IND vs AUS 1st T20: मायदेशात भारताचा सलग चौथा पराभव, पहिल्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलिया 4 विकेट्सने विजयी

author img

By

Published : Sep 21, 2022, 12:22 PM IST

IND vs AUS

ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित षटकात 6 विकेट गमावून 208 धावा केल्या आणि ऑस्ट्रेलियासमोर 209 धावांचे लक्ष्य ठेवले. हे आव्हान ऑस्ट्रेलियाने 19.2 षटकात पूर्ण करत भारतीय संघाला सलग चौथ्यांदा त्यांच्याच मायदेशात पराभूत ( Australia beat India ) केले.

मोहाली: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना ( IND vs AUS 1st T20 ) मंगळवारी मोहालीत पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने 4 विकेट्सने भारतीय संघाचा धुरळा उडवला ( Australia defeated India by 4 wickets ). या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना केएल राहुल आणि हार्दिक पांड्याच्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर, 6 गडी गमावून 208 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने 19.2 षटकांत सहा गडी गमावून लक्ष्य सहज गाठले. त्याचबरोबर चौथ्यांदा भारताला त्यांच्याच मायदेशात पराभूत केले.

ऑस्ट्रेलियाने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे भारतीय संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरला. भारताकडून केएल राहुलने आपल्या क्लास दाखवताना 35 चेंडूत 55 धावांची खेळी ( KL Rahul half century ) केली. त्याने या खेळीत 4 चौकार आणि 3 गगनचुंबी षटकार खेचले. त्यामुळे भारतीय संघ जलद धावा केल्या. त्यानंतर सूर्यकुमार यादवने ( Suryakumar Yadav ) आक्रमक होत, 25 चेंडूत 4 षटकार आणि 2 चौकार लगावले. परंतु अवघ्या 4 धावांनी अर्धशतक हुकले. दरम्यान सुरुवातीच्या फळीत विराट आणि रोहित स्वस्तात बाद ( Virat and Rohit get out cheaply ) झाले.

हार्दिक पांड्याची वादळी खेळी ( Hardik Pandya storming innings ) -

हार्दिक पांड्याने पुन्हा एकदा धुवादार खेळी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याने अवघ्या 30 चेंडूत 71 धावांची नाबाद वादळी खेळी साकारली. त्याचबरोबर त्याने टी-20 क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या उभारली. तसेच भारतीय संघाने देखील 6 गडी गमावून 208 धावा करताना ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपली सर्वोच्च धावसंख्या नोंदवली.

प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने 19.2 षटकांत सहा गडी गमावून लक्ष्य गाठले. भारताकडून अक्षर पटेलने ( Axar Patel ) सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर उमेश यादवने 2 आणि युझवेंद्र चहलने 1 विकेट घेतली. कॅमेरून ग्रीनने ( Cameron Greene ) 30 चेंडूत 61 धावा केल्या आणि मॅथ्यू वेडने ( Matthew Wade ) 21 चेंडूत 45 धावांची नाबाद खेळी केली. या विजयासह ऑस्ट्रेलियाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. पुढील सामना 23 सप्टेंबर रोजी नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होणार आहे. टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या तयारीच्या दृष्टीने ही मालिका दोन्ही संघांसाठी महत्त्वाची आहे. ऑस्ट्रेलियाकडून नॅथन एलिसने तीन, जोश हेझलवूडने दोन आणि कॅमेरून ग्रीनने एक विकेट घेतली.

हेही वाचा - Icc T20 Rankings : स्मृती मंधानाने आयसीसी टी 20 क्रमवारीत पटकावले कारकिर्दीतील सर्वोत्तम दुसरे स्थान

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.