ETV Bharat / state

Sonu Nigam News: चेंबूरमध्ये कार्यक्रमादरम्यान सोनू निगमला आमदार पुत्राकडून मारहाण; गुन्हा दाखल

author img

By

Published : Feb 21, 2023, 6:36 AM IST

Updated : Feb 21, 2023, 2:12 PM IST

चेंबूरमध्ये लाइव्ह म्युझिक कार्यक्रमादरम्यान काही लोकांनी सोनू निगमवर हल्ला केल्याची घटना सोमवारी रात्री घडली आहे. चेंबूर फेस्टिवलचा सोमवारी शेवटचा दिवस होता. ज्यामध्ये सोनू निगमला आमंत्रित करण्यात आले होते. सोनू निगम या कार्यक्रमासाठी आला असताना त्याला धक्काबुक्की झाल्याचा व्हिडिओ वाऱ्यासारखा वायरल झाला. धक्काबुक्की नेमकी कशामुळे झाली? याबाबत पोलिसांकडून अधिकृत माहिती मिळालेली नाही.

Sonu Nigam News
सोनू निगमला कार्यक्रमादरम्यान धक्काबुक्की

सोनू निगमला कार्यक्रमादरम्यान धक्काबुक्की

मुंबई : उद्धव ठाकरे गटाच्या आमदाराच्या मुलाने सोनू निगमच्या महिला मॅनेजर असलेल्या सायरा हिला धक्काबुक्की केल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे सेल्फी काढण्यावरून धक्काबुक्की झाल्याचे बोलले जात आहे. धक्काबुक्की होऊन स्टेजवरून एक माणूस पडताना वायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे. पांढरा पेहराव केलेला सोनू निगम स्टेजवरून खाली उतरताना त्याला देखील धक्काबुक्की केल्याचे व्हायरल व्हिडिओतून स्पष्टपणे दिसत आहे. याप्रकरणी चेंबर पोलीस ठाण्यात गायक सोनू निगमी अनेक जबाब नोंदवलेले आहे. चेंबूर पोलीस धक्काबुक्की करणाऱ्या लोकांचा शोध घेत आहे. या हल्ल्यात सोनू निगमसोबत आलेला रब्बानी खान जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. चेंबूरमध्ये गायक सोनू निगमच्या लाइव्ह कॉन्सर्टदरम्यान झालेल्या हाणामारीप्रकरणी मुंबई पोलिसांनी एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गायक सोनू निगम, शिवसेना (यूबीटी) नेत्या प्रियंका चतुर्वेदी आणि डीसीपी यांनी या प्रकरणी निवेदने दिली आहेत.




सेल्फी घेण्यावरून गायक सोनू निगमसोबत वाद : हल्लेखोराने गायकाच्या मॅनेजरला स्टेजवरून उतरण्यास सांगितले. सोनू येत असताना त्याला धक्काबुक्की केली. मिळालेल्या माहितीनुसार त्या व्यक्तीने सोनूच्या मित्रालाही धक्काबुक्की केली. दोघांना दुखापत झाली आहे. नंतर इंटरनेट मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती सोनू आणि त्याच्या मित्राला ढकलताना दिसत आहे. या घटनेनंतर सोनू निगमने आरोपीविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. मुंबईतील एका कार्यक्रमात सेल्फी घेण्यावरून बॉलिवूड गायक सोनू निगमसोबत वाद झाल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले. कथित भांडणात सोनूचा एक साथीदारही जखमी झाला.

चाहत्यांनी मारहाण केली : एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, निगम एका संगीत महोत्सवात सहभागी होण्यासाठी चेंबूरच्या उपनगरात असताना रात्री 11 च्या सुमारास ही घटना घडली. कार्यक्रम स्थळावरून बाहेर पडत असताना, चाहत्यांचा एक गट सेल्फीसाठी गायकाकडे आला तेव्हा त्याच्या दोन सहकाऱ्यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. यानंतर, सोनू निगमच्या दोन्ही साथीदारांना चाहत्यांनी मारहाण केली, परिणामी त्यांच्यापैकी एक किरकोळ जखमी झाला, असे अधिकाऱ्याने सांगितले. सोनू निगमचा मित्र रब्बानी मुस्तफा खान याला अधिक दुखापत झाली आहे. खानला रुग्णालयात नेले तेव्हा सोनू निगमही त्याच्यासोबत होता. यानंतर सोनू निगम आपला जबाब नोंदवण्यासाठी पोलिसात पोहोचला.


गैरवर्तन करून उद्धटपणे बोलल्याचा आरोप : अधिक जखमी रब्बानी हा दिवंगत उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचा मुलगा असून ते सोनू निगमचे गुरू होते. रब्बानी आणि सोनू खूप जवळचे मित्र असल्याचे सांगितले जाते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे कॅम्पचे आमदार प्रकाश फाटर्पेकर यांच्या मुलाने त्याच्या साथीदारांसह सोनू निगम आणि खान यांच्यावर हल्ला केला. सोनू निगम मंचावर सादरीकरण करत असताना आमदार प्रकाश फाटर्पेकर यांच्या मुलाने सोनूचा व्यवस्थापक साईराज यांच्याशी गैरवर्तन करून उद्धटपणे बोलल्याचा आरोप केला.



सेल्फी घेण्याचा प्रयत्न : कार्यक्रमानंतर सोनू मंचावरून खाली उतरत असताना आमदार मुलाने घाईघाईने सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान सोनूचा अंगरक्षक हरी याने त्याला शिष्टाचारासह सेल्फी घेण्यास सांगितले. आमदार मुलाने संतापून हरीला धक्काबुक्की केली. यादरम्यान त्याने सोनू निगमलाही धक्काबुक्की केली. बॉडी गार्ड हरीने लगेच सोनूला पकडून त्याला पडण्यापासून वाचवले. यानंतर आमदाराच्या मुलाने रब्बानी मुस्तफा खान यांना धक्काबुक्की केल्याने ते गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. सध्या सोनू निगमने या मुद्द्यावर कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी केलेले नाही. सोनू निगमने काही वर्षांपूर्वी अजानबाबत केलेल्या वक्तव्याशी या प्रकरणाचा काहीही संबंध नसल्याचे सांगण्यात आले.

हेही वाचा : Actress Bela Bose Passed Away: ज्येष्ठ अभिनेत्री बेला बोस यांचे निधन; वयाच्या 79 वर्षी घेतला अखेरचा श्वास

Last Updated : Feb 21, 2023, 2:12 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.