ETV Bharat / bharat

Quit India Movement : 'ऑगस्ट क्रांती दिना'ला 80 वर्ष पूर्ण; वाचा नेमकं त्यावेळी काय घडलं...

author img

By

Published : Aug 9, 2021, 3:21 PM IST

Updated : Aug 9, 2021, 3:50 PM IST

'ऑगस्ट क्रांती दिना'ला आज 80 वर्ष पूर्ण झाली आहेत. 8 ऑगस्ट 1942 महात्मा गांधींनी 'भारत छोडो' आंदोलनाची हाक दिली होती. त्यानंतर 9 ऑगस्ट हा दिवस 'क्रांती दिन' म्हणून पाळण्यात आला.

Quit India Movement
Quit India Movement

हैदराबाद - 9 ऑगस्ट हा 'ऑगस्ट क्रांती दिन' म्हणून साजरा केला जातो. आज 'ऑगस्ट क्रांती दिना'ला 80 वर्ष पूर्ण झाली आहेत. 8 ऑगस्ट 1942 महात्मा गांधींनी 'भारत छोडो' आंदोलनाची हाक दिली होती. त्यानंतर 9 ऑगस्ट हा दिवस 'क्रांती दिन' म्हणून पाळण्यात आला. या आंदोलनाने ब्रिटीश साम्राज्याला हादरा बसला होता. तेथून पुढे पाच वर्षांनी भारताला स्वातंत्र मिळाले. त्यामुळे या दिवसाला भारताच्या इतिहासात खूप महत्त्व आहे.

80 वर्षापूर्वी म्हणजे 8 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईच्या गवालिया टँक मैदानावर महात्मा गांधींनी 'भारत छोडो' आंदोलनाची हाक दिली होती. त्याच्या दुसऱ्याच दिवसापासून ब्रिटीशांनी महत्मा गांधी, पंडीत जवारलाल नेहरूंसह इतर महत्त्वाच्या नेत्यांना अटक करण्यास सुरु केली. महात्मा गांधींनी यावेळी 'करो या मरो' असा नारा दिल्याने प्रत्येक भारतीयांच्या मनात उत्साह होता. त्यानंतर अनेकांनी रस्त्यावर उतरत क्रांतीची मशाल पेटवली. या आंदोलनाची व्याप्ती देशभरात पसरली होती. या आंदोलनाने ब्रिटीश साम्राज्यालाही हादरा बसला होता. दरम्यान, या आंदोलनाला दुसऱ्या महायुद्धाचीही पार्श्वभूमी होती. जपान सिंगापूर, मलाया आणि बर्मा जिंकून भारताच्या सीमेपर्यंत पोहोचला होता. अशा वेळी मित्र राष्ट्रांसाठी भारतीयांचा पाठिंबा अत्यंत महत्त्वाचा होता. यावेळी भारताचे गव्हर्नर जनरल होते लॉर्ड लिनलिथगो. त्यांनी काँग्रेसला विश्वासात न घेता भारत दुसऱ्या महायुद्धात सहभागी होत असल्याची घोषणा केली. त्यामुळे काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजी होती. मात्र, काही दिवसांनी दुसऱ्या महायुद्धाच्या सहभागाबदल्यात स्वांतत्र्याची मागणी भारतीय नेत्यांकडून करण्यात आली.

भारत छोडो आंदोलनाच्या घोषणेनंतर अनेक महत्त्वाच्या नेत्यांना अटक करण्यात आली होती. या अटकेनंतर या आंदोलनाला नेतृत्व राहणार नाही आणि आंदोलकामधील उत्साह कमी होईल, अशी ब्रिटीशांची धारणा होती. मात्र, या उलट झालं, काँग्रेस नेत्यांना अटक केल्यानंतर भारतीयांमध्ये असंतोष वाढतच गेला. अनेक ठिकाणी आंदोलकाकडून हिंसक आंदोलन करण्यात आले होते. तसेच यावेळी अनेक मोठ्या नेत्यांनी भूमिगत राहून या आंदोलनाला दिशा देण्याचा प्रयत्न केला. यासाठी भूमिगत रेडीओ केंद्रही सुरु करण्यात आले होती. या आदोलनात महिलांसह कामगार, पत्रकार, शेतकरी, कलाकारांचा सक्रिय सहभाग होता. या आंदोलनामुळे दीडशे वर्षांची गुलामी अंतिम टप्प्यात पोहोचली होती. या आंदोलनामुळे आपल्याला स्वातंत्र मिळेल, असा आत्मविश्वास प्रत्येक भारतीयांच्या मनात होता. मात्र, या आंदोलनात अनेक वीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली होती.

हेही वाचा - आणीबाणी कधी, केव्हा, कोणत्या परिस्थितीत लादता येते...

Last Updated :Aug 9, 2021, 3:50 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.