ETV Bharat / bharat

India Corona Update : भारतात 24 तासांत 3.37 लाख कोविड रुग्णांची नोंद; आधीपेक्षा २.७ टक्के घट

author img

By

Published : Jan 22, 2022, 12:05 PM IST

भारतामध्ये गेल्या २४ तासांत कोरोना रुग्णांच्या संख्येत अत्यंत कमी रुग्णांनी (Decrease in corona patients) नोंद झाली आहे. गेल्या २४ तासात ३.३७ लाख नवीन कोरोना रुग्णांची (Corona Patients in India) नोंद झाली आहे. शुक्रवारी सकाळी नोंदवलेल्या प्रकरणांपेक्षा २.७ टक्के कमी आहे.

covid
covid

नवी दिल्ली - भारतामध्ये गेल्या २४ तासांत कोरोना रुग्णांच्या संख्येत अत्यंत कमी रुग्णांची (Decrease in corona patients) नोंद झाली आहे. गेल्या २४ तासात ३.३७ लाख नवीन कोरोना रुग्णांची (Corona Patients in India) नोंद झाली आहे. शुक्रवारी सकाळी नोंदवलेल्या प्रकरणांपेक्षा २.७ टक्के कमी आहे. दैनंदिन मृत्यूची संख्या देखील कमी झाली आहे. कोरोनामुळे शुक्रवारी 703 रुग्णांचा मृत्यू झाला होता. तर आज देशात 488 मृत्यू झाले आहेत.

रोजचा पॉझिटीव्हीटी रेट देखील 17.94 टक्क्यांवरून 17.22 टक्क्यांवर खाली आला आहे. आठवड्याचा पॉझिटीव्हीटी रेट 16.65 टक्के आहे. भारतातील सक्रिय रुग्णांची संख्या सध्या 21,13,365 आहे. 29 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये नवीन प्रकरणे आढळून आल्याने ओमायक्रॉन संसर्गाची संख्या 10,000 च्या पुढे गेली आहे. आतापर्यंत देशभरात 160 हून अधिक लसींचे डोस देण्यात आले आहेत. ज्यात 94 टक्के नागरिकांना पहिला डोस मिळाला आहे तर 72 टक्के लोकांचे पूर्णपणे लसीकरण करण्यात आले आहेत.

6.5 कोटी नागरिकांनी घेतला लसीचा पहिला डोस

या आठवड्याच्या सुरुवातीला, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने लसीचा पहिला डोस चुकवलेल्या 6.5 कोटी नागरिकांना लसीकरण करण्याचे आवाहन केले होते. लसीकरणामुळे कोरोनाच्या मृत्यूदरात तिसऱ्या लाटेत लक्षणीय घट झाल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांनी नमूद केले आहे. NITI आयोगाचे सदस्य आणि सरकारचे प्रमुख सल्लागार विनोद पॉल म्हणाले की, याआधी लसीचा दुसरा डोस चुकवलेल्या लोकांची संख्या १२ कोटी होती. मात्र, आता यामध्ये घट होऊन ती 6.5 कोटी वर आली आहे.

हेही वाचा - Corona Update : लाट सुरूच 24 तासांत भारतात कोरोनाचे 3.47 लाख रुग्ण, 703 मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.