महाराष्ट्र

maharashtra

NIA Raids : दहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरविण्याच्या प्रकरणात एनआयएचे देशभरात छापे

By

Published : Feb 21, 2023, 11:14 AM IST

एनआयएने गँगस्टर टेरर फंडिंग प्रकरणात 8 राज्यांमध्ये 70 हून अधिक ठिकाणी छापे टाकले आहेत. एनआयएची ही कारवाई गॅंगस्टर्स, त्यांचे निकटवर्तीय आणि वेगवेगळ्या राज्यात पसरलेल्या सिंडिकेटवर करण्यात येत आहे.

NIA
एनआयए

नवी दिल्ली : नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (NIA) ने आज सकाळी आठ राज्यांमध्ये 70 हून अधिक ठिकाणी गँगस्टर टेरर फंडिंग आणि शस्त्रास्त्र पुरवठादाराशी संबंधित प्रकरणांमध्ये छापे टाकले आहेत. एनआयएची छापेमारी अजूनही सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एनआयएने पंजाब, दिल्ली, चंदीगड, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश, गुजरात आणि मध्य प्रदेशमध्ये एकाच वेळी 70 हून अधिक ठिकाणी छापे टाकले आहेत. एनआयएने पंजाबमध्ये 30 हून अधिक ठिकाणी छापे टाकले आहेत.

टेरर फंडिंगचे प्रकार उघडकीस :एनआयएची ही कारवाई गॅंगस्टर्स, त्यांचे निकटवर्तीय आणि वेगवेगळ्या राज्यात पसरलेल्या सिंडिकेटवर करण्यात येत आहे. गेल्या वर्षीही एनआयएने राजधानी दिल्लीसह देशातील अनेक राज्यांमध्ये एकाचवेळी छापे टाकले होते. मिळालेल्या माहितीनुसार, एनआयएने छापेमारीत जवळपास 6 गॅंगस्टर्सची चौकशी केली आहे. गॅंगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि बवाना टोळीच्या नावाने देशाच्या अनेक भागात फंडिंगचे प्रकार समोर आले आहेत.

पीएफआय संदर्भात राजस्थानमध्ये छापा : यापूर्वी एनआयएने राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये पीएफआय अधिकाऱ्यांच्या ठिकाणांवर छापे टाकले होते. माहितीनुसार, एनआयएने छापेमारीत अनेक पीएफआय अधिकाऱ्यांनाही ताब्यात घेतले होते. 18 फेब्रुवारीला पहाटे हा छापा टाकण्यात आला होता. मिळालेल्या माहितीनुसार, पीएफआयचे माजी जिल्हाध्यक्ष मोहम्मद नदीम यांना ताब्यात घेण्यात आले आहे. पीएफआयकडून मात्र अद्याप यावर कोणतेही विधान आलेले नाही. यापूर्वीही एनआयएने कोटा येथे वेगवेगळे छापे टाकले होते. गृहमंत्रालयाने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर बंदी घातल्यानंतर सातत्याने छापेमारी सुरू आहे.

उत्तर प्रदेशच्या पिलीभीत आणि प्रतापगडमध्ये छापे : एनआयएने सोमवारी रात्रीपासून उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये छापे टाकण्यास सुरुवात केली. एनआयएचे पथक छाप्यासाठी प्रतापगडला पोहोचले. त्याचवेळी पिलीभीतमध्येही छापे टाकण्यात आले. उत्तर प्रदेशच्या अनेक जिल्ह्यांमध्ये एनआयएने सोमवारी रात्रीपासून गॅंगस्टर्स, दहशतवादी फंडिंग आणि शस्त्रास्त्र पुरवठादारांच्या संबंधात छापे टाकण्यास सुरुवात केली. केंद्रीय तपास यंत्रणा एनआयएने पिलीभीत आणि प्रतापगडमध्ये मोठे छापे टाकले. प्रतापगडमध्ये एनआयएने नगर कोतवालीच्या गोडे गावात छापा टाकला. मात्र, चुकीच्या पत्त्यावर छापा टाकून एनआयएचे पथक गावातून परतले. सध्या प्रतापगडमध्ये एनआयएच्या टीमची उपस्थिती असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचवेळी पीलीभीतमध्येही एनआयएने छापे टाकले आहेत.

हेही वाचा :Sonu Nigam News: सोनू निगमला चेंबूरमध्ये कार्यक्रमादरम्यान शिवसेना सदस्यांनी मारहाण केल्याचा आरोप; एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

ABOUT THE AUTHOR

...view details