महाराष्ट्र

maharashtra

NIA Raids In Pune Mumbai: इस्लामिक स्टेटशी संबंध असल्याचा संशय; 'एनआयए'ची मुंबई, पुणे येथे 5 ठिकाणी छापेमारी

By

Published : Jul 3, 2023, 7:05 PM IST

इस्लामिक स्टेटशी (ISIS Connection) संबंधित एका प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेने (National Investigation Agency) (एनआयए) सोमवारी महाराष्ट्रातील मुंबई आणि पुणे येथे पाच ठिकाणी शोध घेत छापेमारी केली. (NIA raids in Mumbai Pune)

NIA Raids In Pune Mumbai
एनआयएची छापेमारी

नवी दिल्ली: पुण्यातील एका ठिकाणी आणि मुंबईतील चार ठिकाणी अजूनही शोध सुरू आहे. (ISIS Connection) सूत्रांनी 'एएनआय'ला सांगितले की, छापे टाकण्यात आलेल्या ठिकाणी (National Investigation Agency) इस्लामिक स्टेटशी (ISIS) निष्ठा असलेल्या संशयितांच्या ठिकाणांचा समावेश आहे. (NIA raids in Mumbai Pune)

भारतविरुद्ध युद्ध पुकारल्याचा संशय: दहशतवाद विरोधी पथकाने या वर्षाच्या सुरुवातीला गुन्हा दाखल केला आणि दहशतवादी आणि हिंसाचाराच्या घटना घडवून आणण्यासाठी आणि भारताविरुद्ध युद्ध पुकारण्याच्या इस्लामिक स्टेट (ISIS) योजनेचा एक भाग म्हणून दहशतवादी कट रचणाऱ्या संशयितांविरुद्ध चौकशी सुरू केली. अशी माहिती सूत्रांनी दिली.

नऊ जणांविरुद्ध आरोपपत्र : सूत्रांनी सांगितले की, “भारतातील आयएस विचारसरणीच्या समर्थकांकडून पसरवलेल्या या प्रकरणातील संपूर्ण कट उघड करण्यासाठी 'एनआयए'चा तपास सुरू आहे.” कर्नाटकातील शिवमोग्गा जिल्ह्यातील ISIS कट प्रकरणात NIA ने नऊ जणांविरुद्ध पहिले पुरवणी आरोपपत्र दाखल केल्यानंतर दोन दिवसांनी हे पाऊल पुढे आले आहे. या प्रकरणात, आरोपींनी शिवमोग्गा येथे आयईडी स्फोटाची चाचणी केली होती. तसेच इस्लामिक स्टेटच्या कटाचा एक भाग म्हणून, लोकांमध्ये दहशत आणि भीती पसरवण्यासाठी अनेक ठिकाणी जाळपोळ करून मालमत्ता आणि वाहनांची जाळपोळ केली होती. भारतातील दहशतवादी आणि हिंसाचाराच्या घटना आणि भारताविरुद्ध युद्ध पुकारण्याचे कटकारस्थान सुरूच असल्याची माहिती उजेडात आली आहे.

दहशतवादी काश्मीरी जोडप्यास अटक : या वर्षी मार्चमध्ये, 'एनआयए'ने इस्लामिक स्टेट- खोरासान प्रांत (ISKP) प्रकरणात सिवनी (मध्य प्रदेश) येथे चार आणि पुण्यातील एका ठिकाणी शोध घेतला. दिल्लीतील ओखला, जामिया येथून काश्मिरी जोडपे जहांजैब सामी वानी आणि त्याची पत्नी हिना बशीर बेग यांना अटक केल्यानंतर दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने सुरुवातीला हा गुन्हा दाखल केला होता, अशी माहिती तपास यंत्रणेने दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details