ETV Bharat / bharat

Manish Sisodia Letter: देशाला शिक्षित पंतप्रधानांची गरज, मनीष सिसोदियांचे तिहार तुरुंगातून देशाला पत्र

author img

By

Published : Apr 7, 2023, 11:49 AM IST

मनीष सिसोदिया यांनी तिहार तुरुंगातून पत्र लिहून पंतप्रधान मोदींना टोला लगावला आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी ट्विटरवर हे पत्र शेअर केले आहे.

manish sisodia wrote letter from tihar jail criticized pm modi on his education
देशाला शिक्षित पंतप्रधानांची गरज, मनीष सिसोदियांचं तिहार तुरुंगातून पत्र

नवी दिल्ली : आम आदमी पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिक्षणावरून सातत्याने त्यांच्यावर प्रश्न उपस्थित करत आहे. सीएम केजरीवाल यांनी अनेक मंचांवरून पंतप्रधान मोदींना निरक्षर म्हटले आहे. आता या प्रकरणात मद्य घोटाळ्यात तिहार तुरुंगात असलेले दिल्लीचे माजी शिक्षण मंत्री मनीष सिसोदिया यांचे नावही सामील झाले आहे, त्यांनी तुरुंगातून देशाला पत्र लिहून पंतप्रधान मोदींना टोमणा मारला आहे. शुक्रवारी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सिसोदिया यांचे पत्र ट्विटरवर शेअर केले. मोदीजींना विज्ञानाच्या गोष्टी समजत नाहीत, असे पत्रात लिहिले आहे. मोदीजींना शिक्षणाचे महत्त्व कळत नाही. गेल्या काही वर्षांत 60 हजार शाळा बंद पडल्या. भारताची प्रगती होण्यासाठी चांगला शिकलेला पंतप्रधान असणे आवश्यक आहे.

manish sisodia wrote letter from tihar jail criticized pm modi on his education
सिसोदिया यांचं पत्र

जाणून घ्या काय लिहिले आहे पत्रात : दिल्लीचे माजी शिक्षणमंत्री मनीष सिसोदिया आपल्या पत्रात म्हणाले की, आज आपण २१व्या शतकात जगत आहोत. संपूर्ण जग आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) बद्दल बोलत आहे. ढगांच्या मागे उडणारे विमान रडार पकडू शकत नाही, असे पंतप्रधान जेव्हा सांगतात, तेव्हा ते संपूर्ण जगाच्या लोकांमध्ये हसण्याचे पात्र ठरतात. शाळा-कॉलेजात शिकणारी मुलं त्याची चेष्टा करतात.

हे विधान देशासाठी धोकादायक : सिसोदिया यांनी आपल्या पत्रात पुढे लिहिले आहे की, त्यांची अशी विधाने देशासाठी अत्यंत धोकादायक असून, त्याचे अनेक तोटे आहेत. भारताचे पंतप्रधान किती अल्पशिक्षित आहेत आणि त्यांना विज्ञानाचे प्राथमिक ज्ञानही नाही हे साऱ्या जगाला कळते. आज देशातील तरुणांना काहीतरी करायचे आहे आणि संधी शोधत आहे. देशातील तरुणांना आता जग जिंकायचे असून, त्याला विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात नवनवीन प्रयोग करायचे आहेत. आजच्या देशातील अशा तरुणांची स्वप्ने पूर्ण करण्याची क्षमता ही कमी शिक्षण झालेल्या पंतप्रधानात आहे का? एकीकडे देशाची लोकसंख्या वाढत आहे. अशा स्थितीत सरकारी शाळांची संख्या वाढायला हवी होती, पण देशभरातील सरकारी शाळा बंद होणे ही धोक्याची घंटा आहे. यावरून शिक्षणाला सरकारचे प्राधान्य नसल्याचे दिसून येते. जर आपण आपल्या मुलांना चांगले शिक्षण दिले नाही तर भारताची प्रगती होईल का?, असा सवालही उपस्थित केला.

देशातील सर्वात मोठा मॅनेजर सुशिक्षित नसावा का? मी पंतप्रधान मोदींचा एक व्हिडिओ पाहिला होता, ज्यामध्ये ते अभिमानाने सांगत आहेत की ते शिकलेले नाहीत. गावच्या शाळेपर्यंतच त्यांचे शिक्षण झाले. अशिक्षित किंवा कमी शिक्षित असणं ही अभिमानाची गोष्ट आहे का? ज्या देशाचे पंतप्रधान कमी शिकलेले असल्याचा अभिमान बाळगत आहेत, त्या देशात सर्वसामान्य माणसाच्या मुलासाठी चांगल्या शिक्षणाची व्यवस्था कधीच होऊ शकत नाही. आजकाल कुणीही छोट्या अशा कंपनीसाठी मॅनेजर ठेवायचा असेल तर सुशिक्षित व्यक्ती शोधता. देशातील सर्वात मोठा मॅनेजर सुशिक्षित नसावा का?, असेही सिसोदिया म्हणाले.

हेही वाचा: या प्रसिद्ध अभिनेत्रींच्या विरोधात अटक वॉरंट

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.