्धेने आणि भक्तिभावाने (With faith and devotion) साजरे करण्याची परंपरा आहे. चातुर्मासाची सुरुवात झाली की सण-उत्सव यांची चाहूल लागते. तसं पाहिलं तर वर्षभर साजरे होणारे सण-उत्सव हे भारतीय संस्कृतीचं वैशिष्ट्य आहे. त्यात श्रावण- भाद्रपद म्हणजे उत्सवांची पर्वणीच! (Celebration of festivals)त्यात साजरे केले जाणारे उत्सव, केली जाणारी व्रतवैकल्यं, ह्या परंपरा-प्रथा शेकडो वर्ष जपल्या गेल्या आहेत. आपला कोणताही सण-उत्सव आला की आपल्या इतक्याच उत्साहाने निसर्ग पण आपली साथ देतो. आपली संस्कृती एवढी संपन्न आहे, कि इथे परंपरेनी चालत आलेली कोणतीच प्रथा व्यर्थ म्हणता येणार नाही. (Lord Vishnu puja)

व्रत करण्याची पद्धत -या व्रताची मुख्य देवता अनंत म्हणजेच श्रीविष्णु असून शेष आणि यमुना या गौण देवता आहेत. या व्रताचा कालावधी चौदा वर्षांचा आहे. या व्रताचा प्रारंभ कोणी सांगितल्यास किंवा अनंताचा दोरा सहजपणे सापडल्यास करतात आणि मग ते त्या कुळात चालू रहाते. अनंताच्या पूजेत चौदा गाठी मारलेल्या तांबडा रेशमाचा दोरा पूजतात. पूजेनंतर दोरा यजमानाच्या उजव्या हातात बांधतात. चतुर्दशी पौर्णिमायुक्त असल्यास विशेष लाभदायक ठरते. उद्देश - मुख्यतः हे व्रत गतवैभव परत मिळावे याकरिता केले जाते.

व्रता बद्दल श्रीगुरु चरित्रात काय म्हणले आहेश्रीगुरू सायंदेवाला म्हणाले, "तू मला अनंतव्रताविषयी विचारले होतेस. या अनंतपूजेचे माहात्म्य काय आहे व ही अनंतव्रतपूजा पूर्वी कोणी केली होती ? या व्रतपूजेचे फळ काय याविषयी मी तुला सांगतो, ते ऐक. हे अनंतव्रत पूर्वी पंडुपुत्र युधिष्ठिराने केले होते. त्या व्रतप्रभावाने त्याला त्याचे गेलेले राज्य परत मिळाले. त्याचे असे झाले, कौरव आणि पांडव पण लावून द्यूत खेळत होते. त्या द्यूतक्रीडेत पांडवांचे सर्वस्व हरण केले व त्यांना बारा वर्षे वनवास व एक वर्ष अज्ञातवास भोगावा लागला. युधिष्ठीर अर्ध्या राज्याचा स्वामी, पण तो आपले भाऊ व द्रौपदी यांच्यासह घोर अरण्यात अनंत दुःखे भोगीत होता. पांडव वनसात असतानाही कौरव अनेक कपटकारस्थाने करून त्यांना त्रास देत होते. पांडवांचे सत्व हरण करून त्यांना त्रास देत होते. पांडवांचे सत्व हरण करण्यास कौरवांनाही पांडवांकडे पाठविले; परंतु प्रत्येक वेळी श्रीकृष्ण त्यांचे रक्षण केले. पांडवांचे फार हाल होत आहेत हे पाहून एकदा श्रीकृष्ण त्यांना भेटावयास गेला. श्रीकृष्णाला पाहताच युधिष्ठिराने त्याला लोटांगण घातले. त्याची यथासांग पूजा केली. मग त्याने हात जोडून श्रीकृष्णाला प्रार्थना केली.

हे एक कौटुंबिक व्रत आहे.कुटुंबातील एखाद्या व्यक्तीने घेतलेले हे व्रत परंपरेने पुढे चालू ठेवावयाचे असते. या अनंत देवतेचे प्रतीक म्हणून चौदा गाठी असेलेला एक रेशमाचा दोरा असतो. पूर्वी ज्याने हे व्रत चालविलेले असेल त्याच्याकडून व्रतकर्त्याने हा दोरा विधीपूर्वक घेऊन ठेवावयाचा असतो. दरवर्षी अनंत चतुर्दशीला त्याची यथाविधी पूजा करावयाची असते. चौरंगावर दर्भाच्या बनविलेल्या सात फण्यांच्या शेषरुपी अनंत नागाची प्राणप्रतिष्ठा करून त्याच्यापुढे अनंत दोरक ठेवावयाचा. त्याची पूजा करावी. चौरंगावर गंगेचा एक व यमुनेचा एक असे दोन जलपूर्ण कलश ठेवावेत. त्यांची पूजा करावी. चतुर्भुज विष्णूचे ध्यान करून ' ॐ नमो भगवते वासुदेवाय' हा मंत्र म्हणत दर्भाच्या गाठीयुक्त नागाची 'अनंत' म्हणून मनात धारणा करावी. नवीन ग्रंथीयुक्त दोरे दोन्ही कलशांवर ठेवून पुरुषसूक्त मंत्रांनी त्यांची पूजा करावी. या अनंतपूजेत १४ या संख्येला फार महत्व आहे. अनंत दोरकाला चौदा गाठी असतात. नैवेद्याला १४ लाडू, करंज्या, अपूप इत्यादी पदार्थ असावेत. हे व्रत किमान चौदा वर्षे करावयाचे असते. चौदा वर्षे झाल्यावर या व्रताचे उद्यापन करावे. या व्रतामुळे सर्वप्रकारच्या मनोकामना पूर्ण होतात. सर्व सुखसमृद्धींची प्राप्ती होते. अनंतस्वरुपात भगवान विष्णूची आपल्यावर पूर्ण कृपा होते.अनंतव्रताची अशी माहिती सांगून त्या सुशीलेला म्हणाल्या, "आजच अनंत चतुर्दशी आहे. तू आजच आमच्या बरोबर ही व्रतपूजा कर, त्यामुळे अनंत स्वरूप भगवान नारायणाची तुझ्यावर कृपा होईल व तुझे मनोकामना पूर्ण होईल." सुशिलेने आनंदाने ते मान्य केले व त्या स्त्रियांच्यासमवेत भक्तिभावाने अनंताची यथासांग पूजा केली.

ABOUT THE AUTHOR

...view details