महाराष्ट्र

maharashtra

Teesta Setalvads Hearing : तिस्ता सेटलवाड यांच्या याचिकेवर सुनावणी, संजीव भटच्या वकिलांनी मागितले आणखी कागदपत्रे

By

Published : Jul 7, 2023, 10:27 AM IST

सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांनी तत्कालिन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह गुजरातची बदनामी केल्याप्रकरणी खटला सुरू आहे. या खटल्याची सुनावणी आज अहमदाबाद सत्र न्यायालयात पार पडणार आहे.

Teesta Setalvads
तिस्ता सेटलवाड

अहमदाबाद :गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह गुजरातची बदनामी केल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांच्याविरोधात खटला सुरू आहे. या प्रकरणाची सुनावणी अहमदाबादच्या सत्र न्यायालयात सुरू आहे. या प्रकरणी तिस्ता सेटलवाड, माजी डीजीपी आर बी श्रीकुमार आणि माजी आयपीएस अधिकारी संजीव भट्ट यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत. गुजरात पोलिसांची एसआयटी या तीन आरोपींविरुद्ध तपास करत आहे. अहमदाबादच्या सत्र न्यायालयात या प्रकरणाची आजही सुनावणी होणार आहे.

काय म्हणाले तिस्ता सेटलवाड यांचे वकील : गुरुवारच्या सुनावणीत तिस्ता सेटलवाड यांचे वकील सोमनाथ वत्स यांनी जोरदार युक्तिवाद केला होता. यावेळी त्यांनी सर्वोच्च न्यायालयाने एसआयटी तिस्ता सेटलवाड यांच्या 2006 पूर्वीच्या भूमिकेची चौकशी करू शकत नसल्याचा आदेश दिल्याचे स्पष्ट केले आहे. आजही सत्र न्यायालयात या मुद्द्यावर आणखी चर्चा होणार आहे.

काय म्हणाले संजीव भट्ट यांचे वकील : संजीव भट्ट यांच्या प्रकरणात सरकारी वकील काही निवडक कागदपत्रांवर अवलंबून असल्याची माहिती संजीव भट्ट यांचे वकील मनीष ओझा यांनी दिली. ही कागदपत्र त्यांनाही पुरवले पाहिजे असेही ते यावेळी म्हणाले. संजीव भट्ट यांनी या मुद्द्यावर एसआयटी आणि वित्त आयोगाला फॅक्स करून सर्व कागदपत्रे मागवली आहेत.

काय आहे प्रकरण :गुजरातमध्ये 2002 च्या दंगलीनंतर तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि गुजरातला बदनाम करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप तिस्ता सेटलवाड यांच्यावर आहे. या प्रकरणी माजी डीजीपी आर बी श्रीकुमार आणि माजी आयपीएस अधिकारी संजीव भट्ट यांच्याविरोधात एसआयटी तपास सुरू आहे. गुरुवारी याप्रकरणी सत्र न्यायालयात सुनावणी झाली. बुधवारी झालेल्या सुनावणीत तिस्ता सेटलवाड यांच्या खटल्यातून मुक्ती मिळण्याच्या याचिकेवर सुनावणी झाली. मात्र या मागणीला मागिल सुनावणीत सरकारी वकिलांनी विरोध केला होता.

सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम दिलासा : गुजरात उच्च न्यायालयाने या प्रकरणी तिस्ता सेटलवाड यांना तात्काळ आत्मसमर्पण करण्यास सांगितले. पण त्याच दिवशी तिस्ता सेटलवाड यांनी सर्वोच्च न्यायालयात अर्ज केला. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने तिस्ता सेटलवाड यांना अंतरिम दिलासा दिला. त्यानंतर या मुद्द्यावर पुढील सुनावणी सर्वोच्च न्यायालयात होणार आहे.

हेही वाचा -

  1. Teesta Setalvads Plea: गुजरात दंगलीप्रकरणी तिस्ता सेटलवाड यांच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी
  2. नागरिकत्व दुरुस्ती विधेयक, 'सीएबी' आणि 'एनआरसी' विधेयक संविधान विरोधी - तिस्ता सेटलवाड
  3. Inquiry By Teesta Setalvad By Gujarat ATS : सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड गुजरात ATS कडून ताब्यात

ABOUT THE AUTHOR

...view details