महाराष्ट्र

maharashtra

सुरक्षा दलाला मोठे यश! त्रालमधील चकमकीत जैश कमांडरला कंठस्नान

By

Published : Oct 13, 2021, 4:47 PM IST

Updated : Oct 13, 2021, 4:59 PM IST

अधिकाऱ्याच्या माहितीनुसार पोलिसांचे पथक, सैन्यदलाची 42 आरआर आणि सीआरपीएफ 189 बीएन यांच्या संयुक्त पथकाने वाग्गड भागातील तलवाना मोहल्ल्यात शोध मोहिम सुरू केली आहे. या भागात दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती.

शम सोफी
शम सोफी

पुलवामा - काश्मीरच्या खोऱ्यात शांततेला सुरुंग लावणाऱ्या दहशतवाद्यांचा नेस्तानाबूत करण्यासाठी सुरक्षा दलाला मोठे यश मिळाले आहे.दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्याती त्राल येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये मोठी चकमक सुरू आहे. या चकमकीत एका दहशतवाद्याला ठार करण्यात आले आहे. शम सोफी असे या दहशतवाद्याचे नाव आहे. हा जैश दहशतवादी संघटनेचा कमांडर होता.

अधिकाऱ्याच्या माहितीनुसार पोलिसांचे पथक, सैन्यदलाची 42 आरआर आणि सीआरपीएफ 189 बीएन यांच्या संयुक्त पथकाने वाग्गड भागातील तलवाना मोहल्ल्यात शोध मोहिम सुरू केली आहे. या भागात दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती.

हेही वाचा-लग्नासाठी म्हणून धर्मांतर करणारे हिंदू चूक करत आहेत- मोहन भागवत

अधिकाऱ्याने सांगितले की, सुरक्षा दलाच्या टीमने संशयित ठिकाणी जोरदार शोध मोहिम सुरू केली. तेव्हा दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. त्यावर सुरक्षा दलाच्या जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. या भागात अद्याप चकमक सुरू आहे. दोन ते तीन दहशतवादी लपून बसल्याचा सुरक्षा दलाला संशय आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांच्या माहितीनुसार एका दहशतवाद्याला ठार करण्यात आले आहे. ऑपरेशन सुरू आहे. काश्मीर झोनचे आयजी विजय कुमार यांनी ट्विट करून माहिती दिली आहे. जैश कमांडर शम सोफी असे मृत दहशतवाद्याचे नाव आहे.

हेही वाचा-आज पंतप्रधानांच्या हस्ते होणार 'गतीशक्ती' योजनेचा शुभारंभ; PM Modi यांचा मास्टर प्लॅन

काश्मीरच्या खोऱ्यात दहशतवाद्यांच्या हालचाली सुरू आहेत. त्यानंतर सुरक्षा दल अलर्ट झाले आहे. सुरक्षा दलाने अनेक ठिकाणी दहशतवाद्यांना पकडण्यासाठी जोरदार शोध मोहिम सुरू केली आहे.

सुरक्षा दल

हेही वाचा-महात्मा गांधींच्या सूचनेवरूनच सावरकरांनी दया याचिका दाखल केली होती - राजनाथ सिंह

सोमवारी अधिकाऱ्यासह चार सैनिकांना वीरमरण-

जम्मू काश्मीरमधीलराजौरी सेक्टरमध्ये दहशतवादविरोधी कारवाई करताना 11 ऑक्टोबरला एक कनिष्ठ कमिशन्ड अधिकारी (जेसीओ) आणि चार सैनिकांना वीरमरण आले. सोमवारी सकाळी जम्मू -काश्मीरच्या अनंतनाग आणि बांदीपोरा जिल्ह्यात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकींमध्ये दोन दहशतवादी ठार झाले. एक पोलीस कर्मचारी जखमी झाला होता.एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, दहशतवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी अनंतनाग जिल्ह्यातील वेरीनाग भागातील खगुंड येथे घेराव आणि शोधमोहीम सुरू केली. दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला. या गोळीबाराला जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले.

Last Updated :Oct 13, 2021, 4:59 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details