महाराष्ट्र

maharashtra

जिल्हाधिकाऱ्याच्या वाहनानं चिरडल्यानं तीन जणांचा जागीच मृत्यू, अपघातानंतर आयएएस अधिकाऱ्यानं काढला पळ?

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 21, 2023, 1:49 PM IST

madhepura dm news बिहारमधील मधुबनीमध्ये भीषण अपघात झाला. मधेपुरा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा दंडाधिकारी विजय प्रकाश मीणा यांची चारचाकी राष्ट्रीय महामार्ग एनएच-५७ वर अनियंत्रित झाली. यावेळी अनियंत्रित झालेल्या चारचाकीनं काहीजणांना चिरडलं. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला असून काहीजण जखमी झाले आहेत.

madhepura dm news
madhepura dm news

पाटणा (मधुबनी)madhepura dm news - मधुबनीमध्ये जिल्हाधिकारी विजय प्रकाश मीणा यांच्या भरधाव वेगातील वाहनानं काहीजणांना चिरडलं. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर जखमी झालेल्या काहीजणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तर दोघेजण गंभीर जखमी आहेत. अपघात हा फुलपरास पोलीस ठाण्याच्या हद्दीत एनएच ५७ या राष्ट्रीय महामार्गावर लोहिया चौकासमोर झाला.

जिल्हाधिकाऱ्यांच्या वाहनानं लोकांना चिरडलं- मिळालेल्या माहितीनुसार जिल्हाधिकाऱ्यांच्या भरधाव वेगातील वाहनानं काही लोकांना चिरडलं. यावेळी वाहनानं एनएच ५७ वरील रेलिंगला जोरदार धडक दिली. धडक लागल्यानं चारचाकीच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले. मात्र, वाहनात जिल्हाधिकारी उपस्थित होते की नाही, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार अपघात झाल्यानंतर चारचाकीमधून काही लोक बाहेर पडले. त्यामध्ये जिल्हाधिकारी यांचादेखील समावेश असल्याचा प्रत्यक्षदर्शींनी दावा केला.

स्थानिकांनी वाहन चालकाला दिले पोलिसांच्या ताब्यात- अपघात झाल्यानंतर घटनास्थळी एकच आक्रोश झाला. संतप्त झालेल्या स्थानिकांनी एनएच ५७ महामार्गावरील वाहने रोखून धरली. अपघाताची माहिती मिळतचा फुलपरास ठाण्याचे पोलीस घटनास्थळी पोहोचले आहे. स्थानिकांनी अपघातानंतर पळ काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या चालकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. पोलिसांनी अपघातामधील मृत्यू झालेल्या नागरिकांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविले आहेत. दुसरीकडं संतप्त झालेल्या स्थानिक नागरिकांची पोलिसांची समजुतदेखील काढत आहेत. मृतांमध्ये महिला, बालक आणि महामार्गावर काम करणाऱ्या मजुराचा समावेश आहे.

जिल्हाधिकाऱ्यांची चारचाकी वेगानं येत होती. अचानक चारचाकी अनियंत्रित झाली. चारचाकीनं लोकांना चिरडून रस्ते दुभाजकाला धडक दिल्यानं अपघात झाला. अपघात झाल्यानंतर चारचाकीतून काही लोक पळून गेले आहेत. वाहन चालकाला लोकांनी पकडलं आहे. प्रत्यक्षदर्शी

अपघाताबाबत पोलिसांचे मौन- अपघातामधील मृत महिला आणि बालक हे फुलपरास पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहतात. तर महिलेचा पती हा पानाचे दुकान चालवितो. अद्याप, दुसऱ्या मृताची ओळख पटलेली नाही. स्थानिक लोकांच्या माहितीनुसार एनएच ५७ महामार्गावर काही काम सुरू असताना मजूर हा काम करत होता. तेव्हा हा अपघात झाला. स्थानिक पोलीस अपघाताबाबत 'ब्र'ही काढायला तयार नाहीत. तर जिल्हाधिकाऱ्यांशी अद्याप संपर्क होऊ शकला नाही.

हेही वाचा-

  1. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेत सुरक्षेसाठी जात होते पोलीस : गाडीला अपघात होऊन सहा पोलिसांचा मृत्यू
  2. सिलक्यारा बोगद्यात अडकलेल्या कामगारांना वाटत आहे अस्वस्थ, सलग आठव्या दिवशी बचाव मोहिम सुरू

ABOUT THE AUTHOR

...view details