महाराष्ट्र

maharashtra

CBSE Class 10 Results : सीबीएससी 10 वीचा निकाल जाहीर, कसा पाहायचा निकाल?

By

Published : May 12, 2023, 2:02 PM IST

Updated : May 12, 2023, 3:22 PM IST

सीबीएससी पॅटर्नच्या दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहता यावा, यासाठी बोर्डाच्या वतीने लिंक जाहीर करण्यात आल्या आहेत. या लिंकवर विद्यार्थ्यांचा निकाल उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

CBSE Class 10 Results
संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली : सीबीएससी पॅटर्नच्या 12 वीचा निकाल जाहीर झाल्यानंतर 10 वीचाही निकाल जाहीर झाला आहे. दहावीचा निकाल जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांची मात्र धाकधूक वाढली आहे. याबाबत सीबीएससी पॅटर्नच्या 10 चा निकाल 16 मे रोजी जाहीर होता. मात्र त्या अगोदरच दहावी सीबीएससीचा निकाल जाहीर झाला आहे.

सीबीएससी बोर्डाने जाहीर केल्या लिंक :सीबीएससी पॅटर्नच्या 12 वीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. त्यापाठोपाठ सीबीएससी 10 वीचा निकालही लगेच जाहीर करण्यात आला आहे. सीबीएससी बोर्डाच्या वतीने दहावी परीक्षेच्या निकालासाठी लिंक जारी करुन दिल्या आहेत. त्यामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांना या लिंकवर आपला निकाल पाहता येणार आहे. यात बोर्डाने 1) https://testservices.nic.in/cbseresults/class_x_2023/ClassTenth_c_2023.htm

2) https://cnr.nic.in/cbseresults/class_x_2023/ClassTenth_c_2023.htm

3) https://cbseresults.nic.in/class_x_2023/ClassTenth_c_2023.htm या लिंक दिल्या आहेत. या लिंकवर विद्यार्थी आपला निकाल पाहू शकतात.

एकूण ९३.१२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण :केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने शुक्रवारी दहावीचा निकाल जाहीर केला. यामध्ये एकूण ९३.१२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, त्रिवेंद्रम जिल्हा 10 मध्ये आघाडीवर आहे. तत्पूर्वी आज बारावी बोर्डाचा निकालही जाहीर झाला आहे.

टॉपर्सची घोषणा केली जाणार नाही :सीबीएसई बोर्डाने दहावीचा निकाल जाहीर केला आहे. CBSE 10 वीचा निकाल 2023 केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) अधिकृत वेबसाइट cbseresults.nic.in वर उपलब्ध आहे. विद्यार्थी त्यांचा CBSE इयत्ता 10 वीचा निकाल उमंग अॅप आणि डिजीलॉकरद्वारे देखील पाहू शकतात. यावर्षी 10वी बोर्डाच्या परीक्षेसाठी एकूण 21 लाख 84 हजार 117 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी 21 लाख 65 हजार 805 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. या परीक्षेत 20 लाख 16 हजार 779 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेत ९३.१२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यावर्षी 10वी बोर्ड टॉपर्सची घोषणा केली जाणार नाही. यासाठी सर्व संबंधित शाळा प्रशासनाना स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. नुकत्याच घडलेल्या घटना पाहता हे पाऊल उचलण्यात आले आहे.

हेही वाचा -

1) CBSE class 12 exam results: बारावी सीबीएसईचा निकाल जाहीर, 'असा' पाहा निकाल

2) Maharashtra Political Crisis: उद्धव ठाकरे व नाना पटोले यांच्या राजीनाम्यातून सगळ्यांना धडा मिळाला-अजित पवार

3) Uddhav Thackeray on SC verdict : विधानसभा अध्यक्षांनी वेडावाकडा निर्णय घेतला तर सर्वोच्च न्यायालयात जाऊ-उद्धव ठाकरे

Last Updated :May 12, 2023, 3:22 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details