महाराष्ट्र

maharashtra

Vaccination New Rule : कोरोनातून बरे झाल्यानंतर तीन महिन्यांनी मिळणार लसीकरणासह बुस्टर डोस, केंद्राचे राज्यांना निर्देश

By

Published : Jan 22, 2022, 4:45 PM IST

Updated : Jan 22, 2022, 7:31 PM IST

केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव विकास शील ( IAS Vikas Sheel letter to states ) यांनी राज्य व केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहिले आहे. कोरोनाची लागण झाली तर त्या व्यक्तीला तीन महिन्यापर्यंत लस देऊ नये, असे पत्रात नमूद केले ( new rule for children corona vaccination ) आहे. आरोग्य मंत्रालयाचे सचिव विकास शील म्हणाले, की 15 ते 18 वर्षाच्या मुलांना आणि 60 वर्षांहून अधिक वयाच्या नागरिकांना 3 जानेवारीपासन कोरोनाची लस दिली जात आहे.

कोरोना लसीकरण
कोरोना लसीकरण

नवी दिल्ली- मुलांकरिता आणि फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाबाबत केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पात्र असलेलेले मुले आणि फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली तर तीन महिन्यापर्यंत लस मिळू ( COVID 19 vaccination new rule for children ) शकणार नाही. याबाबतचे आदेश आरोग्य मंत्रालयाने काढले आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव विकास शील ( IAS Vikas Sheel letter to states ) यांनी राज्य व केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहिले आहे. कोरोनाची लागण झाली तर त्या व्यक्तीला तीन महिन्यापर्यंत लस देऊ नये, असे पत्रात नमूद केले आहे. आरोग्य मंत्रालयाचे सचिव विकास शील म्हणाले, की 15 ते 18 वर्षाच्या मुलांना आणि 60 वर्षांहून अधिक वयाच्या नागरिकांना 3 जानेवारीपासून कोरोनाची लस दिली जात आहे. त्याचबरोबर फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांनाही लस दिली ( corona vaccination for children ) जात आहे. जर त्यांना कोरोनाची लागण झाली तर तीन महिन्यांपर्यंत लस देण्यात येऊ नये.

हेही वाचा-India Corona Update : भारतात 24 तासांत 3.37 लाख कोविड रुग्णांची नोंद; आधीपेक्षा २.७ टक्के घट

24 तासांत नवीन कोरोना रुग्ण

भारतामध्ये गेल्या 24 तासांत कोरोना रुग्णांच्या संख्येत अत्यंत कमी रुग्णांची (Decrease in corona patients) नोंद झाली आहे. गेल्या 24 तासात 3.37 लाख नवीन कोरोना रुग्णांची (Corona Patients in India) नोंद झाली आहे. शुक्रवारी सकाळी नोंदवलेल्या प्रकरणांपेक्षा 2.7 टक्के कमी आहे. दैनंदिन मृत्यूची संख्या देखील कमी झाली आहे. कोरोनामुळे शुक्रवारी 703 रुग्णांचा मृत्यू झाला होता. तर आज देशात 488 मृत्यू झाले आहेत.

हेही वाचा-Fake Tajmahal Website : ताजमहालच्या बनावट वेबसाईटच्या माध्यमातून अनेकांना गंडा, एकास अटक

जगभरात अनेक देशांमध्ये कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरियंटचा धोका वाढत आहे. त्यामुळे आपल्याला अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. शाळा, महाविद्यालयात जाणाऱ्या मुलांची, पालकांची चिंता कमी करण्यासाठी सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आ

Last Updated :Jan 22, 2022, 7:31 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details