ETV Bharat / bharat

Udaipur Crime News : लज्जास्पद! विधवेला आधी मारहाण करून केस कापले, नंतर अर्धनग्न अवस्थेत बाजारात पळवले!

author img

By

Published : Jul 1, 2023, 6:48 PM IST

Updated : Jul 1, 2023, 7:12 PM IST

राजस्थानच्या उदयपूरमध्ये आधी एका विधवेला बेदम मारहाण करून तिचे केस कापले. त्यानंतर तिला अर्धनग्न करून बाजारात पळवले गेले. यादरम्यान पीडितेचे लहान मूल रडत रडत राहिले, मात्र कोणालाच त्याची दया आली नाही.

Udaipur Crime News
उदयपूर क्राईम न्यूज

पहा व्हिडिओ

उदयपूर (राजस्थान) : राजस्थानच्या उदयपूरमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. येथे प्रेमसंबंधाच्या संशयावरून एका विधवेला 12 हून अधिक महिलांनी अर्धनग्न करून बेदम मारहाण केली. धक्कादायक म्हणजे, त्यावेळी तेथे उपस्थित असलेले लोकं या घटनेचा व्हिडिओ बनवण्यात मग्न होते. आता या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे प्रकरण उदयपूरच्या देवला भागातील असल्याचे सांगितले जात आहे.

महिलेला अर्धनग्न करून बाजारात पळवले : माहितीनुसार, पीडित महिला शिवणकाम करते. तिच्या पतीचे सुमारे एका वर्षापूर्वी निधन झाले आहे. भीमाना येथील डझनहून अधिक महिलांनी पीडितेच्या दुकानात जाऊन तिच्यावर अत्याचार करत तिचे केस कापले. त्यानंतर त्यांनी विधवा महिलेला अर्धनग्न करून भर मार्केटमध्ये पळवले. या दरम्यान पीडितेचा मुलगा रडत होता, मात्र मारहाण करणाऱ्या महिला थांबल्या नाहीत. आजूबाजूच्या लोकांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता, मारहाण करणाऱ्या महिलांनी त्यांनाही धमकावून पळवून लावले.

घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल : ही घटना गुरुवारी घडल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र आज या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओ समोर आल्यानंतर शुक्रवारी उदयपूरचे एसपी भुवन भूषण यादव यांच्या निर्देशानुसार पोलिसांचे पथक महिलेच्या घरी पोहोचले. त्यांनी पीडितेला उपचारासाठी रुग्णालयात नेले. त्याचबरोबर महिलेकडून माहिती घेऊन आरोपी महिलांवर कारवाई करण्यात येत आहे. पोलीस अधिकारी या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत असल्याचे एसपींनी सांगितले.

पोलिसांचा तपास सुरु : या प्रकरणी आयटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल, असे पोलीस अधीक्षक भुवन भूषण यादव यांनी सांगितले. यासाठी पोलिसांची पथके पाठवण्यात आली आहेत. पोलिस पीडितेला सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहेत.

हे ही वाचा :

  1. Bihar Man Lick Spit : बिहार पोलिसांचे लाजिरवाणे कृत्य, तरुणाला मारहाण करत थुंकी चाटायला लावली ; हे आहे कारण
  2. Mumbai Crime News: धावत्या लोकलमध्ये विनयभंगाचे सत्र सुरू; तरूणाने अश्लील चाळे आणि शिवीगाळ करत केला तरूणीची छेड काढण्याचा प्रयत्न
  3. Delhi Crime News : वडिलांसमोर मुलाची चाकूने भोसकून हत्या, दोन वर्षांपूर्वीच्या घटनेचा घेतला बदला
Last Updated : Jul 1, 2023, 7:12 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.