ETV Bharat / bharat

Odisha Train Accident : ओडिशा रेल्वे अपघात, अज्ञात व्यक्तींविरुद्ध एफआयआर दाखल

author img

By

Published : Jun 5, 2023, 11:01 PM IST

Odisha Train Accident
ओडिशा रेल्वे अपघात

ओडिशा रेल्वे अपघातात रेल्वे पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. बालासोर जीआरपीएसचे एसआय पपू कुमार नाईक यांच्या तक्रारीनंतर हा एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

भुवनेश्वर (ओडिशा) : बालासोर रेल्वे अपघातात कटक येथील सरकारी रेल्वे पोलिसांनी (GRP) अज्ञात व्यक्तींविरुद्ध रेल्वे कायद्याच्या कलम 153, 154 आणि 175 अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे. बालासोर जीआरपीएसचे एसआय पपू कुमार नाईक यांच्या तक्रारीनंतर हा एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

  • Odisha | FIR registered by Government Railway Police (GRP) in Cuttack under sections 153, 154 and 175 of the Railway Act against unknown persons in the Balasore train accident.

    FIR was registered following a complaint by SI Papu Kumar Naik of Balasore GRPS pic.twitter.com/67vhxy3Iht

    — ANI (@ANI) June 5, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

ओडिशा ट्रेन अपघात कसा घडला? : कोरोमंडल एक्सप्रेस, हावडा सुपरफास्ट एक्सप्रेस आणि बहनगा बाजार स्थानकावर आधीच उभी असलेली मालगाडी या तीन गाड्यांची टक्कर झाली. हा भारतातील आत्तापर्यंतचा पाचवा सर्वात प्राणघातक रेल्वे अपघात आहे. कोणती ट्रेन प्रथम रुळावरून घसरली याची अद्याप पुष्टी झालेली नाही परंतु रेल्वेचे प्रवक्ते अमिताभ शर्मा म्हणाले की, कोरोमंडल एक्स्प्रेस जी पश्चिम बंगालमधील शालीमार रेल्वे स्थानकावरून येत होती, तिने प्रथम नियंत्रण गमावले. ती स्थानकावर उभ्या असलेल्या मालगाडीला धडकली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अपघाताच्या वेळी तेथून जात असलेल्या हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेसलाही धडक बसली.

हेही वाचा :

  1. Odisha Train Accident : आता मृतदेहांची ओळख पटवण्याचे आव्हान, दिल्लीहून मदतीसाठी आली विशेष टीम
  2. Odisha Train Accident : 51 तासानंतर बालासोर अपघातस्थळावरून रेल्वे रवाना, बेवारस मृतदेहाबाबत बोलताना रेल्वेमंत्र्यांना कोसळले रडू
  3. Odisha Train Accident: ओडिशामध्ये पुन्हा मालगाडी रुळावरून घसरली, सुदैवाने जीवितहानी नाही!
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.