महाराष्ट्र

maharashtra

पंतप्रधानांच्या स्वागताला रस्ता केला गडबडीत! पंतप्रधान दिल्लीत जाताच झाला खडबडीत; PMO'कडून अहवाल मागवला

By

Published : Jun 24, 2022, 4:49 PM IST

पंतप्रधानांचा दौरा असल्याने रस्ते लगेच दुरुस्त होऊ शकतात. मात्र, सामान्य लोक कित्येक दिवसांपासून याच रस्त्यावरून प्रवास करत आहेत. त्यांच्यासाठी इतक्या लवकर का नाही रस्ते दुरुस्त होत असा प्रश्न आता कर्नाटकमधील नागरिक बौम्मई सरकारला विचारत आहेत.

पंतप्रधानांचा कर्नाटक दौरा
पंतप्रधानांचा कर्नाटक दौरा

बंगळुरू - पंतप्रधानांचा नुकताच कर्नाटक दौरा झाला. या दौऱ्यावेळी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी 23 कोटी रुपये खर्चून बेंगळुरू येथील रस्त्याचे तत्काळ काम करून घेतले. दरम्यान, हे काम निकृष्ट दौऱ्याचे झाले आहेत अशी नागरिकांची तक्रार आहे. दरम्यान, आता या घटनेच्या पंतप्रधान कार्यालयाने अहवाल मागवला आहे. सुमारे 23 कोटी रुपये खर्च करून हे रस्ते बनवले आहेत.

पंतप्रधानांचा दौरा असल्याने रस्ते लगेच दुरुस्त होऊ शकतात. मात्र, सामान्य लोक कित्येक दिवसांपासून याच रस्त्यावरून प्रवास करत आहेत. त्यांच्यासाठी इतक्या लवकर का नाही रस्ते दुरुस्त होत असा प्रश्न आता कर्नाटकमधील नागरिक बौम्मई सरकारला विचारत आहेत.

23 कोटी रुपयांच्या रस्त्यांच्या कामाचा भाग असलेल्या ज्ञानभारती मुख्य रस्त्याची 6 कोटी रुपये खर्चून दुरुस्ती करण्यात आली आणि सोमवारी पंतप्रधान मोदींनी या मार्गावर प्रवास केला. रात्रभर पडलेल्या पावसानंतर, रस्ता खचला. बीबीएमपीचे मुख्य आयुक्त तुषार गिरीनाथ यांनी सांगितले की, काही ठिकाणी डांबरी रस्ता केवळ मुसळधार पावसामुळे खराब झाला होता आणि "दुरुस्त रस्त्याचा संपूर्ण भाग आहे असे म्हणणे योग्य नाही.

रवींद्र पी.एन., विशेष आयुक्त म्हणाले की त्यांनी आतापर्यंत शहरातील 14,500 खड्डे बुजवले आहेत आणि आणखी 1,500 खड्डे लवकरच दुरुस्त केले जातील "पण पावसामुळे कामाला विलंब होत आहे". शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था बेंगळुरूमधील प्रवाशांसाठी मोठी चिंतेची बाब बनली आहे. बायोकॉनचे प्रमुख किरण मजुमदार-शॉ यांच्यासह अनेक प्रमुख व्यक्तींनी हा मुद्दा उपस्थित केला आहे.

कर्नाटक उच्च न्यायालयाने बंगळुरूचे रस्ते दुरुस्त करण्यासाठी अनेक वेळा अधिकाऱ्यांना ताकीद दिली. पंतप्रधान कार्यालयाने (PMO) त्यांच्या बेंगळुरू भेटीनंतर रस्त्याच्या डांबरीकरणाच्या नव्या खड्ड्याबद्दल तपशीलवार अहवाल मागवला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी बीबीएमपी आयुक्तांना सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बंगळुरू दौऱ्यासाठी दुरुस्त केलेल्या रस्त्याच्या खड्ड्याची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.

हेही वाचा -Narhari Zirwal Not Reachable :...अन् आता विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ झाले नॉट रिचेबल

ABOUT THE AUTHOR

...view details