ETV Bharat / bharat

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेत सुरक्षेसाठी जात होते पोलीस : गाडीला अपघात होऊन सहा पोलिसांचा मृत्यू

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 19, 2023, 2:11 PM IST

Rajasthan Road Accident : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत सुरक्षा देण्यासाठी जाणाऱ्या पोलिसांच्या गाडीला अपघात झाला. या अपघातात सहा पोलिसांचा मृत्यू झाला. तर एक पोलीस जखमी झाला.

Rajasthan Road Accident
घटनास्थळ

जयपूर Rajasthan Road Accident : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या सुरक्षेसाठी जाणाऱ्या पोलिसांच्या वाहनाला भीषण अपघात होऊन सहा पोलिसांचा मृत्यू झाला. ही घटना नागौर जिल्ह्यातील खिंवसरजवळ आज पहाटे झाली. या अपघातात एक पोलीस जखमी झाला आहे, त्यांना नागौर इथल्या जेएलएन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची झुझुनू इथं सभा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झुंझुनू इथं आयोजित करण्यात आली आहे. या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेसाठी हे पोलीस खिवंसर इथून झुंझुनूकडं आज पहाटे निघाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत प्रचंड गर्दी होणार असल्यानं सभेत सुरक्षाव्यवस्था संभाळण्याची जबाबदारी पार पाडण्यासाठी हे पोलीस जवान सभास्थळी पोहोचणार होते. मात्र कानुता आणि खबडियानाच्या दरम्यान प्रवास करताना पोलिसांच्या गाडीला भीषण अपघात झाला.

ट्रॉलीला धडकली पोलीस गाडी : झुंझुनू इथं होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी पोलीस दलाची गाडी खिंवसरहून झुंझुनूकडं आज पहाटे जात होती. दरम्यान कानुता आणि खबडियाना दरम्यान पोलिसांची गाडी राष्ट्रीय महामार्ग 58 वर रस्त्यावरील ट्रॉलीला धडकून भीषण अपघात झाला. या अपघातात पाच पोलीस जवानांचा जाग्यावरच मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. तर एका पोलिसाचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. इतर पोलीस पोलीस जखमी झाले.

जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू : रोड अपघातात जखमी झालेल्या पोलीस जवानावर नागौरच्या जेएलएन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांची गाडी समोरून येणाऱ्या ट्रकला धडकली, त्यामुळे हा अपघात झाल्याचं नागौर जेएलएन हॉस्पिटल चौकीचे कॉन्स्टेबल रामकुमार यांनी सांगितलं. झुंझुनू इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेला उपस्थित राहण्यासाठी सात पोलीस कर्मचारी ड्युटीवर जात असताना महामार्गावर एका ट्रॉलीला गाडीची धडक बसली. या घटनेत सहा पोलिसांचा मृत्यू झाला. चुरूच्या सुजानगढ सदर पोलीस स्टेशन परिसरात हा अपघात झाला. नागौर जिल्ह्यातील खिंवसार पोलीस स्टेशनचे पोलीस शिपाई रामचंद्र, कुंभारम, थानाराम, लक्ष्मण सिंह आणि सुरेश यांचा या अपघातात मृत्यू झाला, तर कॉन्स्टेबल सुखराम आणि हेड कॉन्स्टेबल सुखराम जखमी झाले. जखमींना नागौर इथल्या जेएलएन रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं आहे.

हेही वाचा :

  1. Nashik Accident News : भीषण अपघात; गणपती घेण्यासाठी आलेल्या कारने अनेकांना उडवले
  2. Pune Banglore Highway Accident : पुणे-बंगळुरु हायवेवर भीषण अपघात; पोलीस कर्मचाऱ्यासह तीन जणांचा जागीच ठार
  3. Rishikesh Road Accident : हायवेच्या मधोमध मस्ती करणाऱ्या तरुणाला भरधाव कारनं उडवलं, पाहा काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.