महाराष्ट्र

maharashtra

Rohit Sharma On IND vs AUS 1st T20 : गोलंदाजांवर भडकला रोहित शर्मा, सांगितली कुठे झाली चूक आणि सामन्याचा टर्निंग पॉईंट

By

Published : Sep 21, 2022, 1:01 PM IST

Rohit Sharma
रोहित शर्मा ()

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात ( IND vs AUS 1st T20 ) भारतीय संघाचा 4 विकेट्सनी पराभव ( Australia defeated India by 4 wickets ) झाला. मोहालीच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 208 धावा केल्या. पण खराब गोलंदाजीमुळे सामना हाताबाहेर गेला. ऑस्ट्रेलियाने हा सामना जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.

मोहाली: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील ( IND vs AUS T20 Series ) पहिल्या सामन्यात भारतीय संघाची सुरुवात खूपच खराब झाली आहे. हा सामना मंगळवारी (21 सप्टेंबर) झाला, ज्यामध्ये अत्यंत खराब गोलंदाजीमुळे भारताचा 4 विकेट्सनी पराभव ( Australia defeated India by 4 wickets ) झाला. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी कचखाऊ गोलंदाजी केली. ज्यामुळे हार्दिक पांड्या ( Hardik Pandya ), सूर्यकुमार यादव, केएल राहुल आणि अक्षर पटेल यांच्या शानदार कामगिरीवर पाणी फेरले गेले.

मोहालीच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 208 धावा केल्या. पण खराब गोलंदाजीमुळे सामना हाताबाहेर गेला. कॅमेरून ग्रीनच्या धडाकेबाज खेळीमुळे ऑस्ट्रेलियाने हा सामना जिंकला आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. त्यानंतर कर्णधार रोहित शर्माने कुठे चूक झाली आणि कुठे सामना फिरला याबद्धल सांगितले ( Rohit Sharma Statement After Match ).

पुढील सामन्यापूर्वी गोलंदाजीवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक -

सामना संपल्यानंतर रोहित शर्मा आपल्या गोलंदाजांवर भडकला ( Rohit Sharma angry on bowlers ). यासोबतच संघाची कुठे चूक झाली आणि सामन्याचा टर्निंग पॉइंट काय होता हेही सांगितले. टीम इंडियाची गोलंदाजी चांगली नसल्याची कबुली रोहितने दिली आहे. संघाने चांगली धावसंख्या उभारली, पण गोलंदाजांनी योग्य ठिकाणी गोलंदाजी केली नाही, असे कर्णधार म्हणाला. पुढच्या सामन्यापूर्वी गोलंदाजीवर लक्ष केंद्रित करावे लागेल. आम्ही मोहालीला आलो तेव्हा आम्हाला माहित होते की, इथे मोठ्या स्कोअरचा सामना होणार आहे.

'200 धावा करूनही तुम्ही रिलॅक्स राहू शकत नाही'- रोहित शर्मा

रोहित म्हणाला ( Rohit Sharma Statement ), 'आम्ही चांगली गोलंदाजी केली यावर माझा विश्वास नाही. 200 धावसंख्या ही बचावासाठी खुप चांगली असते. क्षेत्ररक्षणादरम्यानही आम्हाला विजयाच्या संधीचा फायदा घेता आला नाही. फलंदाजांनी जबरदस्त ताकद दाखवली, पण गोलंदाज खूपच कमकुवत दिसत होते. या काही गोष्टी पाहिल्या पाहिजेत. पण सामना खूप चांगला झाला कारण त्यातून आपण कुठे चुकतोय आणि कुठे कमी पडतोय हे दिसून आले. या मैदानावर हाय स्कोअरिंग सामने होतात, हे आम्हाला माहीत होते. 200 धावा करूनही तुम्ही रिलॅक्स राहू शकत नाही.

रोहितने सांगितला सामन्याचा टर्निंग पॉइंट ( Rohit told turning point of the match ) -

तो म्हणाला, 'आम्ही काही विकेट लवकर घेतल्या, पण त्यांनी चांगला खेळ दाखवला. त्याने काही एक्स्ट्रा ऑर्डिनरी शॉट्सही खेळले. त्याच्या जागी मीही असतो तर या लक्ष्याचा पाठलाग करता येईल अशी मला आशा होती. शेवटच्या 4 षटकात 60 धावांचा बचाव करता आला असता. पण आम्ही जास्तीच्या विकेट घेऊ शकलो नाही. हा सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरला. त्या परिस्थितीत दुसरी विकेट मिळाली असती तर निकाल वेगळा असू शकला असता.

कर्णधार रोहित शर्मा ( Captain Rohit Sharma ) म्हणाला, 'तुम्ही दररोज 200 धावा करू शकत नाही. यासाठी तुम्हाला चांगली फलंदाजी हवी आहे. हार्दिकने शानदार फलंदाजी केली. पुढच्या सामन्यापूर्वी आम्हाला आमच्या गोलंदाजीचा आढावा घ्यावा लागेल.

हेही वाचा -Ind Vs Aus 1st T20: मायदेशात भारताचा सलग चौथा पराभव, पहिल्या टी 20 सामन्यात ऑस्ट्रेलिया 4 विकेट्सने विजयी

ABOUT THE AUTHOR

...view details