महाराष्ट्र

maharashtra

Facebook Instagram verified account : ट्विटरनंतर फेसबुकसह इन्स्टाग्रामवरदेखील वापरकर्त्यांना मोजावे लागणार पैसे

By

Published : Jun 8, 2023, 8:35 AM IST

ट्विटरनंतर आता मेटा कंपनीने फेसबूक, व्हॉट्सअॅप आणि इंस्टाग्रामच्या खात्यासाठी शुल्क आकारणे सुरु केले आहे. युझरला प्रत्येक महिन्याला शुल्क भरावे लागणार आहे. यामुळे आता सोशल मीडियावर राहणाऱ्यांची संख्या कमी होईल.

Meta will charge for verified account
मेटा व्हेरिफाइड खात्यासाठी शुल्क आकारणार

नवी दिल्ली : सोशल मीडियावर सदा सर्वदा ऑनलाईन राहणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. भावांनो,आता तुम्ही जास्त वेळ ऑनलाईन राहू शकणार नाहीत. कारण ऑनलाईन राहण्यासाठी तुमच्या खिश्यात पैसे असणे गरजेचे आहे. खरं, तुम्ही जे वाचत आहात ते खरं आहे. कारण ट्विटरनंतर आता सोशल मीडियामधील सर्वात मोठी कंपनी मेटा फेसबूक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअपच्या व्हेरिफाइड खात्यासाठी शुल्क आकारणार आहे.

किती लागणार शुल्क :फेसबुकची मूळ कंपनी मेटा वेगवेगळ्या मार्गातून महसूल वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. कंपनीचे हे प्रयत्न पाहता पडताळणी सेवा म्हणजेच व्हेरिफेकेशन सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. स्वत: मार्क झुकरबर्ग यांनी याबाबत घोषणा केली होती. दरम्यान मेटा आता फेसबूक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपवरील व्हेरिफाइड खात्यांसाठी मासिक सबस्क्रिप्शन घ्यावे लागणार आहे. एका महिन्याच्या सदस्यासाठी तुम्हाला-आम्हाला 699 रुपये मोजावे लागतील. याविषयीची माहिती कंपनीने बुधवारी दिली.

आजपासून भारतात सेवा सुरु : भारतात आजपासून Instagram किंवा Facebook साठी शुल्क भरावे लागणार आहे. iOS आणि Android फोन वापरणारे लोक 699 रुपयांची मासिक सदस्यता घेऊ शकतात. येत्या काही महिन्यांत 599 रुपये प्रति महिना वेब खरेदीचा पर्याय देखील सादर करणार असल्याचे, कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे. फेसबूक आणि इंस्टाग्रामच्या वापरकर्त्यांना सदस्यता घ्यायची असेल तर त्यांना सरकारी ओळखपत्राने त्यांचे खाते व्हेरिफाइड करावे लागणार आहे. त्यानंतर वापरकर्त्यांना त्यांचे व्हेरिफाइड केले जाईल, आणि बनावट खात्यांपासून युझरला वाचवले जाईल. "जागतिक स्तरावर अनेक देशांमध्ये आमच्या सुरुवातीच्या चाचणीचे चांगले परिणाम पाहिल्यानंतर आम्ही आमच्या मेटा व्हेरिफाइड चाचणीचा भारतात विस्तार करत असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

व्हेरिफाइडसाठी पात्रता आवश्यक : युझरला आपले खाते व्हेरिफाइड करण्यासाठी काही पात्रता आवश्यक आहे. युझरने केलेले पोस्ट आणि युझर हा किमान 18 वर्ष पूर्ण केलेला असावा. अर्ज करत असलेले युझरला Facebook किंवा Instagram खात्याच्या प्रोफाइल नाव आणि फोटोशी जुळणारा सरकारी आयडी सबमिट करणे आवश्यक असणार आहे.

हेही वाचा -

  1. Meta Acts On Facebook Insta : मेटाकडून फेसबूक, इंस्टाग्रामवरील 2.29 कोटींहून अधिक पोस्ट डिलीट
  2. world social media day 2021: गोष्ट सोशल मीडियाची, जाणून घ्या इतिहास आणि मनोरंजक माहिती!

ABOUT THE AUTHOR

...view details