ETV Bharat / bharat

India Beat West Indies : भारताचा वेस्ट इंडिजवर मोठा विजय, रोहित शर्माची धमाकेदार खेळी

author img

By

Published : Jul 30, 2022, 7:22 AM IST

भारताने वेस्ट इंडिजविरुद्ध सुरू असलेल्या टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या मालिकेत पहिला विजय ( India Wins ) नोंदविला आहे. या विजयासह टीम इंडियाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकांत 6 गडी गमावून 190 धावा केल्या. कर्णधार रोहित शर्माने 64 धावांची खेळी ( Rohit Played Brilliant Innings ) खेळली. त्याचवेळी दिनेश कार्तिक 19 चेंडूत 41 धावा करून नाबाद राहिला. त्याला सामनावीर म्हणूनही गौरविण्यात आले.

India Wins
India Wins

तारौबा (त्रिनिदाद) : भारताने पहिल्या T20 सामन्यात वेस्ट इंडिजचा 68 धावांनी पराभव ( India Wins ) केला. या सामन्यात संघाच्या विजयाचा हिरो ठरला कर्णधार रोहित शर्मा. रोहितने ६४ धावांची ( Rohit Played Brilliant Innings ) जबरदस्त इनिंग खेळली. टीम इंडियाने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 190 धावा केल्या, प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजला 20 षटके खेळून केवळ 122 धावा करता आल्या. वेस्ट इंडिजने त्यांच्या 8 विकेट गमावल्या, पण अखेरीस टीम इंडियाने हा सामना 68 धावांनी जिंकला आणि पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.

191 धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिज संघाने सुरुवातीपासूनच विकेट गमावण्यास सुरुवात केली. अर्शदीप सिंगने प्रथम काईल मायर्सला बाद केले, त्याच्यानंतर जेसन होल्डरही खाते न उघडताच बाद झाला. रविचंद्रन अश्विन आणि रवी बिश्नोई ही जोडी विंडीजसाठी दुःस्वप्न ठरली. दोन्ही फिरकीपटूंनी एकूण चार विकेट घेतल्या. अश्विनने 4 षटकात केवळ 22 धावा दिल्या आणि 2 बळी घेतले. तर रवी बिश्नोईने 4 षटकात 26 धावा देत फक्त 2 विकेट घेतल्या. वेस्ट इंडिजकडून एस. ब्रुक्सने 20, कर्णधार निकोलस पूरनने 18 धावा केल्या.

एकदिवसीय मालिकेतून ब्रेक घेतलेल्या रोहित शर्माने टी-20 मालिकेत पुनरागमन केले. रोहित शर्माने आज जोरदार फटकेबाजी केली. रोहितने 64 धावांच्या खेळीत 7 चौकार, 2 षटकार मारले. रोहित शर्माशिवाय फिनिशर दिनेश कार्तिकने पुन्हा एकदा अप्रतिम कामगिरी केली.

दिनेश कार्तिकची 19 चेंडूत 41 धावांची खेळी - मध्यंतरी जेव्हा टीम इंडियाचा डाव फसला तेव्हा अखेर दिनेश कार्तिकने 19 चेंडूत 41 धावांची खेळी करत संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत नेले. दिनेश कार्तिकने आपल्या खेळीत चार चौकार, दोन षटकार मारले. त्याच्यासोबत रविचंद्रन अश्विननेही 10 चेंडूत 13 धावा केल्या आणि अखेर टीम इंडियाची धावसंख्या 190 धावांपर्यंत पोहोचली. याशिवाय सूर्यकुमार यादवने 24, ऋषभ पंतने 14, रवींद्र जडेजाने 16 धावा केल्या.

हेही वाचा - Commonwealth Games 2022 : पहिल्याच सामन्यात भारताला पराभवाचा धक्का; ऑस्ट्रेलियाची 3 विकेट्सनी विजयी सलामी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.