महाराष्ट्र

maharashtra

Commonwealth Games 2022 : वेटलिफ्टर संकेतने भारताला मिळवून दिले पहिले पदक, दुखापतीमुळे सुवर्णपदक हुकले

By

Published : Jul 30, 2022, 4:24 PM IST

वेटलिफ्टर संकेतने ( Weightlifter Sanket Sargar ) भारताला पहिले पदक मिळवून दिले आहे. 55 किलोमध्ये रौप्यपदक जिंकण्यात तो यशस्वी ठरला आहे, त्याचे सुवर्णपदक एक किलोने हुकले. क्लीन अँड जर्कमध्ये दुसऱ्या प्रयत्नात तो जखमी झाला. पण तरीही त्याने तिसरा प्रयत्न केला, पण तो यशस्वी होऊ शकला नाही.

Weightlifter Sanket Sargar
वेटलिफ्टर संकेत सरगर

बर्मिंगहॅम: राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेची 22 वी आवृत्ती बर्मिंगहॅम येथे होत आहे. आज म्हणजेच 30 जुलै, शनिवारी स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी भारतीय वेटलिफ्टर संकेत महादेव सरगरने पुरुषांच्या 55 ​​किलो वजनी गटात रौप्य पदक ( Weightlifter Sanket Sargar won silver medal ) जिंकले. राष्ट्रकुल 2022 मधील भारताचे हे पहिले पदक आहे ( India first medal in Commonwealth 2022 ).

महाराष्ट्रातील सांगली येथील रहिवासी असलेल्या संकेत महादेव सरगरने ( Weightlifter Sanket Mahadev Sargar ) गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत राष्ट्रीय विक्रमासह सुवर्णपदक पटकावले होते.

क्लीन अँड जर्कमध्ये दुसऱ्या प्रयत्नात संकेतच्या हाताला दुखापत ( Sanket got hurt in clean and jerk ) झाली. या प्रयत्नात त्याला 139 किलो वजन उचलावे लागले, त्यात त्याला दुखापत झाली. दुखापतीनंतरही संकेतने तिसरा प्रयत्न केला आणि खूप प्रयत्न केले, पण तो पूर्ण करू शकला नाही.

हेही वाचा -India Beat West Indies : भारताचा वेस्ट इंडिजवर मोठा विजय, रोहित शर्माची धमाकेदार खेळी

ABOUT THE AUTHOR

...view details