महाराष्ट्र

maharashtra

Nana Patole in Bihar: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले बिहारच्या दौऱ्यावर.. म्हणाले, 'केंद्र सरकार जुमलेबाज, देशातील लोकशाही धोक्यात'

By

Published : Mar 29, 2023, 12:52 PM IST

राहुल गांधी यांचे लोकसभेचे सदस्यत्व रद्द झाल्यापासून काँग्रेसकडून मोदी सरकारवर हल्लाबोल करण्यात येत आहे. पाटण्याला पोहोचलेले महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, केंद्रात जुमलेबाजीचे सरकार आहे. देशातील लोकशाही धोक्यात आली आहे.

maharashtra congress president nana patole
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

पाटणा (बिहार): महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज पाटण्यात पोहोचले. पाटणा विमानतळावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी पटोले यांचे जल्लोषात स्वागत केले. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले की, देशात लोकशाही धोक्यात आली असून लोकशाही वाचवण्यासाठी काँग्रेस काम करेल. केंद्र सरकार हुकूमशाही वृत्ती अंगीकारत असून, त्याचा आम्ही सातत्याने विरोध करत आहोत. जोपर्यंत हे सरकार उखडून टाकले जात नाही तोपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहणार आहे. केंद्र सरकार मनमानी करत असून, राहुल गांधींच्या बाबतीत काय झाले ते पहा, असेही पटोले यावेळी म्हणाले.

नाना पटोले म्हणाले, 'कॉंग्रेसच लोकशाही वाचवेल' : नाना पटोले म्हणाले की, आज मी बिहारमध्ये आलो असून, याठिकाणी पत्रकार परिषदही घ्यावी लागेल. देशात लोकशाही कशी धोक्यात आहे आणि नरेंद्र मोदी सरकार कसे काम करत आहे हे बिहारच्या जनतेला सांगण्यासाठी आलो आहोत. ते म्हणाले की, बिहारमधील जनता राजकारणाबाबत खूप सक्रिय आहे आणि त्यांना स्वतःला माहrत आहे की केंद्रात बसलेले सरकार भाषणबाजी करत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक आश्वासने दिली पण त्यांनी बिहारच्या विकासासाठी काहीच केले नाही. काँग्रेसने बिहारसाठी खूप काही केले आहे मात्र मोदीजींनी दिलेली आश्वासने अद्याप पूर्ण केलेली नाहीत. नरेंद्र मोदींच्या सरकारने हुकूमशाही वृत्ती स्वीकारून राहुल गांधींचे सदस्यत्व रद्द केले आहे, हे आता जनतेला समजले आहे. हे बिहारच्या जनतेला सांगण्याचे काम आम्ही करू, काँग्रेसचे कार्यकर्ते याबाबत घरोघरी जातील आणि आम्हाला बिहारच्या जनतेचा पाठिंबा मिळेल अशी आशा आहे. काँग्रेस ही लढाई अधिक ताकदीने लढून लोकशाही वाचवेल.- नाना पटोले, महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना न्यायालयाकडून शिक्षा झाल्यानंतर त्यांची खासदारकी रद्द झाल्याने देशभरातील काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहे. केंद्रातील मोदी सरकारविरोधात विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसकडून पुढील रणनीती आखण्यात येत असून, त्याचाच एक भाग म्हणून नाना पटोले हे बिहारच्या दौऱ्यावर आले आहेत.

हेही वाचा: राष्ट्रवादीचे खासदार झाले होते लोकसभेतून निलंबित आता पुन्हा मिळाली खासदारकी

ABOUT THE AUTHOR

...view details