महाराष्ट्र

maharashtra

नवं वर्ष, नवं मिशन! नवर्षाच्या पहिल्याच दिवशी 'इस्रो'नं 'हा' रचला रचला इतिहास, 'कृष्णविवरा'ची उलगडणार रहस्य

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 1, 2024, 7:16 AM IST

Updated : Jan 1, 2024, 9:52 AM IST

ISRO XPoSat Mission : नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी 'इस्रो'नं इतिहास रचलाय. 'XPoSat' या उपग्रहाचे श्रीहरिकोटा येथून यशस्वी प्रक्षेपण झालंय. ते कृष्णविवर आणि न्यूट्रॉन ताऱ्यांचा अभ्यास करणार आहे.

ISRO XPoSat Mission
ISRO XPoSat Mission

श्रीहरीकोटा ISRO XPoSat Mission :भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं (इस्रो) नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी इतिहास रचलाय. इस्रोनं आज श्रीहरिकोटा इथून आपली पहिली कृष्णविवर मोहीम सुरु केलीय. हा उपग्रह कृष्णविवर आणि न्यूट्रॉन ताऱ्यांचा अभ्यास करणार आहे. आज सकाळी 9.10 वाजता हा उपग्रह लॉन्च करण्यात आला. यावेळी सर्व मोठे शास्त्रज्ञ उपस्थित होते. इस्रोनं सोमवारी 2024 च्या पहिल्या अंतराळ मोहिमेमध्ये एक्स-रे पोलारिमीटर उपग्रह (XPoSat) प्रक्षेपित केलंय. आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून याचं प्रक्षेपण करण्यात आलं. भारतीय अंतराळ विभागाच्या चांद्रयान-3 आणि आदित्य एल1 मोहिमेनंतर, देशाच्या अंतराळ संशोधनाच्या दिशेनं हे पुढचे ऐतिहासिक पाऊल असेल.

10 उपग्रह घेऊन झेपावणार : ऑक्टोबरमध्ये गगनयान चाचणी वाहन 'डी1 मिशन'च्या यशानंतर हे प्रक्षेपण केलं जातंय. या प्रक्षेपणांच आयुष्य सुमारे 5 वर्षे असेल. ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहन (PSLV)-C58 रॉकेट, त्याच्या 60 व्या मोहिमेवर, मुख्य पेलोड 'XPoSat' आणि 10 इतर उपग्रह घेऊन जाईल. ते पृथ्वीच्या खालील कक्षेत ठेवले जातील.

कृष्णविवराचं रहस्य उलगडणार : एक्स-रे पोलारिमीटर सॅटेलाइट 'XPoSat' क्ष-किरण स्त्रोताचं रहस्य उलगडण्यास आणि कृष्ण विवरच्या रहस्यमय जगाचा अभ्यास करण्यास मदत करणार आहे. इस्रोच्या मते, अंतराळ-आधारित ध्रुवीकरण मापनांमध्ये खगोलशास्त्रीय स्त्रोतांकडून एक्स-रे उत्सर्जनाचा अभ्यास करणारा हा स्पेस एजन्सीचा पहिला समर्पित वैज्ञानिक उपग्रह असणार आहे. ब्रह्मांडातील सर्वाधिक चमकणाऱ्या 50 स्त्रोतांचा अभ्यास या उपग्रहाद्वारे करण्यात येणार आहे. पल्सर, ब्लॅक होल एक्स-रे बाइनरी, अ‍ॅक्टीव्ह गॅलेक्टीक न्यूक्लियाई, नॉन-थर्मल सुपरनोवा इत्यादींचा अभ्यास या उपग्रहाद्वारे करण्यात येईल. या सॅटेलाइटला 650 किमी ऊंचीवर ठेवलं जाणार आहे.

  • 2017 मध्ये केली हेती सुरुवात : इस्रोनं या मिशनची सुरुवात सन 2017 मध्येच केली होती. या मिशनसाठी 9.5 कोटी रुपये खर्च आलाय. लाँचिंगच्या जवळपास 22 मिनिटांनंतर 'XPoSat' सॅटेलाईट आपल्या निर्धारित कक्षेत तैनात होईल. पोलीक्स आणि एक्सपेक्ट या सॅटेलाईट्सला दोन पेलोड्स आहेत.

यापुर्वी नासानं केला असा अभ्यास : भारतीय अंतराळ एजन्सीच्यापूर्वी (इस्रो) यूएस स्पेस एजन्सी (नासा) नं डिसेंबर 2021 मध्ये सुपरनोव्हा स्फोटाचे अवशेष, कृष्णविवरांमधून बाहेर पडणाऱ्या कणांचे प्रवाह आणि इतर खगोलीय घटनांवर असाच अभ्यास केला होता. इस्रोनं सांगितलं की, क्ष-किरण ध्रुवीकरणाचा अवकाश-आधारित अभ्यास आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्वाचा ठरत आहे. या संदर्भात 'XPoSat' मिशन महत्त्वपूर्ण भूमिका बजाणार आहे.

हेही वाचा :

  1. गुप्तचर माहितीसाठी 50 उपग्रह प्रक्षेपित करणार; एस सोमनाथांनी स्पष्टच सांगितलं इस्रोचं प्लॅनिंग
  2. चंद्रयान ३ चे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग, जगभरात वाजला भारतीय शास्त्रज्ञांचा डंका
Last Updated :Jan 1, 2024, 9:52 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details