महाराष्ट्र

maharashtra

Odisha Train Accident : ओडिशा रेल्वे अपघात, सीबीआयने दाखल केला एफआयआर

By

Published : Jun 6, 2023, 7:43 PM IST

ओडिशातील बालासोर येथे 2 जून रोजी सायंकाळी झालेल्या रेल्वे अपघाताची चौकशी करण्यासाठी सीबीआयचे 10 सदस्यीय पथक आज अपघातस्थळी पोहोचले. येथील रेल्वे अधिकाऱ्यांची चौकशी केल्यानंतर सीबीआयने याप्रकरणी एफआयआर नोंदवला आहे.

Odisha Train Accident
ओडिशा रेल्वे अपघात

भुवनेश्वर : केंद्रीय अन्वेषण ब्युरोने (CBI) रेल्वे मंत्रालयाच्या विनंतीनुसार, ओडिशा सरकारची संमती आणि भारत सरकारच्या पुढील आदेशांनुसार कोरोमंडल एक्सप्रेस ट्रेन अपघाताशी संबंधित गुन्हा नोंदवला आहे. या अपघातासंदर्भात सीबीआयने GRPS प्रकरण क्रमांक 64 चा तपास आपल्या ताब्यात घेतला आहे. सीबीआयचे एक पथक ओडिशातील बालासोर येथे दाखल झाले आहे, जे या प्रकरणाचा तपास करत आहे.

सीबीआयची टीम घटनास्थळी : सीबीआयचे 10 सदस्यीय पथक मंगळवारी ओडिशातील बालासोर येथील रेल्वे अपघातस्थळी पोहोचले. हे पथक 2 जून रोजी झालेल्या अपघाताची चौकशी करत आहे. आत्तापर्यंत या अपघातात 288 जणांचा मृत्यू झाला आहे. अद्याप 110 मृतदेहांची ओळख पटलेली नाही. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रविवारी सांगितले की, रेल्वे बोर्डाने या भीषण अपघाताची सीबीआय चौकशी करण्याची शिफारस केली आहे. 'इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगमध्ये बदल' झाल्यामुळे हा अपघात झाल्याचे अश्विनी वैष्णव म्हणाले होते.

रेल्वेकडूनही तपास सुरू :विशेष म्हणजे, इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सिग्नल प्रणालीद्वारे ट्रेनची ट्रॅकवरील हालचाल सुरक्षित आणि सुलभ होते. या प्रणालीचा उद्देश असा आहे की, जोपर्यंत रस्ता सुरक्षित होत नाही तोपर्यंत कोणत्याही ट्रेनला पुढे जाण्याचे संकेत दिले जात नाहीत. रेल्वेकडूनही या अपघाताचा तपास सुरू आहे. 2 जूनला ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यातील बहनगा बाजार स्थानकावर बेंगळुरू - हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस, कोरोमंडल एक्स्प्रेस आणि एक मालगाडी यांची धडक झाली होती.

या कलमांअंतर्गत गुन्हा दाखल : यापूर्वी, ओडिशा सरकारी रेल्वे पोलिसांनी (GRP) ओडिशा रेल्वे अपघातासंदर्भात रेल्वे कायदा 1989 आणि भारतीय दंड संहिता (IPC) च्या विविध कलमांतर्गत अज्ञात व्यक्तींविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. एफआयआर अहवालानुसार, रेल्वे कायद्याच्या कलम 154, 175 आणि 153 आणि भारतीय दंड संहितेच्या कलम 337, 338, 304A आणि 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :

  1. Odisha Train Accident : ओडिशा रेल्वे अपघात, अज्ञात व्यक्तींविरुद्ध एफआयआर दाखल
  2. Odisha Train Accident : आता मृतदेहांची ओळख पटवण्याचे आव्हान, दिल्लीहून मदतीसाठी आली विशेष टीम
  3. Odisha Train Accident : 51 तासानंतर बालासोर अपघातस्थळावरून रेल्वे रवाना, बेवारस मृतदेहाबाबत बोलताना रेल्वेमंत्र्यांना कोसळले रडू

ABOUT THE AUTHOR

...view details