महाराष्ट्र

maharashtra

England Women vs India Women 1st T20I : इंग्लंडने भारतीय महिला संघाचा नऊ गडी राखून केला पराभव

By

Published : Sep 11, 2022, 4:57 PM IST

भारतीय संघाला निर्धारित षटकांत सात विकेट्स गमावून केवळ 132 धावा करता आल्या. इंग्लिश संघाने ( England Women Team ) हे लक्ष्य 13 षटकांत एका विकेटच्या मोबदल्यात 134 धावा करून सहज गाठले. त्यामुळे भारतीय महिला संघाला 9 विकेटसने पराभवाची चव चाखावी ( England defeated Indian womens team by 9 wickets ) लागली.

England Women vs India Women
भारतीय महिला संघ

चेस्टर ली स्ट्रीट: भारतीय महिला क्रिकेट संघ ( Indian womens cricket team ) फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही विभागात अपयशी ठरला. ज्यामुळे पहिल्या टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात इंग्लंडने त्यांचा नऊ गडी राखून पराभव केला ( England defeated Indian womens team by 9 wickets ). इंग्लंडची कर्णधार एमी जोन्सने भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित करत, लेगस्पिनर सारा ग्लेनच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर भारताला 7 बाद 132 धावांवर रोखले. सलामीवीर सोफिया डंकलेच्या ( Opener Sophia Dunkley ) नाबाद 61 धावांच्या जोरावर इंग्लंडने 13 षटकांत 1 बाद 134 धावांवर सहज विजय नोंदवला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत लवकरच आघाडी घेतली.

लेगस्पिनर सारा ग्लेनची शानदार गोलंदाजी -

ग्लेनने चार षटकांत 23 धावा देत चार बळी ( Brilliant bowling by legspinner Sarah Glenn ) घेत भारतीय फलंदाजांना सुरुवातीपासून शेवटपर्यंत अडचणीत ठेवले. भारताचा एकही फलंदाज शेवटपर्यंत खेळू शकला नाही. भारताकडून अष्टपैलू दीप्ती शर्माने 29 चेंडूत सर्वाधिक 24 धावा केल्या. सलामीवीर स्मृती मानधना 23 तर कर्णधार हरमनप्रीत कौर 16 चेंडूत 20 धावा करून ग्लेनच्या गोलंदाजीवर बाद झाली. यष्टिरक्षक फलंदाज ऋचा घोषने चांगली सुरुवात करत 12 चेंडूत 16 धावा केल्या, मात्र तिला त्याचे मोठ्या डावात रूपांतर करता आले नाही आणि मध्यमगती गोलंदाज फ्रेया डेव्हिसच्या गोलंदाजीवर झेलबाद झाली.

भारतीय सलामीवीरांना चांगल्या सुरुवातीचा फायदा घेता आला नाही -

सलामीवीर शेफाली वर्मा ( Opener Shefali Verma ) (14) आणि डी हेमलता (10) यांनीही दुहेरी आकडा गाठला. परंतु त्यांना त्यांच्या चांगल्या सुरुवातीचा फायदा घेता आला नाही. छोट्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडने धमाकेदार सुरुवात केली. डंकलेने डॅनियल व्हाईट (16 चेंडूत 24) याच्यासोबत अवघ्या 6.2 षटकांत 60 धावांची भागीदारी केली.

डंकलेने दोन जीवदानाचा फायदा उचलला -

डंकलेने सुरुवातीला यष्टिरक्षकाकडे झेल दिला होता, पण गोलंदाज रेणुका सिंग नो-बॉल टाकून बसली. यानंतर 15 धावांवर असताना शेफालीने मिडऑफमध्ये त्याचा सोपा झेल सोडला. तेव्हाही गोलंदाज रेणुकाच होती. याचा फायदा घेत डंकलेने ( Dunkley took advantage of two lives ) या फॉरमॅटमध्ये आपली सर्वोच्च धावसंख्या केली. त्याने एलिस कॅपलसोबत दुसऱ्या विकेटसाठी 74 धावांची अखंड भागीदारी केली. कॅपलने 20 चेंडूत 32 धावांची दमदार खेळी खेळली. डंकलेने आपल्या खेळीत आठ चौकार आणि एक षटकार लगावला.

हेही वाचा -Asia Cup 2022 Final Sl Vs Pak : आज ठरणार 'आशियाचा क्रिकेट सम्राट' कोण? श्रीलंका पाकिस्तान संघात होणार महामुकाबला

ABOUT THE AUTHOR

...view details