महाराष्ट्र

maharashtra

Karnataka Polls 2023: कर्नाटक विधानसभा निवडणूक, ९ एप्रिलच्या बैठकीत ठरणार भाजप उमेदवारांची नावे

By

Published : Apr 7, 2023, 12:38 PM IST

कर्नाटक निवडणूक 2023 च्या तयारी दरम्यान, भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची 9 एप्रिल रोजी पक्ष कार्यालयात बैठक होऊ शकते. या बैठकीत केंद्रीय निवडणूक समिती उमेदवारांच्या नावावर विचारमंथन करणार आहे.

BJP to finalise candidates for Karnataka polls in April 9 meet
कर्नाटक विधानसभा निवडणूक, ९ एप्रिलच्या बैठकीत ठरणार भाजप उमेदवारांची नावे

नवी दिल्ली:कर्नाटक विधानसभा निवडणूक २०२३ साठी उमेदवार निश्चित करण्याकरिता भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची ९ एप्रिल रोजी पक्ष कार्यालयात बैठक होऊ शकते. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजपचे सरचिटणीस बीएल संतोष आणि पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीचे सदस्य उपस्थित राहणार असल्याची शक्यता आहे.

एका मतदारसंघासाठी तीन नावे:पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्नाटकातील भाजपच्या कोअर ग्रुपने प्रत्येक विधानसभेच्या जागेसाठी तीन नावे निवडली आहेत, जी केंद्रीय निवडणूक समितीसमोर ठेवली जातील. उमेदवार निश्चित करण्यापूर्वी पक्षाचे केंद्रीय नेतृत्व या नावांवर विचारमंथन करणार आहे. कर्नाटकची विधानसभा निवडणूक भाजपसाठी अत्यंत महत्त्वाची असून, त्यासाठी भाजपने आपली पूर्ण ताकद लावली आहे. नुकत्याच आलेल्या सर्व्हेमध्ये भाजपाला कर्नाटकात मोठा झटका मिळू शकतो, अशी शक्यता वर्तविण्यात आल्याने भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी कर्नाटक विधानसभा निवडणुकीकडे जास्तीचे लक्ष घातले आहे.

एकाच टप्प्यात होणार निवडणुका:4 एप्रिल रोजी, कर्नाटकातील भाजपच्या कोअर ग्रुपने पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह, राज्य निवडणूक प्रभारी धर्मेंद्र प्रधान, सहप्रभारी मनसुख मांडविया, केंद्रीय निवडणूक समिती सदस्य अन्नामलाई यांच्यासोबत झालेल्या बैठकीत उमेदवारांची शॉर्टलिस्ट तयार केली. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप 104 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला, काँग्रेसने 80 आणि JD(S) 37 जागा जिंकल्या. 10 मे रोजी एकाच टप्प्यात विधानसभा निवडणुका होणार असून, त्यासाठी 13 मे रोजी मतमोजणी होणार आहे.

काँग्रेसने दुसरी यादी जाहीर केली:कर्नाटक काँग्रेसने गुरुवारी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करत आघाडी घेतली आहे. केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीनंतर काँग्रेसच्या उमेदवारांची ही नावे जाहीर करण्यात आली आहेत. दुसऱ्या यादीत 42 उमेदवारांची नावे काँग्रेसने निश्चित केली आहेत. काँग्रेसने आतापर्यंत 166 जागांवर आपले उमेदवार जारी केले आहेत.

हेही वाचा: तुरुंगातून सिसोदियांनी लिहिले पत्र, म्हणाले शिकलेला पंतप्रधान पाहिजे

ABOUT THE AUTHOR

...view details