महाराष्ट्र

maharashtra

मुर्रा म्हशींची विदेशातही वाढली मागणी, दुग्धोत्पादनातून बेरोजगार कमवू शकतात नफा

By

Published : Aug 9, 2021, 4:11 PM IST

Updated : Aug 9, 2021, 5:22 PM IST

मुर्रा जातीच्या म्हशींची शिंगे ही जिलेबीच्या आकाराची असतात. या म्हशी इटली, बुल्गारिया, रशिया आदी देशांमध्ये पाळण्यात येतात.

मुर्रा म्हशींची विदेशातही वाढली मागणी
मुर्रा म्हशींची विदेशातही वाढली मागणी

चंदीगड - हरियाणामधील मुर्रा म्हशीची (Murrah Buffalo Haryana) देशासह विदेशात मागणी वाढली आहे. कारण, या म्हशीची दूध देण्याची क्षमता आहे. मुर्रा जातीची म्हैस ही एका दिवसात 20 ते 25 लिटर दूध देते. या दुधात 7 टक्के फॅट असते.

कोणत्याही हवामानात मुर्रा म्हशी जगू शकतात. मात्र, त्यांना गोंगाटाचे ठिकाण आवडत नाही. शांततेच्या ठिकाणी मुर्रा म्हशी राहणे पसंत करतात. हरियाणात मुर्रा म्हशींना काळे सोने म्हटले जाते. दुधामध्ये प्रथिनांचे अधिक प्रमाण आहे. मुर्रा जातीच्या म्हशींची शिंगे ही जिलेबीच्या आकाराची असतात. या म्हशी इटली, बुल्गारिया, रशिया आदी देशांमध्ये पाळण्यात येतात.

मुर्रा म्हशींची विदेशातही वाढली मागणी

हेही वाचा-मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यावर विचार सुरू, सरकारची लोकसभेत माहिती

मुर्रा म्हैस 310 दिवसांनी वासराला जन्म देते. करनाल पशुपालन विभागाचे उपसंचालक डॉ. धर्मेंद्र सिंह म्हणाले, की मुर्रा हरियाणातील म्हशीची मुख्य जात आहे. या म्हशीचे विदेशातही पालन केले जाते.

हेही वाचा-Quit India Movement : 'ऑगस्ट क्रांती दिना'ला 80 वर्ष पूर्ण; वाचा नेमकं त्यावेळी काय घडलं...

बेरोजगार तरुण दुग्धोत्पादन करून नफा कमवू शकतात

मुर्रा म्हशींच्या पशुपालनाला प्रोत्साहन देण्याकरिता मध्य प्रदेशच्या पशुपालन विभागाने काही योजना जाहीर केलेल्या आहेत. या योजनांमधून बेरोजगार तरुण दुग्धोत्पादन करून नफा कमवू शकतात. 4 ते 10 म्हशींच्या डेअरीवर 25 टक्के अनुदान दिले जात. तर 20 ते 50 मुर्रा म्हशींच्या डेअरीर 5 वर्षांपर्यंत पशुपालन विभागाकडून 75 टक्के व्याज देण्यात येते. करनाल जिल्ह्यात सुमारे 2 लाख मुर्रा म्हशी आहेत. मुर्रा म्हशींचे प्रमाण वाढविण्यासाठी उच्च दर्जाचे सीमेन उपलब्ध करून दिलेले आहे. त्यामुळे उच्च दर्जाच्या पशुंची पैदास होऊ शकते.

हेही वाचा-पोक्सो कायद्यांतर्गत राहुल गांधींवर गुन्हा दाखल करा, दिल्ली उच्च न्यायालयात याचिका

Last Updated : Aug 9, 2021, 5:22 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details