महाराष्ट्र

maharashtra

Karnataka Bandh : कावेरी पाणी प्रश्नावरून आज कर्नाटकात राज्यव्यापी बंद; ४४ विमान उड्डाणे रद्द, जनजीवन विस्कळीत

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 29, 2023, 1:38 PM IST

Karnataka Bandh : कर्नाटकात कावेरी नदीच्या पाण्याचा वाद वाढतोय. या मुद्द्यावर आज विविध संघटनांनी राज्यव्यापी बंदची हाक दिली. खबरदारीचा उपाय म्हणून मांड्या आणि बेंगळुरूमधील सर्व शाळा आणि महाविद्यालयं बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Karnataka Bandh
Karnataka Bandh

पहा व्हिडिओ

बेंगळुरू Karnataka Bandh : कावेरी नदीचं पाणी तामिळनाडूला सोडल्याच्या निषेधार्थ 'कन्नड ओक्कूटा' संघटनेनं कर्नाटकात आज (२९ सप्टेंबर) राज्यव्यापी बंदचं आवाहन केलंय. सकाळपासून राजधानी बेंगळुरूमध्ये बंदचा परिणाम दिसून येत असून, आंदोलक रस्त्यावर उतरून घोषणाबाजी करत आहेत. दरम्यान, पोलीस प्रशासनाकडून देखील चोख बंदोबस्त ठेवण्यात आलाय.

बेंगळुरूच्या फ्रीडम पार्कमध्ये अनोखं आंदोलन : आज राज्यातील शाळा आणि महाविद्यालयं पूर्णपणे बंद असून विमानांची तब्बल ४४ उड्डाणं रद्द करण्यात आली आहे. कर्नाटकात बंदच्या पार्श्वभूमीवर बेंगळुरू शहर, मांड्या, म्हैसूर, चामराजनगर, रामनगर आणि हसन जिल्ह्यांमध्ये कलम १४४ लागू करण्यात आलं आहे. तामिळनाडूसोबत पाणीवाटपाच्या वादानंतर आंदोलकांनी शुक्रवारी बेंगळुरूच्या फ्रीडम पार्कमध्ये अनोखं आंदोलन केलं. येथे संतप्त निदर्शकांनी बाटलीबंद पाण्यानं आंघोळ केली. या प्रदेशातील कावेरी नदीच्या पाण्याच्या टंचाईवर प्रकाश टाकणं हा या मागचा उद्देश होता.

कावेरी पाण्याच्या मुद्द्यावरून कन्नड समर्थक संघटना, शेतकरी संघटना आणि इतर अनेक संघटनांनी पुकारलेल्या बंदच्या पार्श्वभूमीवर मांड्या जिल्ह्यात कलम १४४ लागू करण्यात आलंय. येथील शाळा आणि महाविद्यालयं आज बंद राहतील. तसेच बेंगळुरू शहरातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्ये आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. - मांड्याचे उपायुक्त डॉ. कुमार

कर्नाटक रक्षण वेदिकेची सरकार विरोधात निदर्शने : तत्पूर्वी, कर्नाटक रक्षण वेदिके (KRV) संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी बंगळुरूमध्ये कावेरी नदीच्या पाणी प्रश्नावर राज्यातील सिद्धरामय्या सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शनं केली. KRV कार्यकर्त्यांनी, 'कावेरी आमची' अशा घोषणा देत कावेरी नदीचं पाणी तामिळनाडूला देण्यास विरोध केला. दरम्यान, KRV महिला मोर्चाच्या अध्यक्षा अश्विनी गौडा यांनी या प्रकरणी कन्नड लोकांना एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे. तसंच राज्यातील खासदारांनी या विषयावर बोलावं असं त्या म्हणाल्या. कर्नाटक रक्षा वेदिके स्वाभिमानी सेनेच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी अभिनेता सिद्धार्थची पत्रकार परिषद उधळून लावली. तो त्याच्या आगामी 'चिक्कू' चित्रपटासंदर्भात पत्रकार परिषद घेत होता.

हेही वाचा :

  1. Manipur Violence : मणिपूरमध्ये तणाव वाढला, संतप्त आंदोलकांचा मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर हल्ल्याचा प्रयत्न
  2. Rail Roko Movement In Punjab : पंजाबमधील रेल रोको आंदोलनात खलिस्तानवाद्यांच्या सहभागाची शक्यता; रेल्वेसह गुप्तचर विभाग सतर्क

ABOUT THE AUTHOR

...view details