महाराष्ट्र

maharashtra

सत्ता द्या, दिल्लीप्रमाणे गोव्याचा विकास करणार; केजरीवालांचे गोमंतकीयांना आश्वासन

By

Published : Sep 21, 2021, 4:38 PM IST

Updated : Sep 21, 2021, 5:04 PM IST

अरविंद केजरीवाल गोवा
अरविंद केजरीवाल गोवा ()

आतापर्यंत सत्तेत येणाऱ्या प्रत्येक पक्षाने आपल्या स्वार्थासाठी गोव्यातील जनतेचा फायदा घेतला. प्रत्येक पक्षाने आपल्या परीने गोव्याला लुटण्याचा प्रयत्न केला. लोकांचा विकास न करता आपली साम्राज्ये मजबूत करत येथील लोकांना देशोधडीला लावले. त्यामुळे गोव्यात बेरोजगारी वाढली आहे. आम आदमी पार्टी सत्तेत आल्यावर दिल्लीप्रमाणे गोव्याचा विकास करणार असल्याचे केजरीवाल यांनी सांगितले.

पणजी -भ्रष्टाचारमुक्त सरकार देऊन आगामी विधानसभा निवडणुकीनंतर आम आदमी पार्टी दिल्लीप्रमाणे गोव्याचा विकास करणार असल्याचा दावा पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. पत्रकार परिषद घेत गोव्याच्या विकासासाठी त्यांनी अनेक घोषणा केल्या.

अरविंद केजरीवाल गोवा

हेही वाचा -देशात पिझ्झा-बर्गरची होम डिलीव्हरी, तर रेशनची का नाही?, केजरीवाल यांचा केंद्राला सवाल

'भ्रष्टाचारमुक्त सरकार देणार'

आतापर्यंत सत्तेत येणाऱ्या प्रत्येक पक्षाने आपल्या स्वार्थासाठी गोव्यातील जनतेचा फायदा घेतला. प्रत्येक पक्षाने आपल्या परीने गोव्याला लुटण्याचा प्रयत्न केला. लोकांचा विकास न करता आपली साम्राज्ये मजबूत करत येथील लोकांना देशोधडीला लावले. त्यामुळे गोव्यात बेरोजगारी वाढली आहे. आम आदमी पार्टी सत्तेत आल्यावर दिल्लीप्रमाणे गोव्याचा विकास करणार असल्याचे केजरीवाल यांनी सांगितले.

हेही वाचा -दिल्लीत उभारला देशातील पहिला स्मॉग टॉवर; केजरीवालांनी केले लोकार्पण

पत्रकार परिषदेत केल्या 'या' घोषणा

  1. बेरोजगार तरुणांना विकसित करण्यासाठी कौशल्य विद्यापीठ उभारणार
  2. गोमंतकीयांना खासगी नोकऱ्यांत ८० टक्के आरक्षण
  3. कुटुंबातील किमान एकाला रोजगार
  4. युवकांना दरमहा ३००० रुपये बेकारी भत्ता
  5. पर्यटन, खाणीशी निगडीत पीडितांना दरमहा ५००० हजार रुपयांची मदत
Last Updated :Sep 21, 2021, 5:04 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details